तुमची मुलं कशी शिकतात ?’

प्रत्येक मुलाची शिकण्याची एक स्टाईल असते. एकूण सात स्टाईल असतात.पहा तरी तुमचे मूल शिकते तरी कसे?

डाॅ.स्वाती विनय गानू

आपल्या शिक्षण व्यवस्थेत आणि समाजातही मुलांची हुशारी ही त्यांचा अभ्यास आणि परीक्षेतील पर्सेंटेज किंवा ग्रेडस वर ठरवली जाते.जेव्हा मोठी माणसं मुलांनी अभ्यास करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून करतात तेव्हा अभ्यास कसा कर हे सांगितलं जात नाही.धड्याखाली दिलेली प्रश्नोत्तरं पाठ करुन परीक्षेत लिहिणे हाच मुलांना अभ्यास वाटतो यात त्यांची काय चूक आहे?खरं म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांचा शिकण्याचा(style) प्रकार कोणता आहे हे शोधून काढता येऊ शकतं.
आपलं मूल कसं शिकतं?
1)निरीक्षण (Observation)
2)ऐकणे(Listening)
3)शोध घेणे(exploring)
4)प्रयोग करुन पाहणे(Experimenting)
5)प्रश्न विचारणे(Asking questions)
यापैकी तुमचं मूल कोणत्या कौशल्यांचा उपयोग शिकताना करतं यावर लक्ष द्या.
मुलांनी शिकण्यामध्ये रस घेणं,त्यातून प्रेरणा घेणं आणि त्यात गुंग होणं हे खूप महत्त्वाचं आहे.
मुलं शिकतात ती या माध्यमातून
●मेंदू (brain)
●मन (mind)
●अनुभव (experience)
●शाळा (school)
●संवेदना (senses)
मुलं वेगवेगळ्या अशा ७ प्रकारांनी शिकतात.
1)दृक (visual) पाहून शिकणं
काही मुलं समोरच्याच्या चेह-यावरील हावभाव आणि देहबोली बघून शिकतात.डेमाॅन्स्ट्रेशन आणि डिसक्रिप्शन मधून शिकतात.त्यातून ते कल्पना करतात .स्वतःची अशी समज तयार करतात.
2)लक्ष देऊन ऐकणे (Listening) ऐकून शिकणं.
ह्या पद्धतीने शिकणारी मुलं डिस्कशनमध्ये,चर्चेमध्ये भाग घेतात. ते वर्बल म्हणजेच मौखिक पद्धतीने शिकतात.
3)स्पर्श (Tactile)touch) स्पर्श करुन शिकणं.
ही मुलं प्रोजेक्ट (प्रकल्प)ॲक्टिव्हिटी करण्यात रस घेतात.या पद्धतीने शिकायला म्हणजेच स्पर्श ज्ञान ह्या माध्यमातून शिकायला काही मुलांना आवडतं.ह्या मुलांना डुडलिंग,ड्राॅईंग करुन शिकणं इंटरेस्टिंग वाटतं.
4)हालचाल(Kinesthetic) हालचाल करुन शिकणं.
जेव्हा मुलांना स्नायू आणि शरीराच्या इतर अवयवांच्या मदतीने शिकायला आवडतं तेव्हा ते या लर्निग स्टाईलने शिकतात.अशी मुलं फार काळ एकाजागी बसून राहू शकत नाहीत.त्यांच्या शिकण्यात फिजिकल सेन्सेशन महत्वाचं असतं.त्यांना more Kinesthetic म्हणतात.
तुम्ही जर लक्ष ठेवलंत तर आपलं मूल कोणत्या पद्धतीने शिकण्यास उत्सुक असतं.कोणती लर्निग स्टाईल त्याला आवडते हे कळतं.त्याच्याॲक्शन,आवडीनिवडी,
प्रेफरन्स बाबत जागरुक राहिलात तसंच तो त्याला मिळालेली माहिती प्रोसेस करताना,तिचा अर्थ लावताना वरच्यापैकी कोणत्या लर्निग स्टाईलचा उपयोग करतो हे पाहणंही इंटरेस्टिंग असतं.
लक्षात ठेवण्याजोगं –
○मुलांमध्ये काय कमी आहे हे पाहताना त्यांची बलस्थानं,आवडत्या गोष्टींवर पण लक्ष केंद्रित करता येतं.
○थोडं हेही पहा की तिला कोणती खेळणी खेळायला आवडतं?कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आवडतात? शांततेने करण्याच्या की गोंधळ घालण्याच्या?
○त्याला चित्रं काढायला आवडतं की पुस्तकं वाचायला?एखादी गोष्ट तोंडी सांगायला आवडतं की प्रत्यक्ष कृती करुन दाखवायला?ती ॲक्टिव्ह आहे का? अधिकाधिक ॲक्टिव्हिटीज मध्ये भाग घेते का?
एकदा का मुलांची शिकण्याची पद्धत (learning style) कळली की तुम्ही त्यांना मदत करु शकता.कारण मुलांवर सगळ्यात जास्त प्रभाव पालकांचाच असतो.
त्यांना ॲक्टिव्हिटी करण्यासाठी भरपूर वेळ द्या.
अधिकाधिक अनुभव घेऊ द्या.
वास्तव ,खरे अशा जगण्यातल्या प्रश्नांना तोंड देऊ द्या.
जगण्याचा खरा अर्थ कळू द्या.
ह्या लर्निग स्टाईल बद्दल कळल्यानंतर त्या पद्धतीचे अनुभव जास्त द्या.आणि परीक्षेसाठी तयार करताना अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस असते म्हणूनच अभ्यासाचे ठसे दीर्घ काळ टिकावेत यासाठी परीक्षेकरताच्या अभ्यासाकरता कशी तयारी करुन घ्यायची तर
साधारणपणे कोणत्या विषयाचा कोणता धडा सुरु आहे हे मुलांना माहीत असतं.त्या धडयाचे मोठ्याने वाचन घरी करणे.
वर्गात तो भाग शिकवला जातो तेव्हा तो आधीच वाचला असल्याने समजायला सोपं जातं
घरी आल्यावर पुन्हा त्या भागाचे मूकवाचन करणं.त्याने ठसे अधिक स्पष्ट होतात.
नोट्स काढणं
वाचनानंतर पेपर पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ, वर्णनात्मक, आकृत्या,गणितीय प्रश्न असे प्रश्न संच मुलांकडून तयार करुन घेणं.याचा फायदा नक्कीच होतो.
शिक्षणात असं म्हटलं जातं की
मी ऐकलं मी विसरलो,
मी वाचलं माझ्या लक्षात राहिलं,
मी लिहिलं मला समजलं.
हेच मुलांच्या यशाचं खरं गमक आहे.