व्हाईट सॉस
🍐🍋🍒🥦🥬🍑🍑
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दूध १ कप
लोणी १ टेबलस्पून
मैदा १ टेबलस्पून

मीठ व मिरेपूड चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती:
लोणी गरम करून ते करपू न देता त्यावर मैदा परतायचा. फार नव्हे. रंग पालटता कामा नये पण मैदा भाजला गेला पाहिजे. त्यात हलक्या हाताने दूध घालायचे. गुठळ्या होऊ न देणे. झाल्यास त्या मोडून काढणे. तो लवकरच घट्ट होतो. उकळी आल्यावर गॅस बंद करणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालतात.
भाज्या, सलाद, पास्ता वगैरेंमध्ये हा व्हाईट सॉस वापरतात. त्यात चीज किसून घातले तर चीझी सॉस पण मस्त लागतो.

मी मैद्याऐवजी अनेकदा तांदळाचे पीठ वापरते. चवीत फरक पडत नाही.

वाढणी/प्रमाण:
आवडीप्रमाणे
अधिक टिपा:
* यात कधी दालचिनीचा छोटा तुकडा, तमालपत्र, एखादा वेलदोडाही स्वादासाठी घालतात.

* हा सॉस करून फ्रीजमध्ये गार करून सलादमध्ये वापरता येतो.

** उकडलेल्या भाज्या, जसे बटाटा, दुधी, घेवडा, स्वीट कॉर्न, गाजर यांसोबत व्हाईट सॉसची चव छान लागते.