डिलिव्हरी झाल्यावर पहिल्या तासात बाळाला breastfeeding दयावे 👍 त्यानंतर बाळ बरेच दा झोपी जाते .
बाळाचे “feeding cues ” असतात .ह्याचा अर्थ बाळा ला भूक लागल्यावर काही सिग्नल्स देत असते त्याला फीडिंग cues म्हणतात ,ते काय असतात ते मी आता सांगते .
👶🏻1. Lip smacking ,ओठांची चोखण्या सारखी हालचाल करणे
2.👶🏻Head turning to look for breast _ डोके एकबाजूला वळवून स्तनाचा शोध घेणे
3.👶🏻Hand and fist moving to mouth _ हात आणि मूठ तोंडात घालायचा प्रयत्न करणे

4. 👶🏻Becoming more alert and active _ बाळ सतर्क होते आणि हालचाल करायला लागते
5 👶🏻Opening and closing of mouth _ तोंडाची उघडझाप करणे
हे सर्व आपल्याला लक्ष्यात आणून देतात की ,बाळ आता दूध पिण्यासाठी आसुसले आहे ,ह्या वेळेत लवकर त्याला आईने जवळ घ्यायला हवे आणि पाजायला हवे ,असे न झाल्यास मग शेवटचा उपाय म्हणजे बाळ जोरजोरात रडायला लागते ,तेव्हा मात्र शांत करून पाजायला घेणे कठीण जाते .
म्हणून ह्या feeding cues लवकर लक्ष्यात यायला हव्यात आणि त्या क्षणी बाळाला पाजायला घ्यायला हवं !
आता ह्या झाल्या बाळाच्या भुकेच्या सिग्नल्स !
आता बाळाची दूध पिण्याची पहिल्या आठवड्यातील क्षमता बघुयात!
👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
बाळाची tummy size ही पहिल्या दिवसापासून हळू हळू वाढत असते
Day 1,🌻एका द्राक्षा एवढा 🍇5ते 7 ml , एक ते दीड चहाचा चमचा
Day 3 .🌻एका लहान जांभळा एवढा 22 ते 27 ml
एक ते दीड टेबल स्पून
Day 7 .🌻एका टोमॅटो एवढा
45 ते 60 ml
1 महिना ..🌻एका मोठ्या अंड्या एवढा
80 ते 150 ml
ह्या प्रमाणात बाळाच्या पोटाची capacity वाढत जाते , म्हणून पहिल्याच दिवशी आईला दूध नाही म्हणून बाटलीभर वरचे दूध देणे किती चुकीचे आहे ते तुम्हाला कळेल ☺️
पहिल्या दिवशी बाळ सारखे झोपत असते आणि फक्त चमचाभर पहिला चीक ( colostrum) बाळाला पुरतो👍👍हे लक्षात घ्या
Babies day out of womb 😊😊😊
Day1 👶 Birthday Nap झोपून राहतो नुसता 😊
Day2 👶 Learning Day दूध प्यायला शिकणे 😊
Day 3 👶All day Buffet दिवस भर नुसते पितच राहणे 😢😢 ( आईला ला खरे आईपण कसे कठीण आहे त्याची झलक येते 😊 पण घाबरू नका ,तुम्हाला मदत करायला डॉक्टर आहेत ,कुटुंबीय आहेत )
Day 4/5 👶 Night owl 😢 घुबडाचे जीवन 🦉🦉
रात्रीची जागरणे ,बाळ दिवसा झोपते आणि रात्री जगावते 😊😊
Discharge झाल्यावर घरी पाहिले काही दिवस 😊😊
👩‍🦰 बाळ जेव्हा झोपेल तेव्हा तुम्ही झोपत जा ,जास्तीत जास्त रेस्ट मिळवायचा प्रयत्न करा
👩‍🦰 घरी येणारे पाहुणे मर्यादित करा ,किंवा सुरुवातीला नकोच ! त्यासाठी तुमच्या कुटुंबीयांची मदत घ्या
👩‍🦰घरचे काम करायला मदतनीस ठेवा ,आपल्याकडे माहेरी बाळंतपण करतात ते ह्यासाठीच की बाळंतिणीला आराम मिळावा
👩‍🦰परिपूर्ण आणि समतोल आहार घ्यावा ,त्यात कसर नको
👩‍🦰पाणी वारंवार पीत जा ,तहान सारखी लागत असते
👩‍🦰 दूध पाजण्याआधी comfortable आणि relaxed रहा
Dr कल्पना सांगळे
Breastfeeding series 3