Back to Top

सुप्त मनातील विचार

सुप्त मनातील विचार

आपल्या शरीरात सतत काहीतरी घडत असते. आतडी हालचाल करीत असतात, हृदयाची गती कमीजास्त होत असते. आपल्या जागृत मनाला हे काहीच जाणवत नसते. मेंदूचा एक भाग ‘अमायग्डला’ मात्र हे सतत जाणत असते. शरीरातील या संवेदना सुप्त मनाचा भाग आहेत असे आपण म्हणू शकतो. भावना निर्माण होतात त्या वेळी शरीरात बदल होतात. त्यामुळे या संवेदना अधिक तीव्र होतात. असे असून देखील भीती वगळता अन्य भावनांच्या संवेदना आपल्याला फारशा जाणवत नाहीत. Continue Reading

सहावा वस्तुमान लोप

सहावा वस्तुमान लोप

पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मिती काळापासून सुरुवात केली तर पृथ्वीवरील जीवांना आत्तापर्यंत एकूण पाच वेळा ‘वस्तुमान लोप’ या गोष्टीला सामोरे जावे लागले. त्याला केवळ नैसर्गिक कारणे होती. आता सहावा नामशेष/ वस्तुमान लोप होऊ घातला आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वस्तुमान लोप म्हणजे पृथ्वीवरील अनेक प्रजातींचा अगदी कमी काळात विनाश होणे अथवा त्या नामशेष होणे. खरे म्हणजे गेल्या काही दशकांतील वन्यजीवांच्या प्रजातींचा विनाश पाहता सहावा मोठा नामशेष येऊ घातला आहे हे पटते. अर्थात यामध्ये मतमतांतरे आहेत. Continue Reading

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेस हा शब्द, पाली भाषेतील सति आणि संस्कृतमधील स्मृति या शब्दासाठी इंग्रजीत वापरला जातो. गौतम बुद्धाने महासतिपट्टणसुत्त सांगितले आहे. विपश्यना शिबिरात गोएंका गुरुजी ते समजून सांगत. असेच विपश्यना सदृश ध्यानाचे शिबीर अमेरिकेत डॉ. जॉन काबात-झिन्न यांनी सत्तरच्या दशकात केले. त्यामुळे त्यांची तणावामुळे असलेली पाठदुखी बरी झाली. त्यानंतर त्यांनी या तंत्राचा लाभ रुग्णांना करून देण्यासाठी त्याला काही योगासनांची जोड देत ‘माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’ Continue Reading

फुलपाखरू जन्माची गाथा

फुलपाखरू जन्माची गाथा

इतर सर्व सजीवांपेक्षा फुलपाखरू जन्माची गाथा ही थोडी निराळीच म्हणावी लागेल. कारण फुलपाखराचा जन्म हा नुसता जन्म नसून ते अवस्थांतर किंवा स्थित्यंतर आहे. अंडी- अळी- कोष- फुलपाखरू अशा विविध अवस्थांमधून जाणारं हे अवस्थांतर! फुलपाखराची मादी खाद्य वनस्पतीवर अंडी घालते, मग या अंडय़ांमधून अळी बाहेर पडते.

नवजात बाळाकरिता आईचं दूध हे जसं प्रथम अन्न म्हणून समजलं जातं त्याचप्रमाणे फुलपाखराच्या अंडय़ांची टरफलं हे त्या फुलपाखराच्या अळीचं प्रथम अन्न होय. फुलपाखराच्या जीवनक्रमातील अळी ही एकमेव अशी अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये ‘तोंड’ असतं. म्हणूनच मग अळी त्या खाद्य वनस्पतीची पानं खायला सुरुवात करते. प्रचंड वेगाने पानांचा फडशा पाडत असते. पुढील सर्व आयुष्याला पुरेल एवढी शक्ती व सुदृढ शरीराची काळजी तिला याच अवस्थेत घ्यायची असते. झाडाची पानं खात असताना बाहेर पडणारी फुलपाखराच्या अळीची विष्ठा हे एक उच्च दर्जाचं नैसर्गिक खत म्हणून गणलं जातं. या अवस्थेत अळीची वाढ अत्यंत जोमाने सुरू असते. Continue Reading

माणसाचे वेगळेपण

माणसाचे वेगळेपण

वर्तन चिकित्सा ही संशोधनावर आधारित चिकित्सापद्धती आहे मात्र हे संशोधन प्रामुख्याने प्राण्यांवर केले जात असे. प्रयोगशाळेत वर्तन पाहता येते, मोजता येते त्यामुळे संशोधनात त्यालाच महत्त्व दिले जाऊ लागले. भावना आणि विचार हे दाखवता येत नसल्याने ते नाकारले जाऊ लागले. मात्र त्यामुळे माणसाची इच्छा, प्रेरणा यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. नवीन कल्पना कशा सुचतात, माणूस त्याग का करतो, कष्ट सहन करीत कठोर परिश्रम का करतो याची उत्तरे वर्तन चिकित्सा देत नाही.

त्यामुळे १९४०मध्ये कार्ल रॉजर्स यांनी मानवकेंद्रित मानसशास्त्र आणि समुपदेशन यांचा पाया घातला. आत्मभान, सर्जनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य अशा मानवी संकल्पनांना महत्त्व देत अब्राहम मास्लो यांनी या शाखेचा विस्तार केला. त्यांनी सांगितलेला गरजांचा पिरामिड आजही व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. याच परंपरेतील व्हिक्टर फ्रांक यांनी स्वत:च्या उदाहरणातून हे दाखवून दिले की माणसाचे वर्तन हे अन्य प्राण्यांसारखे चाकोरीबद्ध नसते. अन्य प्राण्यांची प्रतिक्रिया ही ठरलेली असते. माणूस मात्र अंध प्रतिक्रिया न देता वेगवेगळा प्रतिसाद निवडू शकतो. Continue Reading

चिमणीसाठी विकतचे घरटे नको

चिमणीसाठी विकतचे घरटे नको!

हल्ली विविध ठिकाणी आपल्याला पक्ष्यांकरिता घरटी विकत मिळू लागली आहेत. अनेकदा ती घरटी सजवलेली अगदी प्लायवूडने सुशोभित केलेली असतात. त्या घरटय़ांच्या किमतीही भन्नाट असतात. सहज म्हणून ती घरटी विकत घेणाऱ्यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांच्या बोलण्यात अभिमान होता, त्यांना वाटत होते की ते निसर्गाची सेवा करत आहेत.

चिमण्या हरवत आहेत. आपल्या परिसरातील चिमण्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. चिमण्या अदृश्य होण्याची अनेक कारणे आहेत. चिमण्यांना मिळणारे अन्नकण कमी झाले आहेत. पूर्वी इतस्तत पडलेले धान्य निवांतपणे टिपायला चिमण्या यायच्या. आता इतस्तत: पडलेले अन्नकण कमी झाले आहेत आणि निवांत टिपायला घराला अंगण राहिले नाही. चिमण्यांना मिळणाऱ्या अन्नकणांत म्हणजे टिपायच्या दाण्यांमध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्ह व विष इतके असते की कित्येक चिमण्या ते खाऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. चिमण्या झुरळ व इतर उपद्रवी कीटकही खातात, परंतु आज या सर्व कीटकांना विष घालून मारले जाते. मग ते खाऊन चिमण्यांना मरावे लागते. Continue Reading

मनातील सुगंध

मनातील सुगंध

आपले मन घरासारखे आहे. त्यातील बाहेरची खोली म्हणजे जागरूक मन आणि आतील खोली म्हणजे सुप्त मन. या सुप्त मनातील कचरा स्वच्छ करण्यासाठी मनात येणाऱ्या विचारांकडे आणि शरीरातील संवेदनांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे आवश्यक असते. असे करणे म्हणजे कचरा शोधून तो साफ करण्यासारखे आहे.

घरात कचरा खूप साठला असेल आणि दुर्गंधी येत असेल तर तो साफ करताना आपण मुद्दाम सुगंध निर्माण करण्यासाठी अगरबत्ती लावतो, रूम फ्रेशनर मारतो. शरीराला येणाऱ्या घामाचा वास कमी करण्यासाठीदेखील परफ्यूम मारतो. तसेच मनाच्या आरोग्यासाठी कर्ताभाव ठेवून समाधान, प्रेम, भक्ती, कृतज्ञता, क्षमा यांसारखे सुखद भाव मनात काही वेळ धरून ठेवणे आवश्यक असते. सर्व उपासना पद्धतीमधील प्रार्थना यासाठीच आहेत. दुर्दैवाने आरत्या मोठ्ठय़ा आवाजात म्हटल्या जातात. प्रेम,आर्तभक्ती या भावना मनात धारण करणे आवश्यक आहे हे लक्षात घेतले जात नाही. Continue Reading

वजाबाकी करण्याची एक ट्रिक

वजाबाकी करण्याची एक ट्रिक : __

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट घेताना १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

10, 100, 1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
9-7 = 2
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326 Continue Reading

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ)

नुकतीच एक बातमी वाचली….
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षाला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात?”
मुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.
मी विचारले ‘का?’,
मुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”
मी समीकरण मांडले. Continue Reading

टीप

टीप
टेबल वर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला.
तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते, किवा ओळख दाखवत नव्हते.
चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉप मध्ये.
कदाचित आत्ताच झालेल्या डील ची आकडेमोड चालली होती.
शाळेतील मित्र खुप पुढे निघून गेले होते, आणि स्वतः मात्र कॉलेज पर्यंत सुद्धा पोहचू शकला नव्हता.
नंतर दोन तीन वेळा त्यांच्या टेबल वर तो गेला, पण सुखदेव ने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले.
चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले.
आता परत कधी इकडे न आले तर बर, असा विचार त्याच्या मनात आला.
स्वतःच्या निष्फलते मुळे शाळेतील मित्रांना ओळखसुधा दाखवता आली नाही, म्हणून सुखदेव ला फार वाईट वाटले.
सुखदेव, टेबल साफ कर. तीन हजारचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यानी, मॅनेजर वैतागून बोलला.
टेबल साफ करता करता सुखदेव ने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला,
त्या चार बिझनेस मननी पेनानी कदाचित त्या नॅपकिन वर पण आकडेमोड केली होती.
पेपर टाकता टाकता सहज त्याच्या कडे लक्ष गेले,
त्यावर लिहिले होते….
तुला टीप द्यायला आमचा जीव झाला नाही, ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील, तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढतोय हे कस वाटते❓
आपण तर शाळेत एकमेकाच्या डब्ब्यातून खाणारे,
आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस,. फॅक्ट्रिमध्ये कॅन्टीन तर कोणालातरी चालवलीच पाहिजे ना❓
शाळेतील तुझेच मित्र.
खाली कंपनीचे नाव आणि फोन no. लिहिला होता.
आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या टीप ला सुखदेव नी ओठांना लावून तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.

THIS IS THE QUALITY OF REAL FRIENDS