Pregnancy कन्फर्म झाली की ती पुढे जाऊ द्यायची की नाही? ह्याचा निर्णय हा आई आणि बाबांनी मिळून घ्यायचा असतो .आपण भावनिक ,शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने ही नवीन जबाबदारी पेलायला सक्षम आहोत का ? ह्याचा विचार व्हावा .तसेच जसे पूर्वी एकत्र कुटुंब असायचे ,त्यामुळे मुले सांभाळणे ही जबाबदारी एकट्या आईवर पडत नसे ,किंबहुना तिच्याकडे मुल फक्त स्तनपानासाठीच आणले जायचे , इतर वेळेस ती आपली दुसरी कामे करू शकत असे .पण आता ती परिस्थिती नाही ,त्यामुळे बाळाची जबाबदारी घेण्याअगोदर हा विचार नक्कीच केला जावा .

असे न झाल्यास ,बरेचदा मग आई ची चिडचिड ,डिलिव्हरी नंतर जो आराम हवा असतो तो न मिळणे , रात्रीचे जागरण , वेळेवर जेवण न करणे , ऍसिडिटी ,त्यामुळे उलट्या , त्यात बाळाचे रडणे , आईच्या शरीरातील हार्मोन बदलामुळे येणारे डिप्रेशन ह्या अनेक गोष्टी पुढे ठाकतात ! अशावेळेस कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरतो .तो न मिळाल्यास बाळाचे ही हाल होतात ,आईला स्ट्रेस मुळे दूध कमी येणे ,मग वरचे दूध चालू करणे ,ते बाळाला पचायला त्रास होणे ,आणि मग परत ते बाळ रडत राहणे ,ह्या दुष्ट चक्रात ते कुटुंब पडते !आणि ह्या सर्व परिस्थिती ,आपल्याला काहीच करता येत नाहीये असे समजून भांबावलेला बाळाचा बाबा आणि नंतर त्याचीही अनेक रात्री झोप न झाल्यामुळे होणारी चिडचिडी मानसिकता !
लक्ष्यात घ्या ,ही परिस्थिती टाळण्याजोगी नक्कीच आहे 👍😊 वेळेत घेतलेले उपचार , बालसंगोपणाचे नियोजन , कुटुंबाचा सहभाग , आई आणि वडिलांनी दोघांनी नक्की काय कामे करायची आहेत ह्याची आधीच घेऊन ठेवलेली माहिती , prenatal classes किंवा कोन्सल्लिंग , ह्या विषयांवरची पुस्तके ,व्हीडिओ , आणि आपल्या gynac कडून वेळोवेळी घेतली जाणारी काळजी आणि योग्य माहिती, त्याच बरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या बालरोगतज्ज्ञांच्या सूचना व्यवस्थित पाळायला हव्यात.ह्या सर्वांमुळे आईचे ,बाळाचे आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील 😊😊
Planning ,management and execution is the key for good and happy parenting 😊
Dr Kalpana Sangle