Back to Top

Tag Archives: पुस्तक परिचय

रामराम

रामराम

रामराम ही अभिवादनाची पुरातन रीत आहे. खेड्यापाड्यांत अजूनही रामराम करणारी अनेक मंडळी आढळतात. प्रत्येक प्रहराला बदलते अभिवादन ही इंग्लिश लोकांची रीत आहे. गुड मॉर्निंग ते गुडनाईट असा हा त्यांचा सदिच्छा प्रवास असतो.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री. अरविंद इनामदार प्रत्येक वेळी रामराम म्हणतात. गेल्या वीस वर्षात त्यांच्या मुखातून अभिवादनाचा अन्य कोणता शब्द त्यांनी उधारल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

कुसुमाग्रजांच्या तोंडून अगदी अभावितपणे बाहेर पडणारा श्रीराम हा स्वगत उद्गार आणि अरविंद इनामदारांचा, रामराम ही वाणीभूषणे होत.

तुकाराम महाराजांनी एका अभंगात लोकांचा निरोप घेताना म्हटले होते, आम्ही जातो आमच्या गावा। आमचा राम राम घ्यावा।। Continue Reading

” साऊ “

!! ” साऊ “…!!

पत्र लिहिणे हे आजकाल आपण सारेच विसरत चाललोय. मात्र कधीकाळी पत्र हेच संपर्काचे व सानिध्याचेही माध्यम होते आपल्या समाजात. एक वेळ अशीही होती की , वर्षानुवर्षे पती पत्नी बोलतही नसत की एकमेकांचा हात इतरासमोर हाती देखील घेऊ शकत नसत. अशावेळी पत्र लिहून एकमेकांना आपल्या भावना पोचवल्य जायच्या . ते पण कधी तर दोघांपैकी कुणी एक परगावी जाई तेव्हाच . सावित्री – जोतीराव यांचे सहजीवन एका संपूर्ण पुस्तकाचाच विषय आहे.या सहजीवनात देखील एक बाब आहे की , त्या काळात सावित्रीने जोतीरावांना पत्र लिहिली आहेत. पण उपलब्ध असणारी तीन पत्रे हा खरेतर त्या दोघांच्या सहजीवनाचा कसलाही विषय नसून समाजातील विविध घडामोडींची माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहेत. इतके ” समाजमय गुंतणे ” सावित्री जोतीरावांनी त्यांच्या जीवनात अवलंबले होते. सावित्रीची तीन पत्रे काही वेगळ्या मुल्यमापनातून पाहण्याची गरज आहे.,,.पाहूया. Continue Reading

आनंद लांबणीवर टाकणारी माणसं “

” आनंद लांबणीवर टाकणारी माणसं ”
✍️
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.
दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

‘साहेब, जरा काम होतं.’

‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. Continue Reading

आदिवासींना समजून घेताना

अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेलं राजेश पाटील लिखित ‘मोर ओडिशा डायरी’ हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे ओडिशारख्या पूर्ण अनोळखी, मागास भागांत मानल्या जाणाऱ्या राज्यात एक आयएएस अधिकारी कसं काम करतो. तिथल्या आदिवासीबहुल-नक्षलग्रस्त भागांत काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो याची गोष्ट. याच पुस्तकातील काही मजकूर वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

आदिवासींना समजून घेताना

___________

नारायणपाटनाच्या घटनेमुळे अचानक माझी कोरापुतला बदली झाली होती. कोरापुतमधले पहिले काही महिने त्या समस्येवर उपाय योजण्यातच गेले. त्यानंतरच कोरापुतच्या आदिवासींशी, त्यांच्या संस्कृतीशी जवळून ओळख करून Continue Reading

शकारी

शकारी

शकारी विक्रमादित्य म्हणजेच दुसरा चंद्रगुप्त मौर्य याची जीवनगाथा

लेखक: जनार्दन ओक

मूल्य: ३९०₹ टपाल ३०₹ एकूण ४२०₹ घरपोच

 

चंद्रगुप्त द्वितीय हा गुप्त घराण्यातील दुसरा श्रेष्ठतम राज्यकर्ता होता. समुद्रगुप्ताने सुवर्णयुगाचा पाया घातला तर चंद्रगुप्ताच्या कारकीर्दित वैभवशाली सुवर्णयोगच अवतरले होते. त्याच्या कालखंडापर्यंत विस्तारवादाची प्रक्रिया पूर्ण होऊन विशाल साम्राज्यांची निर्मिती झाली. आर्थिक समृद्धीने उच्चांक गाठला होता. राजकीय स्थैर्य आणि सुबत्तेमुळे Continue Reading

ब्रह्मांड- पुस्तक परिचय

ब्रह्मांड

उत्पत्ती, स्थिती, विनाश

लेखक: मोहन आपटे

मूल्य २७५₹ टपाल ३५₹ एकूण ३१०₹

विश्वाची उत्पत्ती आणि सद्य:स्थिती या संबंधात अनेक मतभेद आहेत. विश्वनिर्मितीचा महास्फोट सिद्धांत आज तरी सुप्रतिष्ठित झाला आहे. अर्थातच प्रस्तुत ग्रंथात महास्फोट सिद्धांतामधील संकल्पनांना अग्रस्थान मिळाले आहे. भविष्यकाळात महास्फोट सिद्धांताला बाजूला सारून एखादा नवीन सिद्धांत पुढे येईल, काही सांगता येत नाही. म्हणून विश्व स्वरूपाच्या इतरही संकल्पना माहिती असायला हरकत नाही. त्याप्रमाणे महास्फोट सिद्धांताबरोबर विश्वोत्पत्तीच्या इतर काही महत्त्वाचा सिद्धांतांना या पुस्तकात स्पर्श केला आहे. Continue Reading

‘कुलामामाच्या देशात’-पुस्तक परिचय

‘कुलामामाच्या देशात’ एक अदभूत वन कथा संग्रह
———————————————–
लेखक: जी बी देशमुख

पृष्ठ:१३५ मूल्य:२००/ टपाल:३५/ एकुण:२३५/

पुस्तक परिचय लेखन: श्री वा. पां.जाधव

मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेले “कुलामामाचे देशात “हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. दिवसेंगणिक या पुस्तकाला वाढते समिक्षण वाचून परत वाचण्याचा मोह झाला. Continue Reading

हरवलेले पुणे-पुस्तक परिचय

हरवलेले पुणे

मूल्य ४००₹ टपाल ३०₹ एकूण ४३०₹

हरवलेल्या पुण्याची ही माहिती पुन्हा पुन्हा सांगणे फार जरुरीचे आहे ; कारण आता तर काळाच्या अनाकलनीय ओघात बरेच काही फार चटकन हरवून जात आहे . स्मरणशक्तीलासुद्धा मर्यादा असतात . जुन्या गोष्टी विस्मृतीत जायलाही फार वेळ लागत नाही .

त्याचप्रमाणे अक्षय्य टिकवण्यासाठी कोणत्याही गोष्टीला उजाळा हवाच , आपल्या पुणे शहराचा समृद्ध वारसाही सतत नव्या पिढीच्या नजरेसमोर असला पाहिजे , तरच त्यांना त्याची जाणीव राहील .

हा विषय इतिहासाच्या बासनात गुंडाळून ठेवण्याचा नव्हे किंवा संशोधकांच्या मनोरंजनाचा खेळ नव्हे . प्रत्येक पुणेकराच्या मनात तेवती राहणारी ही एक अस्मिता आहे . ती जपलीच पाहिजे . Continue Reading

तुम्ही बदलू शकता सकारात्मक बदलाची ५० सूत्रे

तुम्ही बदलू शकता

सकारात्मक बदलाची ५० सूत्रे

लेखक: शिवराज गोर्ले

मूल्य २५०₹ टपाल ३५₹ एकूण २८५₹

 

तुम्ही बदलू शकता… थोडं स्वतःला, थोडं जगाला.

स्वतःला का बदलायचं? तर इतरांना आपण बदलू शकत नाही म्हणून! थोडं का बदलायचं – तर तेवढेच शक्य असतं म्हणून.

बदल तर आवश्यक असतोच.

आपल्या प्रत्येकाचा व्यक्तिमत्वात काही गुण असतात काही दोष. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर गुणांची बेरीज करावी लागते – दोषांची वजाबाकी. थोडक्यात, स्वतःला बदलावं लागतं.

आणखीन एक – काळ तो सतत बदलत असतो. असं म्हणतात बदल हाच तर जगाचा स्थायीभाव असतो.

साहजिकच काळानुसारही स्वतःत काही बदल करावे लागतात. जे बदलत नाहीत, ते आहेत तिथेच राहतात…. किंबहुना काळाच्या प्रवाहात मागे फेकले जातात. Continue Reading