Pregnancy कन्फर्म झाली की ती पुढे जाऊ द्यायची की नाही? ह्याचा निर्णय हा आई आणि बाबांनी मिळून घ्यायचा असतो .आपण भावनिक ,शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने ही नवीन जबाबदारी पेलायला सक्षम आहोत का ? ह्याचा विचार व्हावा .तसेच जसे पूर्वी एकत्र कुटुंब असायचे ,त्यामुळे मुले सांभाळणे ही जबाबदारी एकट्या आईवर पडत नसे ,किंबहुना तिच्याकडे मुल फक्त स्तनपानासाठीच आणले जायचे , इतर वेळेस ती आपली दुसरी कामे करू शकत असे .पण आता ती परिस्थिती नाही ,त्यामुळे बाळाची जबाबदारी घेण्याअगोदर हा विचार नक्कीच केला जावा .