आपुला संवाद आपणासी

आत्मसंवाद कसा कराल

लेखक: शाड हेल्मस्टेटर

अनुवाद: रोहिणी पेठे

मूल्य: २२५₹ टपाल ३५₹ एकूण २६०₹

तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणणारी आणि आयुष्य जगण्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात देणारी आत्मसंवादाची साधीसोपी पण महत्वाची तंत्रं

आत्मसंवाद ही संकल्पना मानवी मेंदूला माहिती कशी मिळते आणि ती तो कशी स्वीकारतो याबाबत अत्याधुनिक वैज्ञानिक घडामोडींवर आधारित आहे . आयुष्यच बदलवून टाकणाऱ्या या पुस्तकात आत्मसंवाद या क्रांतीकारक तंत्राचा वापर कसा करायचा हे सांगण्यात आला आहे . या तंत्रामुळे मेंदूतील नकारात्मक आणि हानीकारक प्रोग्रॅमिंग काढून त्या जागी नवे सकारात्मक प्रोग्रॅमिंग कसे करायचे आणि तुमचे आयुष्य आनंददायी आणि थरारक कसे बनवायचे याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे .

जुन्या | शब्दासाठी नवीन शब्द असे अनोखे तंत्र या पुस्तकात देण्यात आले आहे . आपल्या अर्धबोधावस्थेतील मनामधील आणि मेंदूच्या नियंत्रण केंद्रातील जुने विचार या तंत्रामुळे काढता येतात आणि त्या जागी नव्या सूचना रुजवता येतात , नवे प्रोग्रॅमिंग केले जाते . तुमच्या मेंदूला मिळणाऱ्या निःशब्द , बोललेल्या किंवा लिहिलेल्या सर्व प्रकारच्या संदेशांवर नियंत्रण ठेवता आले तर तुम्हाला त्यातूनच वर्तनामध्ये कायमस्वरूपी बदल घडवता येतो .

तुमच्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या पुस्तकामुळे नाट्यमय सुधारणा घडून येईल :

• चांगले वाटेल , जास्त यश मिळेल .
• कामाच्या ठिकाणी आणि घरी तुम्ही चांगली कामगिरी कराल
• भीतीवर मात कराल
• वाईट सवयी सुटतील
• अपायकारक जीवनपद्धती बदलेल
• तुमच्यात अधिक आत्मविश्वास निर्माण होईल
• आणखीही बरंच काही …

शाड हेल्मस्टेटर , पीएच.डी. अत्यंत नावाजलेले मानसशास्त्रज्ञ , आत्मसंवाद या विषयातील एक अधिकारी व्यक्ती स्वयं व्यवस्थापन , वैयक्तिक विकास आणि जीवनात निवड करायच्या गोष्टी या विषयावरील त्यांची पुस्तके सर्वाधिक खपाची ठरली आहेत .

शाड हेल्मस्टेटर ‘ आत्मसंवाद ‘ ( सेल्फ टॉक ) या ना – नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत . ही संस्था शाळा , उद्योग व्यवसाय आणि इतर संस्थांसाठी आत्मसंवाद कार्यक्रम विकसित करते . रेडिओ आणि टेलिव्हिजनवरील अनेक कार्यक्रमांत हेल्मस्टेटरना निमंत्रित केलं गेलं आहे . अमेरिकेतील ते एक लोकप्रिय वक्ते आहेत .