Back to Top

Category: Teachers

मी एक शिक्षक आहे!

सदर लेख माझा नाही…
पण नक्कीच वाचनीय असल्याचे वाटले म्हणून इथे सप्रेम सादर…

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. 😊

मी एक शिक्षक आहे!
आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकांन उंचावतात. थोडा हेवा वाटतो.
काश! मै भी टिचर होता… 😊
येतंच त्यांच्या मनात.
का येऊ नये?
इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधून-मधून कायम आठवतात. 🥰

वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही.

मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो.
मी शाळेत आहे… शाळेत जात आहे….. हे सांगणं किती मस्त वाटतं. 🥰

मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. मलाही मुलांसारख्या सुट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते.
विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. एकदम…. क ss ड ss क. 👍

एकंदरीत काय तर… शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते.

इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्षक खूपच प्राजक्ती वाटतात. बाईंचा गजरा मुलींसाठी कौतुकाचा विषय असतो.
नव्या कोऱ्या पोताची, परीटघडीची साडी. बाई आणि आई यांनाच शोभून दिसते. 🙏🏻

कंबरेला पदर खोवून बाई जेव्हा खो देतात तेव्हा त्या…. मुलांमध्ये मूल होऊन जातात. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी… कबड्डी… म्हणत सर स्वार होतात… आणि मुलांकडून मस्त पकडले जातात तेव्हा तेही मनसोक्त हसतात. जगण्याचा उत्सव हा मुलांमुळे शिक्षकांना प्राप्त होतो. 😊

निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतात. काय असतात यांचे ऋणानुबंध?
कळत नाही… 😢

काहीही म्हणा…. हे पुण्य फक्त शिक्षकालाच लाभले. 🙏🏻

बहुतांश शिक्षक खेड्यापाड्यात शिकले घडले. त्यांनी शहरी मुलांनाही घडवले. खेड्यातील मुलांनाही.
सर… बाई… मुलांचे कायम आदर्श राहिले आहेत. म्हणून तर त्यांच्या घरी मुलांची कायम गर्दी असते. मुलं ज्याम भारी असतात. 🥰

हे सारं असं होतं….
मग अभिमान वाटु लागतो… मी शिक्षक असल्याचा…
आचार्य चाणक्य शिक्षक होते…
सावित्रीबाई शिक्षिका होत्या…
महात्मा फुले शिक्षक होते…
नामदार गोखले शिक्षक होते…
केशवसूत शिक्षक होते…
डॉ. ए. पी. जे. कलाम, आचार्य अत्रे शिक्षक होते…
ताराबाई मोडक… अनुताई वाघ शिक्षिका होत्या…
श्री. साने गुरुजी शिक्षक होते…
आज मीही शिक्षक आहे. अभिमान आहे. 😊

का नाही लोकांना हेवा वाटणार. वाटणारच…
ते विचारतील… कसं काय बुवा हे झालं?
त्यांना मस्त नामदेवांचा अभंग ऐकवावा.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 🙏🏻

सर्व शिक्षकांना समर्पित
🙏🙏🌹🌹

मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरून बसतोस. लक्ष दुसरीकडेच. मन एकाग्र केलंस तरच कळेल न तुला. हे एकाग्र करणं, concentrate करणं काय असतं कुणास ठाऊक? आई बाबांना असं का वाटतं मुख्य म्हणजे हे एकाग्र कसं व्हायचं असा प्रश्न मुलांना पडतो आणि मुलांचं Concentration कसं करायचं, कसं वाढवायचं हे टेन्शन पालकांना असतं.

आज जरा Concentration वर प्रकाश टाकू या…
मुलांची एकाग्रता मोठ्या माणसांइतकी नसते पण जर मनाला सवय लावली, ट्रेनिंग दिलं तर काॅन्स्नट्रेशन स्पॅन वाढू शकतो.

पहिला प्रश्न म्हणजे…

1)मुलांची एकाग्रता (Attention span)किती दीर्घ असतो…?
मुलं एखाद्या गोष्टीवर किती काळ लक्ष एकाग्र होऊन शकतात? Continue Reading

अध्यापनाची खरी पद्धत…

अध्यापनाची खरी पद्धत…

एकदा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.

सर्वजन दिवसभर

व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?

स्पेलिंग पाठ करावेत की नाही?

कविता कशी शिकवायची?

अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे? Continue Reading

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदरांच्या मतांचे गणित ? घ्या जाणून. 🗳
भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड होणे आवश्यक आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सामान्य जनता मतदान करु शकत नाही. पण सर्व राज्यांचे आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची निवड करतात. आता राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते. आणि खासदार आमदारांच्या मतांना किती Continue Reading

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात या गमती जमती

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात
या गमती जमती

01. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.
02. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत कपडे मळणार नाहीत याची काळजी घ्या.
03. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या. Continue Reading

मुलांवर संस्कार कसा करावा??

मुलांवर संस्कार कसा करावा??
सिनेमे बघून, टीव्ही बघून, युट्युब, इंस्टा वगैरेमुळे मुलं बिघडतात हे तद्दन खोटं तर आहेच शिवाय एकूण समाजाने आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी मारलेली ही लोणकढी थाप आहे.
मुलांची जगण्याची रीत, नियम हे आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्यांच्या अकलनावर अवलंबून आहे. हे आकलन मुलांनी केलेली कृती, त्या कृतीला मिळालेला प्रतिसाद, त्यांना आजूबाजूच्या जगाविषयी आलेले अनुभव यांवर अवलंबून असते.

Continue Reading

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत शिक्षण, बालपणात प्रारंभ आणि प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यावर सुमारे पाच, सहा, किंवा सात वर्षांच्या वय

शिक्षणासाठी संस्थात्मक व्यवस्था जगभरात मोठ्या प्रमाणात बदलतात, जसे संस्थांना लागू केलेली नावे. सामान्यत: अर्भकांच्या काळजीसाठी केंद्राला दिलेल्या अटी – लहानपणाच्या पहिल्या टप्प्यातील (सुमारे तीन महिने ते तीन वर्षे वयाची) – अर्भक शाळा, डे केअर, डे नर्सरी आणि क्रेच , सर्वात सामान्य म्हणजे  नर्सरी शाळा आणि बालवाडी. सामान्यतः,बालवाडीच्या आधी (चार किंवा पाच ते सहा वयोगटांसाठी) , जे शालेय वयाच्या मुलांसाठी आहे ज्यांना पुरेसे परिपक्व मानले जात नाही आणि म्हणून ते प्राथमिक शाळेसाठी एक प्रकारची तयारी शाळा म्हणून काम करतात. बालवाडी प्राथमिक शिक्षणाचा एक भाग मानली जाते.

 

पूर्व प्राथमिक शिक्षण इतिहास Continue Reading

सर्व शिक्षा अभियान

सर्व शिक्षा अभियान

#6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
#1.1 दशलक्ष वसाहतींमधील 192 दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी, राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे.
#शाळा नसलेल्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे आणि शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणे असे उपक्रम या कार्यक्रमांर्गत राबवले जातात. Continue Reading

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

पुणे हे महाराष्ट्रातील मुख्य शैक्षणिक केंद्र आहे. भारत आणि जगाच्या कानाकोप यातून असंख्य विद्यार्थी पुण्यात येतात. इतर शैक्षणिक केंद्रांच्या तुलनेत हे शहर सुरक्षित आणि शांत शहर आहे. पुण्याचे वातावरण आरोग्यासाठी सुखद आणि चांगले आहे. पुणे शहरात अनेक नामांकित, स्थापित संस्था आणि महाविद्यालये आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शहरातील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय शैक्षणिक केंद्र आहे. हे विज्ञान, वाणिज्य, कला, भाषा आणि व्यवस्थापन अभ्यास Continue Reading

नवोदय विद्यालय

नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) ही मुख्यत्वे भारतातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती शाळांची एक प्रणाली आहे. नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली ही संस्था भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. जेएनव्ही पूर्णपणे केंद्रीय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित सीबीएसई (सीबीएसई) पूर्णपणे निवासी आणि सहा शैक्षणिक शाळा असून सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. जेएनव्हीला विशेषतः भारताच्या ग्रामीण भागात हुशार मुले शोधण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना उत्तम निवासी शाळा प्रणालीइतकेच शिक्षण प्रदान करण्याचे काम दिले जाते. ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल. विशिष्ट प्रतिभा किंवा योग्यता असलेल्या मुलांना त्यांच्या देय देण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून वेगाने प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे. अशा शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी भागांशी समान पातळीवर स्पर्धा करता येईल.एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारत व इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. हे लक्ष्य गट म्हणून प्रतिभावान ग्रामीण मुलांची निवड आणि निवासी शाळा प्रणालीतील गुणवत्तेच्या तुलनेत गुणवत्तेचे शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. Continue Reading