Back to Top

Category: Teachers

डार्विन आजोबांची शिकवणी

शास्त्रज्ञ घडतो तरी कसा ? एखाद्या व्यक्तीमध्ये काही मुलभूत प्रेरणा , कुतूहल दडलेले असते का ? शाळेत असताना हि सारी मंडळी नेहमीच चमकली का ? चला डार्विन च्या लहानपणापासून त्याचा मागोवा घेऊ यात. ऐकू यात डार्विन आजोबांची शिकवणी-भाग १ लेखक – डॉ अनिल अवचट हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.


Here a new project especially for Teenager kids and those who enjoy literature and knowledge.
डार्विन आजोबांची शिकवणी – डार्विनचा अदभूत प्रवास आणि त्याचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत गोष्ट रुपात समजून घेऊयात डॉ अनिल अवचट यांच्या लेखणीतून.
आपले आजचे जगणे, जगण्याची सुलभता याचा विचार केला की मग शास्त्र व शास्त्रज्ञ यांचा आपल्या जीवनावर असलेला प्रभाव दिसून येतो. त्यांचे हे उपकार आपण लक्षात ठेवतो का ? त्यांची आठवण ठेवतो का ? आपली समज इतकी छोटी की त्यांचे काम समजतच नाही. पण ते समजावून घेण्याचे कुतूहल तुम्हाला आहे का? डॉ अनिल अवचट किती साध्या सोप्या शब्दात इतका मोठा विषय आपल्याला उलगडून सांगतात. हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.

डार्विन आजोबांची शिकवणी – डॉ अनिल अवचट वाचन – प्रीतम रंजना, चित्रे – अर्णव गंभीर , तांत्रिक सहयोग – दीपक सातारकर

‘पंचपक्वान्नांचे भोजन’

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आपल्या आहारातील सहा रस पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थांवर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात.

लाडू…

या, लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.

लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू द्या.

करंजी..

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

चकली..

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

चिवडा..

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

(माझे फेव्हरेट) अनारसे..

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.

अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा

डिकोडिंग

पहले बच्चों को सूजी, मैदा और आटे में भेद करना सिखाइये

पहले बच्चों को मूंग, मसूर, उडद, चना और अरहर पहचानना सिखाइये

पहले बच्चों को मख्खन, घी, पनीर, चीज़ के बीच अंतर और उन्हें बनाने की जानकारी सिखाइये

पहले बच्चों को सोंठ और अदरक, अंगूर और किशमिश, खजूर और छुहारे के बीच का अंतर सिखाइये

पहले बच्चों को दालचीनी, कोकम, राई, सरसों, जीरा और सौंफ पहचानना सिखाइये

पहले बच्चों को आलू, अदरक, हल्दी, प्याज और लहसुन के पौधे दिखाइये

पहले बच्चों को मेथी, पालक, चौलाई, बथुआ, सरसों, लाल भाजी में फर्क सिखाइये

पहले बच्चों को फलों से लदे पेड़ों, फूलों की बगिया दिखाइए

पहले बच्चे को गाय, बैल, सांड का फर्क सिखाओ, गधे, घोड़े और ख़च्चर में अंतर समझाओ

पहले बच्चों को दिखाएं कि गाय, भैंस और बकरी से दूध कैसे दुहा जाता है।

पहले बच्चों को कीचड़ और मिट्टी में उलट पुलट होना सिखाइये, बरसात में भीगना और गर्मियों में पसीने से तरबतर होना सिखाइये

पहले बच्चों को बुजुर्गों के पास जाना, उनसे बातें करना, उनके साथ खेलना और मस्ती करना सिखाइये

बड़ों से तमीज़ से बात करना और घर के काम धाम में माँ-पिता का सहयोग करना सिखाइये

इन सब के बगैर आप बच्चों को कोडिंग सिखाना चाह रहे हैं तो आपका बच्चा ATM बनेगा, समस्याओं का

व्हाइटहैट जूनियर की जल्दी क्या है? कोडिंग भी सीख लेंगे, पहले डिकोडिंग तो कर लें, अपने आस-पास की…बचपन को ज़िंदा रखें, मरने न दें। हाथ जोड़कर निवेदन है।

डॉ अतुल अग्रवाल
बाल्य एवं शिशु रोग विशेषज्ञ

वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ

हा अतिशय वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ बघितला मी.
भारताची शान असलेल्या INS विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाची गायडेड टूर आहे सर्व माहितीसह पूर्ण ३६० डिग्री ३D मध्ये शूट केलेला आहे.
मोबाईल वर बघायला जास्त चांगला वाटतो. हातात मोबाईल घेऊन स्वतः भोवती गोल फिरवा, मोबाईल खाली वर करा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभे राहून स्वतःच सगळे बघत आहेत असा फील येतो. एक वेगळा व्हर्चुअल रिऍलिटी चा अनुभव मला आवडला म्हणून तुम्हाला शेयर केलाय.
कॉम्पुटरवर बघत असाल तर माउस क्लीक करून ड्रॅग करू शकता पण मोबाईलवर बघण्याची मजा त्यात नाही.

Pan tilt and move your phone as the video plays to get the 360° VR tour.

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’
#मुलांना_फुलू_द्या
– मनीषा उगले
‘Meaningfully engaging the classroom’ या मुद्द्यावर मनात आलेले काही विचार आपल्यासमोर ठेवते आहे.
मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे exactly काय अपेक्षित असतं आपल्याला?
वर्गात शिक्षक एकतर्फी अध्यापन करत नसतील, मुलांसोबत उत्तम interaction असेल तर तितका वेळ मुलं छान बिझी असतातच.
पण ज्यावेळी शिक्षकांना इतर काम असेल तर शिक्षक मुलांना काहीतरी काम देतात आणि गुंतवून ठेवतात. कारण मुलं रिकामी असली की गोंगाट करतील असं त्यांना वाटतं आणि एखाद्या वर्गातून गोंगाट ऐकू येणं हे शाळेत बेशिस्तपणाचं मानलं जातं.
मुलांना सतत गुंतवून ठेवणं अपेक्षित असल्याने अनेकदा मुलांवर ‘उपक्रमांचा’ मारा सुद्धा केला जातो.
एखाद्या वर्गात वर्गशिक्षक नसले तर ‘पाढे पाठ करा, स्वाध्याय सोडवा, वाचन करा किंवा गणितं सोडवा’ अशी सूचना दुसरे शिक्षक येऊन करतात. पण ‘तुमच्या आवडीचं काम करा, हवा असल्यास आराम करा’ अशी सूचना क्वचितच कोणी करत असेल. किती जपतो मुलांची मनं आपण?
मुलांना बिझी ठेवायचं असेल तर ते का ठेवायचं आहे? हे समजून उमजून आणि मुलांच्या चिकित्सक, सर्जनशील विचारप्रक्रियेला चालना देतील असे उपक्रम आपण डिझाईन करायला हवेत. (उपक्रम शब्दाची मी थोडी धास्ती घेतली आहे. उपक्रमाच्या नावाखाली हल्ली कोणत्या निरर्थक गोष्टीचा आपल्यावर मारा होईल हे सांगता येत नाही.)

Read more

*बालपण करपवू नका!* – _भाऊसाहेब चासकर_

*बालपण करपवू नका!*
– _भाऊसाहेब चासकर_
राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय यंदा सहा वर्षे ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील काही प्रवेश परीक्षांपासून वंचित राहतात किंवा एक वर्ष उशिराने पात्र ठरतात. पहिलीत प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे केल्याने मुलांचे नुकसान होते. ते पाच वर्षे करावे, असा पवित्रा घेत एका पालकाने याला आव्हान देणारी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. रवींद्र देशपांडे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. ऑनलाइन पिटिशनच्या माध्यमातून ते लोकसहभाग मिळवत आहेत. अनेक पालकांना त्यांचे मुद्दे पटत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शाळाप्रवेशाचे वय नेमके किती असावे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे, आयाम आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी.

Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला या धोरणानुसार देशात पहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1986 साली विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे स्थापित झाले आणि त्यास एन.टी.रामराव यांचे नांव दिले गेले.
महाराष्ट्र सरकारने नाषिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि भारतीय पध्दतीचे वैद्यकीय शिक्षण यांचा समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबध्दरित्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात हया विद्यापीठाची निर्मिती केली

Read more

नवोदय विद्यालय

नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) ही मुख्यत्वे भारतातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती शाळांची एक प्रणाली आहे. नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली ही संस्था भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. जेएनव्ही पूर्णपणे केंद्रीय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित सीबीएसई (सीबीएसई) पूर्णपणे निवासी आणि सहा शैक्षणिक शाळा असून सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. जेएनव्हीला विशेषतः भारताच्या ग्रामीण भागात हुशार मुले शोधण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना उत्तम निवासी शाळा प्रणालीइतकेच शिक्षण प्रदान करण्याचे काम दिले जाते. ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल. विशिष्ट प्रतिभा किंवा योग्यता असलेल्या मुलांना त्यांच्या देय देण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून वेगाने प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे. अशा शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी भागांशी समान पातळीवर स्पर्धा करता येईल.एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारत व इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. हे लक्ष्य गट म्हणून प्रतिभावान ग्रामीण मुलांची निवड आणि निवासी शाळा प्रणालीतील गुणवत्तेच्या तुलनेत गुणवत्तेचे शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे.
शिक्षण, बोर्डिंग आणि जेएनव्ही मधील उपक्रमांसाठीचे अर्थसंकल्प भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय पुरविते आणि 7 वर्षांच्या मुक्कामाच्या कालावधीत ते विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहेत.
तामिळनाडूचा अपवाद वगळता जेएनव्ही संपूर्ण भारतभर अस्तित्त्वात आहेत.] शैक्षणिक वर्ष २०१9 पर्यंत संपूर्ण भारतात अंदाजे 1 66१ आहेत. September० सप्टेंबर २०१ 6 पर्यंत देशात एकूण 65 636 जेएनव्ही कार्यरत आहेत आणि सुमारे २ लाख 65 65,574 students विद्यार्थी नोंदणीकृत आहेत आणि ग्रामीण भागातील आहेत. कामगिरीनुसार, 2019 मध्ये, जेएनव्ही सर्वात वरच्या क्रमांकाचे सी.बी.एस.ई. १० वी आणि १२ वीच्या वर्गवारीत अनुक्रमे .5 .5.77% आणि .6 %..6२% अशी शाळा आहेत.
इतिहास
जवाहर नवोदय विद्यालयांची कल्पना भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी कल्पना केली. सामाजिक न्यायासह उत्कृष्टता प्रदान करण्याच्या उद्देशाने भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात जेएनव्ही उघडण्याची संकल्पना राष्ट्रीय शिक्षणावरील राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून 1986 मध्ये जन्माला आली. त्यानंतर, नवोदय विद्यालय समितीची सोसायटी नोंदणी अधिनियम, अन्वये एक संस्था म्हणून नोंदणी झाली.
सरकारच्या धोरणानुसार, देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक जेएनव्ही स्थापित करणे आवश्यक होते. सर्वप्रथम, झज्जर (हरियाणा) आणि अमरावती (महाराष्ट्र) येथे १ 198 मध्ये दोन जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली गेली. सन २०१–-१– शैक्षणिक सत्रापर्यंत 57 576 जिल्ह्यांसाठी जेएनव्ही मंजूर करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, एसटी लोकसंख्येची मोठी लोकसंख्या असणा जिल्ह्यांमध्ये दहा जेएनव्ही मंजूर करण्यात आले आहेत, अनुसूचित जमातीची संख्या जास्त असणा जिल्ह्यांमध्ये दहा आणि मणिपूरमध्ये दोन विशेष जेएनव्ही मंजूर झाले असून यापैकी 591 जेएनव्ही कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये, अर्थविषयक मंत्रिमंडळाच्या समितीने (सीसीईए) उघडे असलेल्या जिल्ह्यांपैकी प्रत्येकामध्ये एक जेएनव्ही उघडण्यास मान्यता दिली. ते एकदा कार्यरत झाल्यानंतर जेएनव्हीची एकूण संख्या 660 वर आणेल
.
रमेश पोखरियाल ‘निशंक’ डॉ.
मा.शिक्षणमंत्री
मा(अध्यक्ष, एनव्हीएस
)
श्री संजय धोत्रे
मा.शिक्षण राज्यमंत्री
राज्यमंत्री, एचआरडी

श्रीमती. अनिता करवाल
सचिव

श्रीमती. लामचोंगोई स्वीटी चांगसन
जेएस (संस्था)
नवोदय विद्यालय समितीची उद्दीष्टे
शाळा स्थापन करणे, मान्यता देणे, देखभाल करणे, नियंत्रण करणे आणि व्यवस्थापित करणे (या नंतर ‘नवोदय विद्यालय’ म्हणून संबोधले जाते) आणि पुढील उद्दीष्टे असणा्या अशा शाळांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी सर्व कामे आणि गोष्टी करण्यासाठी:
दर्जेदार संस्काराचा एक मजबूत घटक, पर्यावरणाविषयी जागरूकता, साहसी क्रियाकलाप आणि शारीरिक शिक्षण यासह चांगल्या गुणवत्तेचे आधुनिक शिक्षण प्रदान करणे- ग्रामीण भागातील प्रतिभावान मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता.हिंदी आणि इंग्रजी सारख्या देशामध्ये समान माध्यमाद्वारे सूचना देण्यासाठी योग्य त्या टप्प्यावर सुविधा उपलब्ध करुन देणे. मानकांमध्ये तुलनात्मकता सुनिश्चित करण्यासाठी आणि आपल्या लोकांच्या सामान्य आणि संमिश्र वारसा सुलभ करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी सामान्य कोर्स-अभ्यासक्रम करराष्ट्रीय एकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक सामग्री समृद्ध करण्यासाठी प्रत्येक शाळेत देशाच्या एका भागातून दुसर्या शाळेत विद्यार्थ्यांना पुरोगामी आणणे.
सजीव परिस्थितीत शिक्षकांचे प्रशिक्षण देऊन अनुभव व सुविधा वाटून शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे केंद्रबिंदू म्हणून काम करणे.
नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानासाठी वसतिगृहे स्थापन करणे, त्यांची देखभाल व देखभाल करणे.
भारताच्या कोणत्याही भागात सोसायटीच्या ऑब्जेक्ट्सच्या भरभराटीसाठी आवश्यक असलेल्या इतर संस्थांना मदत करणे, स्थापित करणे आणि चालविणे
आवश्यक असणारी, प्रासंगिक किंवा समाजातील सर्व किंवा कोणत्याही वस्तूंच्या प्राप्तीसाठी अनुकूल वाटेल अशा सर्व गोष्टी करणे.
नवोदय विद्यालयांची ठळक वैशिष्ट्ये
जेएनव्हीएसटी: गुणवत्तेच्या आधारे प्रवेश
नवोदय विद्यालय गुणवंत मुलांपासून विद्यार्थ्यांचे सामर्थ्य काढतात, त्यांना गुणवत्ता चाचणीच्या आधारे निवडले जाते, ज्याला जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी म्हटले जाते, सुरुवातीला एनसीईआरटी आणि आता सीबीएसईने डिझाइन केलेले, विकसित आणि आयोजित केले होते. अखिल भारतीय तत्त्वावर आणि ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. ही चाचणी वस्तुनिष्ठ, वर्ग तटस्थ असून यासाठी प्रयत्न केला आहे की ग्रामीण मुले गैरसोय होणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी.
जागांचे आरक्षण
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलांसाठी आहे, ज्यामध्ये ग्रामीण मुलांसाठी किमान 75% जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि जमाती जमातीतील मुलांसाठी जागा आरक्षित आहेत परंतु राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी नाहीत. १/ 1/ जागा जागा मुलींनी भरल्या आहेत. 3% जागा अपंग मुलांसाठी आहेत.
विनामूल्य शैक्षणिक सह-शैक्षणिक निवासी शाळा

नवोदय विद्यालय सीबीएसईशी संबंधित आहेत आणि इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या प्रतिभावान मुलांना मोफत शिक्षण देतात. नवोदय विद्यालयात प्रवेश वर्ग-VI मध्ये वर्ग-नववी व बारावीच्या प्रवेशासह केला जातो. प्रत्येक नवोदय विद्यालय ही एक सह-शैक्षणिक निवासी संस्था आहे जे विद्यार्थ्यांना विनामूल्य बोर्डिंग व राहण्याची सोय, विनामूल्य शाळेचा गणवेश, पुस्तके, स्टेशनरी आणि विद्यार्थ्यांना रेल्वे व बसचे भाडे मोफत देतात. तथापि, नाममात्र शुल्क इयत्ता नववी ते बारावीच्या मुलांकडून शाळा विकास निधी म्हणून दरमहा शुल्क आकारले जाते.
तीन भाषेच्या सूत्रांचे पालन
नवोदय विद्यालयांची योजना तीन भाषेच्या सूत्रांच्या अंमलबजावणीची तरतूद करते. हिंदी भाषिक जिल्ह्यात शिकविलेली तिसरी भाषा ही विद्यार्थ्यांच्या स्थलांतरेशी संबंधित आहे. सर्व नवोदय विद्यालय तीन भाषा प्रादेशिक भाषा, इंग्रजी आणि हिंदी यांचे अनुसरण करतात.
शिक्षणाचे माध्यम
इयत्ता आठवी किंवा आठवीपर्यंत मातृभाषा / प्रादेशिक भाषा शिकवण्याचे माध्यम असेल. त्यानंतर सर्व नवोदय विद्यालयांमध्ये सामान्य माध्यम हिंदी / इंग्रजी असेल.
राष्ट्रीय एकात्मता प्रोत्साहन
नवोदय विद्यालयांचे स्थलांतर योजनेद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. स्थलांतर हे हिंदी आणि हिंदी-हिंदी भाषिक जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांचे आंतर-प्रादेशिक एक्सचेंज आहे, जे इयत्ता नववीमध्ये शैक्षणिक वर्षासाठी होते. विविधतेतील ऐक्यातून चांगल्या प्रकारे समृद्धी आणण्यासाठी आणि विविध क्रियाकलापांद्वारे समृद्ध सांस्कृतिक वारशाची समज विकसित करणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
जवाहर नवोदय विद्यालयांचे स्थान
नवोदय विद्यालय देशभरातील ग्रामीण भागात आहेत. राज्य सरकार नवोदय विद्यालय स्थापनेसाठी कायमस्वरुपी बांधकाम व विनामूल्य तात्पुरती इमारत
संस्थात्मक रचना
नवोदय विद्यालय, नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) ही मानव संसाधन विकास मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, सरकार, अंतर्गत सरकारच्या स्वायत्त संस्था चालविते. भारत समितीचे अध्यक्ष हे मनुष्यबळ विकास मंत्री आहेत. मानव संसाधन विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यकारी समितीच्या माध्यमातून कार्य करते. समितीला निधी वाटपासह सर्व बाबींच्या व्यवस्थापनासाठी कार्यकारी समिती जबाबदार आहे आणि समितीच्या सर्व अधिकारांचा उपयोग करण्याचे अधिकार आहेत. यास वित्त समिती आणि शैक्षणिक सल्लागार समिती या दोन उपसमित्यांद्वारे सहाय्य केले आहे. प्रशासकीय पिरॅमिडचे कार्यकारी प्रमुख हे आयुक्त असतात जे समितीच्या कार्यकारी समितीने ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करतात. त्याला मुख्यालय स्तरावर सह आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त सहाय्य करतात. समितीने त्यांच्या कार्यक्षेत्रात नवोदय विद्यालयांच्या प्रशासन व देखरेखीसाठी आठ क्षेत्रीय कार्यालये स्थापन केली आहेत. या कार्यालये एक उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आहेत. प्रत्येक जेएनव्हीसाठी, शैक्षणिक, पायाभूत सुविधा आणि इतर सामान्य क्रियाकलापांच्या मदतीसाठी एक विद्यालय सल्लागार समिती आहे आणि अर्थसंकल्प तयार करण्यासाठी, शिक्षकांची निवड करणे आणि शाळेच्या योग्य कार्यासाठी एक विद्यालय व्यवस्थापन समिती आहे. सामान्यत: संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे शालेयस्तरीय समित्यांचे माजी अध्यक्ष, स्थानिक शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील अधिकारी सदस्य म्हणून असतात. काही शाळांमध्ये शैक्षणिक कामगिरी पाहण्याकरिता एक विद्यालय समन्वय समिती देखील आहे.
प्रवेश
जेएनव्हीच्या सहावीच्या प्रवेशासाठी सीबीएसईने विकसित केलेली आणि तयार केलेली प्रवेश परीक्षा (जेएनव्हीएसटी) मध्ये पात्रता आवश्यक आहे प्रत्येक जेएनव्हीसाठी 80 सर्वात गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी सहावीसाठी जेएनव्हीएसटी दरवर्षी देशभरात घेण्यात येते. हे विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सत्र रचनेनुसार दर वर्षी तीन टप्प्यात आयोजित केले जाते. उमेदवार केवळ पाचवीच्या दरम्यान चाचणीसाठी अर्ज करू शकतात. प्रवेश परीक्षेतील स्पर्धेचे अनुमान असे काढले जाऊ शकते की जेएनव्हीएसटी २०१9 मध्ये एकूण १,87878.१5 हजार विद्यार्थी उपस्थित झाले आणि .4१..48 हजार विद्यार्थी निवडले गेले (म्हणजे जवळजवळ २% उत्तीर्ण टक्केवारी)] या चाचणीमध्ये मानसिक क्षमता कौशल्य, गणिताचा समावेश आहे. , आणि प्रादेशिक भाषा. एसव्ही आणि एससी (परंतु ओबीसी नाही) साठी आरक्षण समाविष्ट असलेल्या एनव्हीएस धोरणानुसार शाळा आरक्षण प्रदान करतात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची किमान निवड, शहरी भागातील जास्तीत जास्त २%, महिला विद्यार्थ्यांसाठी 33 33% निश्चित आणि 3. अक्षम उमेदवारांसाठी%.
जेएनव्हीचा परिसर

हे परिसर सामान्यत: शीतल वातावरणासाठी आणि शहरी केंद्राजवळील जमीन उपलब्ध नसल्यामुळे, शक्यतो अंतर्गभागामध्ये असतात. राज्य शासनाने प्रत्येक शाळेसाठी अंदाजे एकर (१२.१4 हेक्टर) जमीन नि: शुल्क उपलब्ध करुन द्यायची आहे. सामान्यत: शाळेमध्ये शैक्षणिक ब्लॉक, विद्यार्थी आणि कर्मचारी दोघांसाठी निवासी ब्लॉक, खेळाचे मैदान असते. शैक्षणिक ब्लॉकमध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक केंद्र आणि अधिवेशन हॉल असतात. निवासी इमारती विद्यार्थ्यांसाठी (सामान्यत: मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे), प्राध्यापक आणि कर्मचार्यांसाठी पुरविली जातात. राजीव स्मृती व्हॅन, भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ, सर्व एनव्हीएस परिसरांचा अविभाज्य भाग आहेत.

विज्ञान संवर्धन क्रिया
नवोदय विद्यालय समितीत विज्ञान अनुवर्ती आणि विद्यार्थ्यांना एसटीईएमला त्यांचे करिअर म्हणून निवडण्यासाठी प्रेरणा मिळणारे विविध अनुभव देण्यात आले आहेत. याअंतर्गत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये: चिल्ड्रन सायन्स कॉंग्रेस, अनेक शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभाग / आव्हाने / ऑलिम्पियाड्स, संशोधन संस्थांना भेटी, शाळांमधील टिंकरिंग लॅब, पर्यावरणीय क्रियाकलाप, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय एक्सपोजरची व्यवस्था करणे, समृद्ध आयसीटी समर्थन आणि उद्योजकीय कौशल्य प्रशिक्षण.

प्रादेशिक स्तरावर संशोधन संस्था आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांच्या सहकार्याने वार्षिक विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन दरवर्षी केले जाते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि गणितांसाठी शाळा, क्लस्टर, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन आयोजित केले जातात.
स्मार्ट वर्ग
सॅमसंग इंडियाच्या सहकार्याने नवोदय विद्यालयांनी नवोदय नेतृत्व संस्थांमध्ये स्मार्ट वर्ग सुरू केले. एक स्मार्ट क्लास सामान्यत: परस्पर स्मार्टबोर्ड, लॅपटॉप / टॅब्लेट, वाय-फाय कनेक्टिव्हिटी आणि पॉवर बॅकअपसह सुसज्ज असतो. एक स्मार्ट क्लास आकर्षक आणि संवादात्मक पद्धतीने संकल्पना स्पष्ट करण्यासाठी गणित, विज्ञान सामाजिक विज्ञान, इंग्रजी आणि हिंदीमधील नियमित धड्यांची पूरक आहे. शिक्षकांना उपकरणे प्रभावीपणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन

या शाळा सकारात्मक कृती धोरणाचे पालन करतात आणि वेगवेगळ्या भाषिक प्रदेशांमधून स्थलांतर करण्याचे धोरण असल्यामुळे भारताच्या विविध क्षेत्रांतील समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या एकत्रिकरणाद्वारे जेएनव्हीची सामाजिक चर्चा आहे. देशभरातून निवडलेले शिक्षक, त्याच कॅम्पसमध्ये राहतात आणि 24X7 च्या आधारावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात ज्यामुळे कौटुंबिक भावना निर्माण होते. क्रीडा, सांस्कृतिक कार्ये आणि युवा संघटनांच्या क्रियाकलापांसारख्या अवांतर उपक्रमांमुळे नवोदयांचे जीवन समृद्ध होते.
स्थलांतर
जेएनव्ही योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माइग्रेशन प्रोग्राम होय ज्यात वेगवेगळ्या भाषिक श्रेणीतील दोन जोडलेले जेएनव्ही त्यांच्यातील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करतात. एक्सचेंज प्रोग्रामचे उद्दीष्ट “राष्ट्रीय एकत्रीकरणाला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सामग्री समृद्ध करणे” आहे. योजनेनुसार, नववीच्या विद्यार्थ्यांपैकी निवडलेल्या 30% विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी वेगवेगळ्या भाषिक श्रेणींमध्ये (सामान्यत: हिंदी-भाषिक आणि हिंदी-भाषिक नसलेल्या राज्यांमधील) दोन जोडलेल्या जेएनव्ही दरम्यान एक्सचेंज केले जाते. स्थलांतर कालावधीत स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणा तीन भाषा त्यांच्या पालक जेएनव्ही प्रमाणेच राहिल्या आहेत, परंतु सामाजिक व सांस्कृतिक देवाणघेवाण त्यांच्या इयत्ता सहावी ते नववीच्या भाषेतल्या शिक्षणातून सुलभ होते. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थलांतर करण्याची कल्पना होती; 1991-92 मध्ये ते दोन वर्ष (इयत्ता नववी व दहावी) करण्यात आले. शेवटी 1996-97 मध्ये ते फक्त इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिले.
खेळ
जेएनव्ही क्रीडा प्रकारावर भर देतात. दररोजचे वेळापत्रक खेळ व इतर खेळाच्या क्रियाकलापांकरिता दिवसातून किमान दोन तास दिले जाते. प्रत्येक जेएनव्ही हँडबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, बॅडमिंटन, कबड्डी, हॉकी आणि क्रिकेटसाठी सुविधा प्रदान करते. कॅम्पसमध्ये टेबल टेनिस आणि बुद्धिबळ सारख्या इनडोअर खेळांसाठी व्यायामशाळा आणि बहुउद्देशीय हॉल देखील उपलब्ध आहेत. आंतरशालेय स्पर्धा वार्षिक, क्लस्टर, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि एसजीएफआय (स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया) पातळीवर आयोजित केल्या जातात.

सांस्कृतिक उपक्रम
सांस्कृतिक क्रियाकलाप जेएनव्ही चौकटीचा भाग आहेत. प्रत्येक शाळेत एक संगीत कक्ष आणि कला कक्ष उपलब्ध आहे. नृत्य, नाटक, वादविवाद, साहित्य इ. साठी आंतरशालेय स्पर्धा दरवर्षी क्लस्टर, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जातात.
स्काउटिंग आणि मार्गदर्शक, एनसीसी आणि एनएसएस
भारत स्काऊट्स गाईड्स (बीएसजी) द्वारे स्काउटिंग आणि मार्गदर्शक उपक्रमांसाठी नवोदय विद्यालय समितीची ओळख आहे. नवोदय विद्यार्थी नियमितपणे बीएसजीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. एनसीसीची स्थापना टप्प्याटप्प्याने जेएनव्हीमध्ये केली जात आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे.
संदर्भ
https://navodaya.gov.in/nvs/en/Academic/Stude
“तामिळनाडू मधील नवोदय”. हिंदू. 24 ऑक्टोबर 2011. 1
“ब्लूप्रिंट जेएनव्ही .
“जेएनव्हीची स्थापना”.
“२ years वर्षे आणि 9 58 schools शाळा नंतर राजीवने ग्रामीण भागातील चित्रे काढली”. टाईम्स ऑफ इंडिया. 21 जून 2015.
“एमएचआरडी वार्षिक अहवाल
“नवोदय विद्यालय समिती”. एनव्हीएस
“जवाहर नवोदय विद्यालय देशाच्या खुल्या जिल्ह्यात स्थापित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.”
“नवोदय विद्यालय स्मिती (एनव्हीएस) वर मूल्यांकन अभ्यास” (पीडीएफ).
जवाहर नवोदय विद्यालय, एनव्हीएस. “एनव्हीएसची क्षेत्रीय कार्यालये”. नवोदय विद्यालय समिती.
जवाहर नवोदय विद्यालय, एनव्हीएस. “एनव्हीएसची क्षेत्रीय कार्यालये”. एनव्हीएस
“जम्मू-काश्मीरमधील नवोदय विद्यालय”.
“जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी”. नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) 10 मार्च 2017
“सीबीएसई वार्षिक अहवाल २०१-16-१-16” (पीडीएफ). पृष्ठ 37-38.
“जेएनव्हीमध्ये ओबीसीसाठी कोणतेही आरक्षण विसंगती नाहीः केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री”. इंडिया टुडे. 17 जानेवारी 2017. 10 मार्च 2017
“नवोदय विद्यालय समितीवरील मूल्यांकन अभ्यास (सीएच -6)” (पीडीएफ). पीपी. 26-35. 17 मार्च 2017
“नवोदय विद्यालय समितीवरील मूल्यांकन अभ्यास (सीएच -15: उत्कृष्टतेसह शिक्षण)” (पीडीएफ). नीति आयोग, भारत सरकार. पृष्ठ 77-92. 18 मार्च 2017
“राष्ट्रीय एकात्मतासाठी विद्यार्थ्यांचे स्थलांतर”. एनव्हीएस, भारत सरकार 17 मार्च 2017 .
“एलएमध्ये सायन्स फेस्टमध्ये बंगळुरूच्या विद्यार्थ्यांचा भाग” टाईम्स ऑफ इंडिया. 14 मे 2014.
“नवोदय विद्यालय समितीवरील मूल्यांकन अभ्यास (सीएच -13)” (पीडीएफ). नीति आयोग, भारत सरकार. पीपी. 73-74. 15 मार्च 2017
“शैक्षणिक क्रियाकलाप”. एनव्हीएस 17 मार्च 2017 रोजी पुनर्प्राप
“खडू आणि ब्लॅकबोर्ड बदलणे” हिंदू. 6 जानेवारी 2017. 18 मार्च 2017 रोजी पुनर्प्राप्त.
“सॅमसंग स्मार्ट क्लास ग्रामीण भारतात डिजिटल साक्षरता घेते”. इकॉनॉमिक टाइम्स. 27 नोव्हेंबर 2016.
“जिथे दरवाजे शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी खुले आहेत”. टाईम्स ऑफ इंडिया. 28 जून 2016.
“कॅम्पमधील एनसीसी कॅडेट्सना रेस्क्यू ऑपरेशन टिप्स मिळतात”. हिंदू.
“नवीन विद्यालयाने आदर्श विद्यालय प्रकल्प सुरू केला”. हिंदू. 6 एप्रिल 2016. 18 मार्च 2017 रोजी पुनर्प्राप्त.

“स्वा.सावरकरांनी #मराठी भाषेला दिलेले शब्द”

“स्वा.सावरकरांनी #मराठी भाषेला दिलेले शब्द”

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
अद्ययावत (अप टू डेट)
महाविद्यालय (कॉलेज)
व्यंगचित्र (कार्टून)
प्रत,अनुलेख (कॉपी)
क्रीडांगण (जिमखाना)
दैनंदिनी (डायरी)
नौदल (नेव्ही)
छायाचित्र (फोटोग्राफ)
प्रतिकात्मक (सिम्बोलिक)
स्थानक (स्टेशन)
कुमारी,किशोरी (मिस)
प्रचारक (मिशनरी)
महापौर (मेयर)
गणवेश (युनिफॉर्म)
युध्द (वॉर)
प्रशाळा (हायस्कूल)
निर्माता (प्रोड्युसर)
मनुष्य (इसम)
वाईट,नीच (खराब)
प्रत्येक्ष (खुद्द)
दीन (गरीब)
साहाय्य (मदत)
शेठ,महाशय (साहेब)
अपराध (गुन्हा)
घाव,व्रण (जखम)
प्रकट (जाहीर)
प्रत,प्रतिष्ठा (दर्जा)
निरुपाय (नाईलाज)
अनुत्तीर्ण (नापास)
हानी,तोटा (नुकसान)
चिंता,काळजी (फिकीर)
देश (मुलुख)

आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, असंच प्रत्येकाला वाटत असतं. तर मग भाषा का अशी?

मेंदूशी मैत्री
शब्दांच्या नकारात्मक जोडण्या

काही घरांत मुलांना उद्देशून बरेचदा तुच्छ उद्गार ऐकू येतात. ‘तो हा असाच आहे मठ्ठ’, ‘तिला दोन वेळा समजून सांग, म्हणजे एकदा तरी कळेल’ , ‘किती मंद आहेस तू!’ असं बोलणं मुलांच्या कानावर सतत पडत असतं. हे खूपच साधेसुधे उद्गार इथे लिहिले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटींनी वाईट दूषणं, काही वेळा शिव्या आणि सोबत हाताचा वापरही चालतो. यामुळे वाढत्या वयातल्या मुलां-मुलींच्या मनात ‘आपले पालक जसे म्हणतात, तसाच मी असणार’, यावर विश्वास बसतो. कारण मुलांचं आईबाबांवर अतिशय प्रेम असतं. क्षणिक संतापातून उद्गारलेल्या शब्दातून त्यांच्या मनात केवढी खळबळ माजत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
लहान मुलांच्या मनात तर ‘आई / बाबा म्हणतात म्हणून आपण चांगले’/ ‘ते वाईट म्हणतात म्हणून आपण वाईट’ हे पक्कं होऊन बसतं. या संवादातून, प्रसंगातून त्यांचं मन घडत असतं.

मुलांच्या मनात स्वत:विषयीची प्रतिमा तयार होत असते. आत्मविश्वास निर्माण होण्याचा तो काळ असतो. आपण जसे आहोत, तसे खूप चांगलेच आहोत, याबद्दल त्यांच्या मनात काही दुमत नसतं. स्व-प्रतिमा दृढ होण्याचा हा काळ असतो. अशा वेळी दुसऱ्यांमधले दोष वास्तविक पद्धतीने सांगायला हवेत. अतिगोड किंवा अतिवाईट नव्हे; तर योग्य शब्दात सांगण्याची गरज असते. त्यांना न खचवताही हे काम आई-बाबा चांगल्या पद्धतीने करू शकतात. अभ्यासामुळे तर नात्यात दरी पडायलाच नको; किंवा आधीच दरी निर्माण झाली असेल तर ती रुंदावायला नकोच नको. शिक्षण हे महत्त्वाचं आहेच. शिक्षणाला नाकारून किंवा कमी महत्त्व देऊन चालण्यासारखं नाही. पण अडचणी समजून घ्यायला घेणंही तितकंच गरजेचं आहे. मुलांच्या मेंदूत न्युरॉन्समध्ये नकारात्मक शब्दांच्या जोडण्या तयार करण्याचं काम आसपासच्या माणसांकडून होत असतं. ते व्हायला नको.
आईबाबा जेव्हा शांतपणे, योग्य शब्दात मुलांशी प्रेमाने संवाद साधतात, तेव्हा ऑक्सिटोसिनच्या प्रभावामुळे मुलांच्या मनात आईबाबांबद्दल विश्वास निर्माण होतो. मुलं त्यांच्या सूचनांचा नक्कीच विचार करतात. स्वत:मध्ये असलेल्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण वाईट शब्दांचा सतत भडिमार केला तर त्यांना योग्य मार्ग सापडत तर नाहीच. उलट मानसिक गोंधळ मात्र वाढतो.