ऑफलाईन आई

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’  आवडते यावर निबंध लिहायला दिला.
प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.
मला एक “अशिक्षित” आई हवी आहे जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्याबरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा  “जास्त वेळ” असेल.

ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.
जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.

आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.
मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.

इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका  संपूर्ण वर्गात ऐकू आला.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि
वर्ग शिक्षकेंच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

🙏🏻 आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते परत कधीच येणार नाही.