टीप
टेबल वर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला.
तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते, किवा ओळख दाखवत नव्हते.
चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉप मध्ये.
कदाचित आत्ताच झालेल्या डील ची आकडेमोड चालली होती.
शाळेतील मित्र खुप पुढे निघून गेले होते, आणि स्वतः मात्र कॉलेज पर्यंत सुद्धा पोहचू शकला नव्हता.
नंतर दोन तीन वेळा त्यांच्या टेबल वर तो गेला, पण सुखदेव ने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले.
चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले.
आता परत कधी इकडे न आले तर बर, असा विचार त्याच्या मनात आला.
स्वतःच्या निष्फलते मुळे शाळेतील मित्रांना ओळखसुधा दाखवता आली नाही, म्हणून सुखदेव ला फार वाईट वाटले.
सुखदेव, टेबल साफ कर. तीन हजारचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यानी, मॅनेजर वैतागून बोलला.
टेबल साफ करता करता सुखदेव ने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला,
त्या चार बिझनेस मननी पेनानी कदाचित त्या नॅपकिन वर पण आकडेमोड केली होती.
पेपर टाकता टाकता सहज त्याच्या कडे लक्ष गेले,
त्यावर लिहिले होते….
तुला टीप द्यायला आमचा जीव झाला नाही, ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील, तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढतोय हे कस वाटते❓
आपण तर शाळेत एकमेकाच्या डब्ब्यातून खाणारे,
आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस,. फॅक्ट्रिमध्ये कॅन्टीन तर कोणालातरी चालवलीच पाहिजे ना❓
शाळेतील तुझेच मित्र.
खाली कंपनीचे नाव आणि फोन no. लिहिला होता.
आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या टीप ला सुखदेव नी ओठांना लावून तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.

THIS IS THE QUALITY OF REAL FRIENDS