मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरून बसतोस. लक्ष दुसरीकडेच. मन एकाग्र केलंस तरच कळेल न तुला. हे एकाग्र करणं, concentrate करणं काय असतं कुणास ठाऊक? आई बाबांना असं का वाटतं मुख्य म्हणजे हे एकाग्र कसं व्हायचं असा प्रश्न मुलांना पडतो आणि मुलांचं Concentration कसं करायचं, कसं वाढवायचं हे टेन्शन पालकांना असतं.

आज जरा Concentration वर प्रकाश टाकू या…
मुलांची एकाग्रता मोठ्या माणसांइतकी नसते पण जर मनाला सवय लावली, ट्रेनिंग दिलं तर काॅन्स्नट्रेशन स्पॅन वाढू शकतो.

पहिला प्रश्न म्हणजे…

1)मुलांची एकाग्रता (Attention span)किती दीर्घ असतो…?
मुलं एखाद्या गोष्टीवर किती काळ लक्ष एकाग्र होऊन शकतात?

याचं उत्तर आहे की प्रत्येक मुलाची एकाग्रता ही त्या मुलावर अवलंबून असते. कॉन्स्ट्रेशन हे वैयक्तिक असते. ती प्रत्येक मुलानुसार वेगवेगळी असते. न्यूरोसायंटिस्टस यांच्या मते मुलं जसजशी मोठी होतात एकाग्रता (Attention span) वाढत जातो.

*एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार,
वयानुसार मुलांची सरासरी एकाग्रता पुढीलप्रमाणे…*

(average Concentration span by age)

वय अटेन्शन स्पॅन

*4 वर्ष 8 ते 10 मिनिटे

*5 वर्ष 10 ते 25 मिनिटे

*6 वर्ष 12 ते 30 मिनिटे

*7 वर्ष 14 ते 35 मिनिटे

*8 वर्ष 16 ते 40 मिनिटे

*9 वर्ष 18 ते 45 मिनिटे

*10 वर्ष 20 ते 50 मिनिटे

*11वर्ष 22 ते 55 मिनिटे

*12 वर्ष 24 ते 60 मिनिटे

हे जनरलायझेशन आहे. किमान ते कमाल अटेन्शन स्पॅन आहे. यात मुलांच्या सवयीनुसार वाढ होऊ शकते. ADHD या अध्ययन अक्षमता असणा-या मुलांमध्ये हे अटेन्शन स्पॅनचे प्रमाण अटेन्शन रिलेटेड डिसऑर्डर असल्याने Concentration कमी असते. खरं म्हणजे मुलं एकाग्र होऊ शकत नाहीत तेव्हा तो प्रॉब्लेम ह्या मुलांसाठी खूप त्रासदायक असतो.

*असं असलं तरी मुलांसाठी एकाग्र होणं खूप आवश्यक असतंच.मुलांचं एक किंवा दोन वेळेस लक्ष नसणं हे ठीक आहे पण तो पॅटर्न तयार होत असेल तर दखल घ्यायलाच हवी.

आता पाहू या मुलांची एकाग्रता… (Concentration span) कशी वाढवता येईल?

*1) मुलांच्या अभ्यासाच्या वेळेचे छोटे छोटे पार्ट करा.
जेणेकरून मुलं कंटाळणार नाहीत.लहान मुलांसाठी दहा मिनिटे एक प्रकारचा अभ्यास पुरेसा असेल. म्हणजे अभ्यास बंद करायचा नाही तर असा क्रम घेता येईल प्रत्येक दहा मिनिटांसाठी ऐकणे, वाचणे, लिहिणे, पाठ करणे, नोट्स किंवा मुख्य मुद्दे लिहून ठेवणे, विचार करणे, आकृत्या काढणे. ह्यालाच इंग्लिशमध्ये
(listening, reading, writing, memorizing, notes, thinking, draw) असं व्हेरिएशन असले तर एकाग्रता हळूहळू वाढत जाते.

*2)मोठ्या वर्गातील मुलांबाबत अभ्यासाची बैठक अर्थात जास्त हवी पण तीही लहान लहान पार्टमध्ये डिव्हाईड करा.30 मिनिटे प्रमाणे आणि वेगवेगळी अभ्यास कौशल्ये वापरु द्या. नुसते वाचन, लेखन, पाठांतर मुलांची एकाग्रता कमी करु शकते. वैविध्य अतिशय आवश्यक आहे.

*3)छोटे छोटे भाग केले की मेंदू ताजातवाना होतो. नवीन पद्धत असली की उत्साह वाढतो. बेबी स्टेप्स मुलांचा आत्मविश्वास वाढवतात. याला brain break म्हणू या.यासाठीच ideas, activities शोधून त्यांचा वापर उपयोगी ठरतो.

*4)मुलांना fast finisher बनवता येते. जसे की हे मागच्या वेळेस तू चार मिनिटात लिहून काढलं होतंस. आपण आता स्वतःला चॅलेंज देऊ या का की तू हे तीन मिनिटात करशील.

*5)अभ्यास करताना मध्ये थोडा पाच मिनिटाचा ब्रेक आवश्यक आहे.यामुळे मुलांचा मूड रिफ्रेश होतो.

*6)अभ्यास नसेल तेव्हा फिजिकल ॲक्टिव्हिटी जरुर होऊ शकेल. हे ॲक्टिव्ह गेम्स असणं खूप फायदेशीर आहे.

*7)रोज किमान तीन ते दहा मिनिटे मुलांना माईंडफुलनेसची प्रॅक्टिस द्या.

*8) मेमरी गेम्स खेळू द्या.

*9)बसण्याची जागा कम्फर्टेबल, पुरेसा प्रकाश, मोकळी हवा असेल हे जरूर पहा.

10)मुलांना समज आली की त्यांना खालील ॲक्टिव्हिटी करु द्या याचा नक्कीच फायदा होतो…

*1) सुईत दोरा ओवणे .

*2) चेंडूचे टप्पे खेळणे.

*3)आगपेटीतील काड्या मोजणे.

*4)रांगोळी काढणे.

*5)चित्र रंगवणे.

*6) मेणबत्तीकडे एकटक बघणे.

*7)पत्त्यांचा बंगला करणे.

*8)वाळूचा किल्ला करणे.

*9)लेगोचे आकार तयार करणे.

अभ्यास असो की खेळ किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी मुलांचे कॉन्स्ट्रेशन वाढण्यासाठी आपण जितकी जास्त प्रॅक्टिस देऊ तितके उपयुक्त ठरेल.

शेवटी एक लक्षात घ्या की

Concentration comes out of a combination of confidence and hunger.

ही नवनिर्माणाची आस मुलांची एकाग्रता नक्कीच वाढवेल.

डॉ. स्वाती विनय गानू,