त्याची अन् तीची सोशल मिडीयावर ओळख झाली. चॅटिंग करता करता गहिरी मैत्री झाली. दोघांनी ही वेळोवेळी मैत्री नितळ राहण्यावर भर दिला. नात्यातले पावित्र्य हाच त्यांच्या मैत्री चा आधार बनला.
एक दिवस दोघे भेटले अन चित्रपट पहायला गेले. चित्रपटातील आईचा संघर्ष अन वेदना बघून तो विव्हळ झाला. त्याचे संवेदनशील मन भरून आले. तिच्या नजरेने हे हेरले. अन् तीने हलकेच त्याला थोपटले.
तो तीच्या खांद्यावर डोके ठेउन अश्रुवला अन् तीनेही त्याचे सांत्वन केले. तो गेला स्वतःच्या गावी अन् sms केला कि काल तू मला आईचे वात्सल्य दिले. Thanks mom . ती गहिवरली.
काही दिवसांनी दोघे पुन्हा भेटले . सांजवेळ होती ती. अन् दोघेही सुंदर उद्यानात गेले. मंद वारा धुंद सायंकाळ अन् समोर गुलाब फूलाचे स्टाॅल. त्याने एक लाल गुलाब घेउन तीला दिला. आणी दोघे परत फिरले. तीने मेसेज केला कि लाल गुलाब मला कसा दिलास तो मान प्रेयसीचा. तो उत्तरला कि त्या क्षणी तू मला प्रेयसीच भासली. लव यु. ती गोंधळून गेली सैरभैर झाली. तीला त्याच्या मैत्री मध्ये वेगळाच वास आला. आणी चाटिंग बंद झाली. तो रोज मेसेज करी पण एकांगीच. दुसरीकडून प्रतीसाद शून्य.
असेच दिवस जात राहीले अन एका दिवशी तो दत्त म्हणून हिच्या दारात हजर. तीने दार उघडले तो आत आला. त्याच्या चेह-यावर आनंद आणी वेदनेच्या समिंश्र छटा. ती अबोल. त्याने खिशातून एक सुंदर राखी काढून म्हटले आज राखी पौर्णिमा. माझी लहानगी बहीण अमेरीकेत असते. तिने पाठवलेली ही राखी बांधशील का माझ्या हाती? तीने ताट आणले राखी बांधून ओवाळणी केली. त्याने पॅक करून आणलेली गिफ्ट तीला दिली. ती म्हणते मला कशाला ही गिफ्ट ? मी तर फक्त तुझ्या बहीणीतर्फे ही राखी बांधलीय. तो म्हणाला आत्ता तु माझी लहानगी बहीण च आहेस. ओवाळणी मिळाल्यावरचे तिच्या मुखावरील आनंद मला तुझ्या मुखावर पहायचेय.
तीला समजेनासे झाले काय याच्या मनात? तीने तसे बोलून दाखवले. तो म्हणतो यालाच मैत्री म्हणतात वेडे. तूला उद्या दाखवेन.
दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता हा हजर चल म्हणाला तीही निघाली. दोघेही फिरू लागले. त्याने तीला दाखवले एका घराच्या समोर एक आई आपल्या तान्हुल्याला घेऊन बसली आणी त्या बाळाला कोवळे ऊन खाउ घालतेय. थोड्या वेळाने त्याने तीला एका लहान लेकराच्या दवाखान्या समोर उभे केले कैक आया आपल्या बाळांना कपड्यात गुंडाळून ऊन्हापासून वाचवित आणीत होत्या. नंतर त्याने तिला एका खाणीवर नेले तेथे ओझे वाहणारे कामगार भर उन्हात काम करीत होते. आणी उन्हाच्या तिव्रतेने त्यांचे कपडे चिंब झाले होते. लगेच त्याने तीला बाजूच्या घराकडे बघायला सांगितले तर तेथे चिंब कपडे उन्हात वाळत होते.
मग तो म्हणाला बघ मैत्री चे काम सुर्यासारखे असते. एका ठिकाणी ते बाळाचे उत्तम संगोपन व्हावे म्हणून उपयोगी ठरते तर दुसरीकडे बाळाला हानिकारक. एका ठिकाणी ते कामगाराचे कपडे ओले करीत होते तर दुसरीकडे ओले कपडे वाळवित होते. मित्र ही वेडे तसाच असतो.
सैरभैर संध्याकाळी तो प्रियकर वा प्रेयसी असतो तर बंधुभावाच्या उत्कट क्षणी भाउ बहीण असतो. माणूस घातक क्षणी जेव्हा कमकुवत पडतो तेव्हा मित्र पती पत्नी च्या प्रमाणे ढाल होउन उभारतो तर चलबिचल झालेल्या दुखी मनाला माता पित्याची आश्वासकता देतो.
मैत्री हे एकच नाते असे आहे जे सर्व नात्यांचे कर्तव्य पार पाडते पण कोठल्याही नात्याचे बिरूद लाउन घेत नाही. सुर्य नसेल तर सृष्टी अंधारात आणी मित्र नसेल तर जीवनात अंधकार. दोन्हीही प्रकाशाचे जनक.
त्याचे हे सारे विवेचन ऐकून तिचे डोळे डबडबले नकळत अश्रु ओघळले. अन् तिने विचारले या विविध भूमिका पार पाडताना मित्रांची स्वतःची अंगभूत भूमिका कोणती?
त्याने हळुवार तीचे दोन्ही डोळ्यांतील आसवे आपल्या तळहातावर घेतले अन् म्हटले मित्रांच्या आसवांना झेलत त्याच्या चेह-यावर हास्य फूलवणे हेच मैत्री चे अंगभूत धर्म. ती वेडावली, सुखावली आणी त्याच्या मिठीत स्थिरावली. त्या मिठीत तिच्या सा-या शंका विरघळून गेल्या.
कॉपी पेस्ट