*लहान मुलांसाठी रेसिपी* 2 वर्ष वरील मुलांसाठी
【1】
Home-Made Cerelac:-
खिमटी
साहित्य:-
मूग दाळ १ वाटी,
तांदूळ १ वाटी ,
बदाम५-६.
कृती:-
दाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून एका कपड्यावर सुकत ठेवायचे,चांगले सुकले की वेगवेगळे खमंग मंद गॅसवर भाजणे व बदाम पण थोडे शेकून घेणे.
मिक्सर मध्ये मिक्स करून बारीक करणे. ही खिमटी २-३ वीक राहते हवाबंद डब्यात ठेवणे.
पध्दत:-
१)एका वाटीमध्ये पाणी घेऊन 2 चमचे पावडर मिक्स करून मीठ चवीनुसार घेऊन मिक्स करून घेणे.
२)एका भांड्यात उकळून खिमटी बनवा,सतत ढवळत रहा गाठी होऊ नये म्हणून.
३) खमंग सुंगध व फेस किंवा भांडयाला खिमटी चिटकू लागली की समजा खिमटी तयार.
पौष्टिक अशी खिमटी मूल सहा महिन्यांचा झाले कि सुरु करावी,पचण्यास हलकी असते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【2】
नाचणी सत्व:-
साहित्य:-
नाचणी सत्व,मीठ,गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१) खिमटी करतो त्याप्रमाणे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात नाचणी सत्व 2-3 चमचे मिक्स करून त्यात थोडेसे मीठ घालावे.
२) एका टोपात घालून उकळी येऊ लागतात एक कप दूध,गूळ, वेलचीपूड, सुठं पावडर,तूप,काजू बदाम पावडर घालून सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाही.
३) मंद गॅसवर शिजवूज घेणे,
४) हे सत्व आपणही ताकातून घेऊ शकतो किंवा खीर.
Calcium चा उत्तम source आहे नाचणी,हाडे मजबूत होतात.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆
【3】रवा लापशी:-
साहित्य:-
लापशीचा रवा,तूप,साखर किंवा गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१)लापशीचा रवा १-२ चमचे घेऊन तुपात छान परतने.
२) दूध एक वाटी, साखर वेलची पावडर घालून मस्त शिजवून घेऊन भरवणे.
३)अधूनमधून ढवळने,गाठी होणार नाहीत.
○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○
【4】
मिक्स दाळीचे सूप:-
साहित्य:-
तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ, हिंग,मीठ,लसूण.
कृती:-
१) तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ थोडी चना डाळ सगळ्या डाळी मिक्स करून कुकर मध्ये मऊ शिजवणे त्यात
२) 2-3 लसूण पाकळ्या व थोडे हिंग पावडर घालणे.
३) स्मॅश करून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन सर्व्ह करणे.
टीप: पाण्याचे प्रमाण जास्तच ठेवले तरी चालेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆
【5】
मूगतांदूळाची खिचडी
साहित्य
१) १ कप तांदूळ
२) १/२ कप मूग डाळ
३) तीन ते साडेतीन कप गरम पाणी
४) १ टेस्पून तेल
५) २ चिमटी मोहरी
६) १/४ टिस्पून जिरे
७) १ चिमटी हिंग
८) १/४ टिस्पून हळद
९) थोडे मटार
१०) १ टिस्पून गोडा मसाला
११) चवीपुरते मिठ
कृती
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे.
२) पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, फोडणी करावी.
४) नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
५) नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी.
६) लागल्यास मिठ घालावे.
७) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात.
८) वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
९) खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
१०) मूगतांदूळाची खिचडी तयार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【6】
पालक भात:-
साहित्य:-
पालकची स्वच्छ धुतलेली पाने,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
स्वच्छ धुतलेली पाने बारीक चिरून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व चिरलेली भाजी व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
【7】
मुग भात:-
साहित्य:-
अर्धी वाटी मुग,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
१) मुग थोडेसे भाजून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व भाजलेले मुग व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
५) यात एक दोन फोडी गाजर,बटाटा,किंवा फरसबी घालू शकता.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【8】
ओटस पावडर रेसिपी
ओट्स थोडेसे भाजून घेणे, बदाम पण शेकून घेणे.
थंड झाले की दोन्ही मिक्सर मध्ये बारीक करून पावडर बनवणे.
****ओट्स रेसिपी****
Apple ओट्स:-
साहित्य:-
2-3 चमचे ओट्स पावडर व
एक छोटा किंवा 2-3 फोडी apple चा गर.
कृती:-
१) थोडेसे पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे ओट्स पाउडर घेऊन मिक्स केली.
२) त्यात थोडेसा apple चा गर मिक्स केला व साखर व किंचित मीठ घालून उकळी येऊ दिली. ओट्स तयार.
●●साधे ओट्स:-
२-३ चमचे ओट्स पावडर मीठ घालून शिजवून घेणे.
ओट्स मध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे घालुन बाळासाठी वेगवेगळ्या रेसिपी बनवणे.
टीप-सुरवातीला कोणताही पदार्थ मुलांना थोड्या प्रमाणात द्यावा व संडास जास्त होणे, खाल्यावर 1 तासाने रडून पोटाला दाबणे असे दिसल्यास अजून 2-3 महिन्यांनी देऊन निरीक्षण करावे. एकदम जास्त प्रमाणात पदार्थ खाण्यास न देता 15-15 दिवसांनी वाढ करत जावे.