चिंता
स्वरूप आणि उपाय
अर्थात
शोध मन: स्वास्थ्याचा
लेखक: डॉक्टर प्रदीप पाटकर
मूल्य: १४०₹ टपाल ३५₹ एकूण १७५₹
तुटलेली मन साधणे, पुन्हा उभारणे, सशक्त करणे हा मानसोपचाराचा हेतू असतो. भारतात १० लाख लोकांमागे व १ लाख मनोरुग्णांमागे एक मानसोपचार तज्ञ उपलब्ध हे प्रमाण असल्यामुळे मानसोपचाराचे प्रचंड काम आपण मानसोपचारकांवर तज्ञांवर सोडून चालणार नाही. आपल्यातील प्रत्येक सुजाण, विवेकी माणसाला अस्वस्थ मनातील चिंता समजून घेऊन आपापल्या परीने प्राथमिक मानसोपचार करता यावेत या उद्देशाने हे पुस्तक लिहिले गेले आहे. आपल्यातील लहान मूल, कुमारवयीन मुले, स्त्री- पुरुष, प्रेमिक, विवाहित, प्रौढ साऱ्यांच्या चिंता समजून घेऊन मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
अस्वस्थतेचं मखभ दाटल्यानं
कासावीस होणार्या मनांशी संवाद साधणं
मला नेहमीच अस्वस्थ करून सोडतं.
शरीर व मन यात द्वैत नसतं.
असं द्वैत मानणार्यांना माणूस समजलेला नसतो.
चिंतेच्या दडपणाखाली दोन्ही एकत्र चिरडले जातात.
मन अस्वस्थ होतं त्याला अनेक कारणे असतात. वैयक्तिक आशा, अपेक्षा, आकांक्षा
इतकंच जबाबदार असतं, आजूबाजूचं जग
काहूर माजविणारी परिस्थिती…
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक,
राजकीय, आर्थिक – विविध अंगाने
विळखा घालत येते चिंता.
विचार विवेकापासून दूर जातो
अवास्तव उत्तरे शोधीत.
जन्मावेळी रडून झाल्यावर आनंदाने जगायचं ठरविणारी माणसं आयुष्यभर चिंताग्रस्त जगत आनंद हरवून बसतात. तुमचं-माझं तसंच यापुढे होत राहू नये
या तीव्र इच्छेपोटी घेतलेला हा शोध.