सर्वांगीण विकास करायचा असेल तर या वाक्यांचा वापर मुलांसाठी करु नका !

 

प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना चांगलं आणि मजबूत बनवायचं असते. आपल्या मुलांनी कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहिले पाहिजेत या दृष्टीने पालक सतत प्रयत्न करत असतात. मुलांचे भविष्य उज्वल व्हावे हे प्रत्येक पालकाला वाटते. आपली मुले हुशार व्हावीत आणि त्यांच्या सर्वांगीण वाढीकरिता पोषक असे वातावरण राहावे याकरिता पालक प्रयत्नशील असतात. अनेक वेळा पालक मुलांची समजूत काढताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना काही ही वाक्य बोलतात ही वाक्य मुलांच्या मानसिकतेवर ती नकारात्मक परिणाम करू शकतात त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता या वाक्याचा वापर टाळावा. जाणून घेऊया अशी कोणती वाक्य आहेत ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो

१) हे कठीण आहे :-

अनेकदा मुलांच्या बाबतीत असे होते की कुठलीही ही गोष्ट अथवा काम त्यांना कठीण वाटते त्यावेळी आपण पण त्यांना सांगतो ही गोष्ट फार कठीण आहे. लहानपणीच मुलांना जर एखादे काम कठीण आहे. असे थेट सांगितल्यास त्यांची मानसिकता नकारात्मक होऊ लागते आणि मुले कोणत्याही कामाला कठीण स्वरूपात पाहू लागतात. त्यापेक्षा जे कठीण काम आहे त्यावेळी त्यांना हे काम तुझ्याकडून होऊ शकते फक्त अधिक प्रयत्नांची गरज आहे. काहीवेळा अनेक गोष्टी अशा असतात ज्या लहान मुलं करू शकत नाहीत. अशावेळी त्यांना गोष्ट तुला काही काळानंतर येईलच असे समजावल्यास त्यांची मानसिकता ही सकारात्मक बनते. त्यामुळे कधीच कोणतेही काम गोष्ट कठीण आहे असे मुलांना सांगू नका.
२) तुला लागेल :-

लहान पुणे मुले ही फारच साहसी आणि ऊर्जेने भरलेली असतात त्यामुळे ती अशी कामे करू शकतात यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. मात्र अनेकदा पालक मुलांची अति काळजी घेतात. आणि मुलांना करण्यासाठी तुला ही गोष्ट केल्याने तूला लागेल तू पडू शकतो आपण करू शकतो हा त्याचा अर्थ असतो यामुळे मुले कोणतीही क्रिया करताना त्यांच्यातील उत्साह, साहसी वृत्ती गमावून बसतात कारण कोणत्याही क्रियेत ते असुरक्षिततेच्या नजरेने पाहू लागतात. जर तुमचा मुलगा एखादा खेळ खेळत असेल तर स्वच्छंदपणे खेळू द्यावा त्यामधील धोका यावर चर्चा करू नये ज्यामुळे त्याचा उत्साह कमी होईल. तुला लागेल या शब्दामुळे त्याच्या मनात भयाचे वातावरण तयार होते लक्षात ठेवा.
३) हे मी तुझ्यासाठी करत आहे :-

अनेक वेळा असे होते की मुलांना एखादे काम करताना खूप जास्त संघर्ष करावा लागतो. त्यावेळी पालक त्यांचे करून देतात. मुलांची कामात साहाय्यता करणं आणि त्यांचे काम करून देणे यामध्ये बराच फरक असतो. मुलांना काम करताना मदत प्रत्येक पालक करतातच. हे काम करून देतो असे सांगून त्याचे काम पूर्णपणे करून दिल्यास, ती मुले तुमच्यावर अवलंबून राहतात कोणतेही काम जमले नाही तर पालक करून देणार आहेतच अशी त्यांची मानसिकता बनते. आणि मुले काम पूर्ण व्हावे याकरिता अधिक प्रयत्न करत नाहीत. मुलांना कोणत्याही पकामात परिपूर्ण बनवायचे असल्यास त्यांच्यात संघर्ष करण्याची जिद्द निर्माण करावी लागते. ही जिद्द निर्माण करण्यासाठी त्यांना स्वतः हून चुका केल्या तरीही काम करू द्यावे त्यातूनच ते शिकतील हे नक्की.
४) मी हार मानतो :-

लहान मुले मोठ्यांना पाहून अनेक गोष्टी शिकत असतात. जीवन जगताना अनेक बाबतीत आपल्याला अपयश येते. अशावेळी आपण घरात संवाद साधताना मी करू शकलो नाही केव्हा मी हरलो असे वाक्य आपण बोलतो. त्यावेळी मुलांवर त्या वाक्यांचा परिणाम होतो. तुम्ही जर एखाद्या कामात लवकर हार मानत असाल तर मुले तुम्हाला पाहून तुमचे अनुकरण करतात आणि तेही ही अनेक कामात लवकर हार मानतात. लक्षात ठेवा आठ वर्षापर्यंत मुलांची बुद्धी तल्लख असते. लहान वयात ते कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करू शकतात त्यामुळे त्यांनी चांगल्या सवयी आत्मसात केल्यास त्यांचे भविष्य उज्वल असतेच. त्यासाठी तुमच्या सवयी ही बदलाव्या लागतात.