Back to Top

Category: history

#आपल्या परंपरा टिकाव्यात ही आपली जबाबदारी #social parenting काळाची गरज

#दिवाळी किल्ला. .
#आपले सण मुलांसाठी संधी
#आपल्या परंपरा टिकाव्यात ही आपली जबाबदारी
#social parenting काळाची गरज
#छोट्या कृती मोठे शिक्षण
#हसत खेळत शिक्षण
#quality time with kids
#स्वतःमधील मुल कायम जपा
महाराष्ट्रामध्ये दिवाळी मध्ये शिवाजी महाराजांचा किल्ला बनवण्याची परंपरा आहे . त्याअनुषंगाने मी आणि माझा मुलगा घरासमोर दरवर्षीच किल्ला बनवत असतो . परंतु दोन तीन वर्षापासून आम्ही सोसायटीच्या मुलांना बरोबर घेऊन किल्ला बनवत आहोत . सोसायटी मध्ये एक छोटा भारत वसलेला आहे विविध राज्यातील मुले असल्याने त्यांना आपल्या या परंपरेची माहीत नाही त्यामुळे रोज शिवाजी महाराज यांच्या विषयी ची एक गोष्ट आणि एका किल्ल्याची माहिती आणि त्याचबरोबर किल्ला तयार करण्याची तयारी असे दिवाळीच्या आधीच पंधरा दिवसांपूर्वीच सुरुवात केली गेली. .
सुरुवातीला सोसायटीच्या आवारात फेरफटका मारून गडासाठी कोणकोणत्या गोष्टी उपयोगात येऊ शकतील याची चाचपणी करणे , आजूबाजूला बांधकाम चालू आहे तिथून कोणत्या गोष्टी ,साहित्य मिळू शकेल हे नजरेने अचूक अंदाज घेत शोधणे या बाबी मुलांच्या सुरू झाल्या साहित्य मिळवताना त्या साहित्याचा वापर गडासाठी कसा कल्पकतेने करता येऊ शकेल याबाबत वेगवेगळी चर्चा करणे शिवाय साहित्य दुसऱ्याचे असेल तर परवानगी घेणे ,याबाबीची सुरुवात वय वर्ष 2ते 13वयोगटातील 12-15मुलांमध्ये सुरू झाले गडाचे काम सुरू झाले. .
मुलांचे रोजचे खेळ ही बदलले
मुले खेळताना तानाजी,बाजीप्रभू देशपांडे,मुघल,बाबर,शिवाजी,जीवा महाल,लाल महाल ,शहीतेखान,उदयभान,रायबा अशी नावे घेऊन विविध खेळ खेळू लागली. .
गडाची बांधणी करत असताना अंधारकोठड्या ,अंबरखाने ,उष्ट्रखाना
औषधीखाना ,रथखाना कडा,कडेलोटाची जागा,कलारगा ,कुरणे ,कुसू ,कोठी जिन्नसखाना
खंदक ,खासगी वस्तुसंग्रह गुहा ,
झरोकेकिंवाछिद्रे,जंग्या ,जामदारखाना ,टांके, तलाव, विहीर ,टोक ,ढालकाठी तट ,तवा ,थट्टी (पागा) ,दगडी जिने ,दरवाजे ,उपदरवाजे ,दिंडी दरवाजा ,चोर दरवाजा ,दारूची कोठारे ,देवड्या ,देवळे, समाध्या, स्मारकशिला, कबरी,धान्यकोठ्या,नगारखाना,पाऊलवाटा,पागा(थट्टी),पायथा ,पीलखाना ,पुस्तकशाळा ,पेठा,(पेठ-कारखाना),प्रवेशद्वार,प्रवेशमार्ग,फरासखाना,बागकारखाना,बारादरी,
बालेकिल्ला,बुरूज,भुयार,माची,
राजमंदिर,शिलेखाना,सडा ,सदर ,
सरपणखाना ,स्तंभ आणि दीपमाळा
इ किल्ल्याच्या विविध भागाची माहिती मुलांना करून दिली आणि त्याबाबतची माहिती व्हावी म्हणून गडावरही त्या त्या प्रकारचे किल्ल्याचे भाग करून नावे ही दिली त्यामुळे मुलांना इतिहासातील आणि गडाची सखोल माहिती झाली
मुलांनी गडावर एक रोप वे ही बनवला.
मुलाची कल्पनाशक्तीला वाव दिला व स्वतंत्र पने काही त्यांच्या वर जबाबदारी दिली तर मुले खूप काही गोष्टी करू शकतात .
मुलांना मुक्त पने माती,दगड,पाणी,रंग,मोठया च्या दृष्टीने जो कचरा असतो त्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून दिल्या तर मुलांची प्रतिभा विकसित होण्यास मदत होते,सर्जनशील मुले अश्याच प्रकारे तयार होतात.अश्या छोट्या छोट्या कृती मुलामध्ये एकत्र काम करण्याची वृत्ती वाढवतात आणि त्याची जपवणूक करणे ही स्वतःची जबाबदारीही समजतात त्यामुळेच थोडा पाऊस पडला किंवा जोराचा वारा आला तर गडाला काही झाले की काय हे मुले स्वतः पुढाकार पाहत होती आणि परत परत पडलेल्या भाग,किंवा एखादी तटबंदी पुन्हा पुन्हा जाऊन लावत होती . ..
सजावट,दिवे लावणे पणती जपून ठेवणे याबाबी मुले आवडीने करत होती
अश्याप्रकरे आमचा दिवाळीचा किल्ला बनविला गेला..
@ स्वरदा खेडेकर
+25

Read more

#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे

#family time
#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे
अहमदनगर मधील पारनेर तालुका अनेक आश्चर्याने भरलेला आहे त्यातच निघोज चे रांजणखळगे म्हणजे आशियातील सर्वात मोठे रांजणखळगे..
या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वाहते
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
+17
Dattatraya Gawade, Shashank Khedekar and 84 others
11 Comments
1 Share
Like

Comment
Share

11 Comments

View 8 more comments

#लवणस्तंभ

रांजणखळगे पाहून झाल्यावर अजुन एक पारनेर मधील आश्चर्यकारक ठिकाण म्हणजे वडगाव दर्या पाहायचे ठरले.. . वडगाव दर्या म्हणजेच प्रसिद्ध माकडाचे वडगाव जसे हे ठिकाण माकडासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते लवनस्तंभा साठीही प्रसिद्ध आहे .
लवणस्तंभ ….एक नैसर्गिक भुरूप !गुहांमधील क्षारयुक्त द्रव्यामुळे तयार झालेले स्तंभ म्हणजे लवणस्तंभ . पठार ,मैदान ,पर्वत,डोंगर,दरी, घळई इत्यादी भुरूपा सारखे हे सुद्धा एक भुरूप आहे .परंतु हे भुरूप आपल्याला पहाण्यासाठी दुर्मिळ असते .ब्रिटन,युगोस्लाव्हिया ,यु एस ए ,आदी देशात हे पहायला मिलते ,भारतात ते फक्त दोन ठिकाणी पहायला मिळतं एक म्हणजे उत्तरभारत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या ठिकाणी …. येथे दोन गुहा आहेत आणि त्यात अधोमुखी लवणस्तंभ तयार झालेले आहेत ….हा एक नैसर्गिक अविष्कार आहे. ……
वडगाव मध्ये कातळ खडकात दोन गुहा आहेत. एक वेल्हाबाईची आणि दुसरी दर्याबाईची. गुहेतून आत जाताना कातळ आहेत. वरच्या छताच्या बाजुनेच सतत पाणी ठिबकत असते. ते साठवण्यासाठी खाली टाक्या, हौद बांधलेले आहेत. ठिबकणारे पाणी त्यात साठते. जंगलातील प्राणी, पक्षी यांना प्यायला उपयोगी पडते. या पाण्यात कलशियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत. एका ठिकाणी गोमुखातून पाणी पडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहून आम्ही स्तिमित झालो.खूपच थंडगार पाणी तेथे आहे.
खूप सारे माकडे येथे पहिल्यापासून होती सध्या कोरोना काळामध्ये माकडाची संख्या कमी झाली आहे येथील माकडे खूप लोकांना त्रास देत नाही उलट सर्वांच्या जवळ जाऊन हाताने खाणे खातात . . मुलांसाठी ही खूप छान one day पिकनिक आहे.
+7
Shashank Khedekar, Sunita Lahane Dhok and 49 others
4 Comments
Like

Comment
Share

किल्ले माहीती- मार्कंड्या

🦋किल्ले माहीती🦋

📙 मार्कंड्या 📙
*******

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.

Read more

इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा

इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा

चौदाव्या आणि पंधराव्या शतकात जगात तोफांचा बराच प्रसार होऊ लागला होता. मोठमोठय़ा तोफा बनवण्याची अहमहमिका लागली होती. त्यात बॉम्बार्ड नावाचा तोफांचा प्रकार प्रामुख्याने अस्तित्वात होता. या प्रकारच्या तोफा कॅनन आणि मॉर्टर या वर्गात मोडत आणि त्या मोठय़ा कॅलिबरच्या म्हणजे बॅरलचा व्यास खूप मोठा असलेल्या असत. त्यांचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या किल्ल्यांची आणि नगरांची तटबंदी भेदणे हा असे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज

बसून कंटाळा आला तर मुलांनाही टीव्ही मोबाईल त्याच्या शिवाय वेगळा पर्याय नाही चला तर मग मुलांना दाखवायचे तर काहीतरी चांगलं दाखवूया यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या काही संतांचे चित्रपट असलेली युट्युब ची लिंक पाठवत आहे याच्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जुन्या संतांचे बरेचसे चित्रपट पाहायला मिळतील

जास्तीतजास्त शेयर करा आजच्या बच्चेकंपनी ला छञपती काय होतें हे समजणे आवश्यक आहे असें मला वाटते….

जय महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज व संतावरील सर्व
जुने चित्रपट YOUTUBE LINK

Read more

संत तुकारामांचे अभंगशतक

।। संत तुकारामांचे अभंगशतक ।।
कर्जदारांची कर्ज माफ करणारे जगातील पहिले संत तुकाराम. हे सतराव्या शतकातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म, अनागोंदी त्याचप्रमाणे लोकांच्या मनातील भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा संत तुकारामांनी प्रयत्न केला. लोकांच्यावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा, देण्याचं काम केलं. रोजचे जीवन जगताना कशा प्रकारे जगावे हे आपल्याला त्यांच्या अभंगातून दिले. त्यांचे सर्व अभंग मानवी जीवनाला हितकारक, उपकारक ठरले आहेत. तुकारामांचे अनेक अभंग आहेत त्यातील शंभर अभंगांचे संक्षिप्त विवेचन सरळ, साध्या, सोप्या भाषेत असणारा “संत तुकारामांचे अभंगशतक” असा ग्रंथ डॉ.आ.ह साळुंखे यांनी आपल्याला समोर ठेवला आहे. हा ग्रंथ 191 पृष्टी असून शंभर अभंग या ग्रंथात असल्याकारणाने ग्रंथाचे नाव ‘संत तुकारामांचे अभंगशतक’ असे दिले आहे. या ग्रंथात एकूण सतरा प्रकरणे दिली आहेत. हे सर्व प्रकरण जन्म, विवाह, मृत्यू , गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, आनंद, उत्सव, मंगलकाम, प्रसंग, कृतज्ञता, समारंभ, विविध संस्कार इत्यादी प्रसंगी या अभंगाचे वाचन करू शकू असे अभंग आहेत. प्रथम ‘आईवडील’ या प्रकरणाने सुरुवात केली आहे. जगामधे जिथं आपलं मस्त नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. या पहिल्या प्रकरणात आठ अभंग दिले आहेत. दुसरे प्रकरण संत असं दिलं आहे. यातील पहिल्या अभंगाची सुरुवात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या अभंगाने केली आहे.

Read more