Back to Top

Category: science

नील्स बोर

नील्स बोर

भौतिकशास्त्रज्ञ

जन्म – ऑक्टोबर ७, १८८५

संशोधन
नील हेनरिक डेव्हिड बोर (डॅनिश: [nils b̥oɐ̯ˀ] ७ ऑक्टोबर १८८५ – १८ नोव्हेंबर १९६२) हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते. Continue Reading

एल्मर स्पेरी

एल्मर स्पेरी

जायरोकंपासचा (गायरोकंपास(Gyrocompass) शोध

जन्मदिन – १२ ऑक्टोबर १८६०

एखादी वस्तू आपल्या गुरुत्वमध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती पुरेशा वेगाने फिरत असेल, तर तिला घूर्णी असे म्हणतात. विशेषकरून ज्याचा अक्ष कोणत्याही दिशेत वळू शकेल अशी बैठक दिलेल्या व ज्याच्या अक्षावरील एक बिंदू स्थिर असतो अशा चक्राला ही संज्ञा दिली जाते. इतर काही प्रेरणा न मिळाल्यास घूर्णीच्या अंगी आपल्या परिवलन अक्षाची दिशा टिकवून धरण्याचा गुण असतो.

इतिहास
अशा तऱ्हेचे फिरते चक्र प्रथम १८१० मध्ये बोननबर्गर यांनी बनविले. त्यानंतर १८३६ मध्ये एडवर्ड लांग यांनी एका प्रबंधात असे सुचविले की, अशा फिरत्या घूर्णीच्या साहाय्याने पृथ्वीच्या आपल्या आसाभोवतीचे परिवलन पडताळून पाहता येईल. यासंबंधीचा प्रत्यक्ष प्रयोग फूको यांनी पॅरिसमध्ये १८५२ मध्ये केला. घूर्णीविषयक संशोधनाला फूको यांच्या प्रयोगामुळे बरीच चालना मिळाली. याविषयीचे सैद्धांतिक विवेचन स्विस गणिती ऑयलर यांच्या ग्रंथात भरपूर केलेले आहे. घूर्णी परिणामाच्या काही प्रासंगिक उपयोगांखेरीज अनेक वर्षे घूर्णी ही केवळ कुतूहलजनक वस्तूच मानण्यात येत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घूर्णीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधी प्रयत्न सुरू झाले व या दृष्टीने एल्मर स्पेरी यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. या प्रयत्नातूनच स्पेरी जायरोस्कोप कंपनीची स्थापना झाली. या कंपनीतर्फे जहाजे व विमाने यांना लागणाऱ्या अनेक प्रकारच्या यंत्रणांत उपयुक्त असणाऱ्या घूर्णी प्रयुक्त्या तयार करण्यात येतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत घूर्णीच्या उपयोगास मोठी चालना मिळाली व हळूहळू अनेक प्रकारच्या यंत्रणांमध्ये घूर्णीचा समावेश करण्यात येऊ लागला.

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्वा एडिसन

विजेच्या दिव्याचा शोध

स्मृतिदिन – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१

थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. Continue Reading