काळा ठिपका*

कॉलेजमधील एका प्राध्यापकाने एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले-
“आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे.”
असे म्हणून प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती. कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले,
“आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत.”

Read more