माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..

शिक्षण या विषयावर गेली काही वर्षे, माझे जे वाचन झाले, स्नेहच्या शिक्षणाच्या निमित्ताने माझे जे निरीक्षण झाले, त्यानुसार माझ्यापुरती मी शिक्षणाची व्याख्या तयार केली आहे, ती म्हणजे,
उत्सुकतेपोटी नवीन गोष्टींचा शोध घेणे, शोध घेता घेता आपल्या क्षमतांचा अंदाज बांधणे, त्या क्षमतांच्या जोरावर शिकलेल्या गोष्टी वापरून बघणे आणि त्यातून आपल्या “कम्युनिटी”तील आपले स्थान बळकट करणे, म्हणजे शिक्षण.

या शिक्षणाच्या प्रक्रियेत पालक म्हणून माझी भूमिका या व्याख्येला अनुसरून काय असली पाहिजे? माझ्या अनुभवानुसार मी माझी भूमिका पुढीलप्रमाणे निवडली आहे. Continue Reading