मुलाने बाहुलीला फास लावला आणि स्वत:लासुद्धा.
बातमी वाचली.
मुलांसाठी खरं खोटं असं काहीच नसतं. त्यांना सगळी दुनिया खरी वाटते कारण ती सत्यात जगत असतात. मोबाइल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत. खोटं आहे. हे त्यांना कळत नाही.
त्या एका नातवाची गोष्ट आपण ऐकलेली असेलच. आजोबा, नातू रस्त्यावरून जाताना आजोबांना गाडीचा धक्का लागला आणि ते रस्त्यावर पडले. नातू जोरात हसायला लागला. कारण त्याला वाटलं की कार्टूनमध्ये दाखवतात तसं आजोबा काहीही न होता आपोआप उभे राहतील. जखम होणे, दुखावणे या गोष्टी कार्टूनमध्ये नसतात. मुलाला तेच खरं वाटत होतं. बरीचशी कार्टून बघणारी मुलं बोलताना त्या कार्टूनमधल्या लोकांसारखीच बोलतात, तशीच वागतात.