रानभाजी चिवळ

चिवळच्या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ इ.चिवळ ही रानभाजी ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते

लागणारे साहित्य
1) एक अर्धा किलो चिवळची भाजी,
2)अर्धा वाटी बेसण
3)2 कांदे मध्यम आकारात चिरलेले,
4)तेल, तिखट, हळद, मीठ, जिर, मोहरी (आपल्या अंदाजानुसार)

कृती
1) सर्वप्रथम चिवळची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची सगळी मूळं काढून फक्त कोवळे बारीक बारीक पाने ठेवा.
2) नंतर ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतल्यावर थोडी कोरडी करून नंतर बारीक चिरून घ्या.
3) कढईत तेल टाकुन जिर मोहरीची खरपुस फोडणी घाला नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो मस्त मऊ होईपर्यंत शिजू द्या कांदा शिजत आला की मग त्यावर तिखट मिठ हळद घालुन थोडा ठसका गेला की मग चिरलेली भाजी त्यात टाकुन देऊन सगळी भाजी एकजीव करुन घ्या .
4) नंतर त्या भाजीत हळुवार बेसन सोडत जा बेसन टाकल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी. 5 ते 7 मिनिटे मंद गॅसवर शिजवुन घ्या. नंतर तुमची चिवळची भाजी तयार होते.
ही खरपूस भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा पोळीसोबत घाऊ शकता.