अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेलं राजेश पाटील लिखित ‘मोर ओडिशा डायरी’ हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे ओडिशारख्या पूर्ण अनोळखी, मागास भागांत मानल्या जाणाऱ्या राज्यात एक आयएएस अधिकारी कसं काम करतो. तिथल्या आदिवासीबहुल-नक्षलग्रस्त भागांत काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो याची गोष्ट. याच पुस्तकातील काही मजकूर वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
आदिवासींना समजून घेताना
___________
नारायणपाटनाच्या घटनेमुळे अचानक माझी कोरापुतला बदली झाली होती. कोरापुतमधले पहिले काही महिने त्या समस्येवर उपाय योजण्यातच गेले. त्यानंतरच कोरापुतच्या आदिवासींशी, त्यांच्या संस्कृतीशी जवळून ओळख करून Continue Reading