बंडू आणि रघु, दोघांनाही दूध आवडत नाही.

पण रोज अर्धाकप दूध घेणं दोघांना अनिवार्य आहे.

बंडू दूध घेताना खूप कटकट करतो, त्रास देतो, दोन तास लावतो.

रघुला हा त्रासदायक क्षण लवकरात लवकर संपवून टाकायचा आहे, तो एका घोटात दूध संपवून मोकळा होतो.

बंडू घरातील सर्वात लाडका असेल तर घरातले सगळे बंडूच्या पुढे पुढे करतात, बंडू आपले महत्व वाढवून घेतो, बंडू घरातल्यांनाही निगोशिएट करायला सुरुवात करतो, पुढे जाऊन त्याचे व्यक्तिमत्व नकारात्मक घडू शकते. Continue Reading