संवाद : खारी बिस्किटांशी!
अनेकांना (म्हणजे अनेक मोठ्या माणसांना) मोठ्या माणसांशी बोलताना काही प्रॉब्लेम येत नाही. पण यातल्याच अनेकांना असा प्रश्न पडतो की मुलांशी काय बोलायचे? आणि कसे बोलायचे? आणि सर्वात महान प्रश्न म्हणजे.. का बोलायचे?
असं का होतं..? कारण मुले खारी बिस्किटा सारखी असतात तर (तमाम) मोठी माणसे मारी बिस्किटा सारखी असतात. म्हणजे जगातले एक खारी बिस्किट दुसर्या खारी बिस्किटा सारखे नसते. प्रत्येकाचे पापुद्रे वेगवेगळे, प्रत्येकाचे थर असमान, बाहेरुन सारखी वाटली तरी प्रत्येकाची आतली रचना एकदमच भिन्न! म्हणून तर आपण म्हणतो, ‘प्रत्येक मूल वेगळं असतं, युनिक असतं.’ पण बहुतेक मोठी माणसं ही मारी बिस्किटा सारखी आतून बाहेरुन सारखीच गुळगुळीत असतात.