“सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण”

 

“काकू, जयेश आहे का घरी?”
“कोण रे?”
“मी हर्षवर्धन. जयेश आणि मी कॉलेजमध्ये एकाच वर्गात आहोत. काल दसऱ्याची सुट्टी होती, त्यामुळे आमच्या प्रोजेक्ट चं प्रिंटिंग राहिलंय. मी तीच हार्डडिस्क घ्यायला आलो होतो.”
“ये ना आत. पहिल्यांदाच आलास ना आमच्या घरी? जयेश पूजेला बसलाय. दहा-पंधरा मिनिटात होईलच त्याची पूजा.”
हर्षवर्धन बैठकीच्या खोलीत बसला. साधं पण स्वच्छ आणि अतिशय टापटीप असलेलं ते घर होतं. कसलीही महागडी सजावट नव्हती. देशोदेशीच्या आकर्षक वस्तूंनी भरलेल्या शोकेस नव्हत्या. चकचकाट नव्हता. त्या साधेपणाचा विचार करता करताच त्याचे डोळे दाराच्या उंबऱ्यापाशी खिळले. उंबऱ्यावर सुबक रांगोळी काढली होती. दाराला छान ‘खऱ्या’ फुलांचं तोरण होतं. तो खुर्चीतून उठला आणि जवळ जाऊन पाहू लागला, तोच जयेशची आई आली

Read more