परिक्षा व निकाल, तणावाचं वातावरण, मुलांपेक्षा आई बापालाच टेंशन जास्त. पण एवढ्यात क्लास, इंटर्नल मार्कस् मुळे गुणांची टक्केवारी वधारली असली तरी सर्वांच्या चांगल्या गुणांमुळे पुढील प्रवेशांसाठी स्पर्धा ही वाढली आहे व हे पालकांसाठी एक अजून टेंशन देणारं होत आहे. आता ही ‘कहानी घर घर की’ झाली आहे. पण यात ही आनंद आहेच. याच आनंदाचा नमुना, घरातील प्रेमाचा उमाळा, निर्मळ आनंद, यांचा प्रत्यय आज सामायिक करीत असलेल्या कथेत वाचायला मिळतो. ज्यांच्या घरात दहावी, बारावी होती त्यांनी ही अनुभवला असेलच.

–🌼–
“समाधानाचे पेढे”

लेखक – योगिया

या वर्षी आमच्याकडे एकाची १०वी आणि दुसऱ्याची १२वी आहे. १२ वी वाला HSC ला आणि १०वी वाला CBSE ला. १२ वीचा रिझल्ट लागून आता त्याच्या JEE, CET आणि बाकी इंजिनिअरिंग कॉलेज च्या एंट्रन्स चालू आहेत. Continue Reading