सर्जनशील पालकांच्या समूहात मागच्यावेळी एक पोस्ट वाचनात आली होती आणि त्यात लहान मुलांना खेळू द्या त्यांना अडवू नका अशा आशयाची काही पोस्ट होती. आणि त्यावर मी अगदी सहमत होतो. एक उदाहरण देखील त्यात की दिलं होतं. मुलांना खेळू द्या त्यांच्या खेळातून त्यांना काय साध्य होतंय हे त्यांनाही कळत नाही.
आमच्या येथील सहा-सात मुलामुलींनी एकत्र येऊन ग्रुप बनवला. आणि पार्टी करण्याचे नियोजन ठरवले. साधारण वयोगट त्यांनी चार ते दहा असा ठेवला होता. पार्टीसाठी येणाऱ्यांना वीस रुपये प्रवेश फी होती आणि शिवाय पालकांची परवानगीसुद्धा. प्रवेश फी भरल्याची नोंद म्हणून त्यांना एक हस्तलिखित तिकीटही दिलं होतं. त्यावर सहभागी होणाऱ्याचे नाव आणि पत्ता होता.