पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी…..
दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा.
आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची.
कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी….
या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं.
तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.
आमच्या पिढीने आई, बापाचा कच्चून मार खाल्ला,