Back to Top

Tag Archives: teacher

शाळा सुरू

नुकतीच शाळा सुरू झालेली होती. मुलांना वर्गात बसवणे, नवीन मुलांची नावे लिस्ट मध्ये शोधून,त्या त्या टीचर ला सांगणे,छोट्या वर्गातल्या मुलांना त्यांचा वर्ग,शिक्षिका दाखवणे एकूणच घाई होती.त्यातही मुलं जवळपास दोन वर्षांनी नियमितपणे शाळेत येत होती.सगळंच विसरलेल्या मुलांना पुन्हा शाळेची,वर्गाची ओळख होऊन बसायला आठ दिवस तरी लागणार होते. बरं यामध्ये सगळे ते गुपचूप जाऊन वर्गात बसतीलच हे काही सांगता येत नव्हतं Continue Reading

मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरून बसतोस. लक्ष दुसरीकडेच. मन एकाग्र केलंस तरच कळेल न तुला. हे एकाग्र करणं, concentrate करणं काय असतं कुणास ठाऊक? आई बाबांना असं का वाटतं मुख्य म्हणजे हे एकाग्र कसं व्हायचं असा प्रश्न मुलांना पडतो आणि मुलांचं Concentration कसं करायचं, कसं वाढवायचं हे टेन्शन पालकांना असतं.

आज जरा Concentration वर प्रकाश टाकू या…
मुलांची एकाग्रता मोठ्या माणसांइतकी नसते पण जर मनाला सवय लावली, ट्रेनिंग दिलं तर काॅन्स्नट्रेशन स्पॅन वाढू शकतो.

पहिला प्रश्न म्हणजे…

1)मुलांची एकाग्रता (Attention span)किती दीर्घ असतो…?
मुलं एखाद्या गोष्टीवर किती काळ लक्ष एकाग्र होऊन शकतात? Continue Reading

अध्यापनाची खरी पद्धत…

अध्यापनाची खरी पद्धत…

एकदा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.

सर्वजन दिवसभर

व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?

स्पेलिंग पाठ करावेत की नाही?

कविता कशी शिकवायची?

अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे? Continue Reading