Back to Top

Blog Archives

#वास

भर दुपारची वेळ. तिने घराचं कुलूप ऊघडून आत पाऊल टाकलं अन् भस्सकन तो वास तिच्या नाकात शिरला. ती वैतागलीच.

कालपासूनच हा वाईट वास तिला त्रास देत होता, पण गंमत म्हणजे घरात बाकी कोणालाच तो येत नव्हता. पण तिला मात्र वासाने अस्वस्थ झालेली पाहून प्रत्येकाने तिची मस्त खिल्ली ऊडवली होती.

आता मात्र तो वास बऱ्यापैकी तीव्र झालेला होता. काल आपली चेष्टा करणाऱ्या प्रत्येकाला ओढत इथे आणून आता तो वास घ्यायला लावावा असं वाटलं खरं. पण मग मात्र आपल्या चरफडण्याचं लगेचच हसू आलं तिला.

आधी स्वैपाकघरात जाऊन तिने सगळे कप्पे, भाजीची टोपली वगैरे धुंडाळले.
छे !! कुठेही शिळे अन्न, खरकटे वगैरे काहीही शिल्लक नव्हते. कुठली भाजी वगैरे पण खराब झाली नव्हती.

मग काय असावं बरं ?
‘बाप रे, उंदीर किंवा पाल वगैरे मेलंय की काय कुठे ? ई ….’
मनातल्या मनात तिने शेजाऱ्यांना शिव्या पण घातल्या. यांनी विषारी औषध घालायचं न् आम्ही निस्तरायचं …

ती आख्खी दुपार स्वैपाकघर साफ करण्यातच गेली. सगळे काने कोपरे साफ झाले. माळ्यांवर पाहिलं. पण काहीच नाही.

मग बाहेरची खोली साफ झाली. नव्हतंच विशेष सामान तर काय … पण छे ! काहीच सापडलं नाही.

संध्याकाळी एकेक मेंबर मात्र घरात शिरले ते नाक वाकडं करतच. तिच्याकडे अपराधी मुद्रेने पहात. नजरेनेच आदल्या दिवशीच्या चेष्टेबद्दल दिलगिरी व्यक्त करत तेही या शोधाशोध उर्फ साफसफाई मोहिमेत सहभागी झाले. बाकीच्या दोन खोल्या, सगळे माळे सगळीकडे पाहिलं. पण व्यर्थच.
शेवटी तळमजल्यावर घर असल्याने बाहेरूनच वास येत असावा यावर सगळ्यांचच एकमत झालं.

दुसरा दिवस ऊजाडला. आता मात्र तो वास चांगलाच असह्य होऊ लागलेला. सगळेजण आपापल्या कामाला रवाना झाले तशी घराबाहेर फेरी मारली तिने. पण बाहेर तर वास येतच नव्हता. घरात शिरल्याबरोबर खात्रीच झाली तिची की याचा ऊगम कुठेतरी घरातच आहे. नाक वेडंवाकडं करून दीर्घ श्वास घेत इकडे-तिकडे फिरून ती वासाचा ऊगम शोधू लागली.

शेवटी त्या एका खोलीतच काहीतरी गडबड आहे याची खात्री झाली. आदल्याच दिवशी पलंगाखालचे काने-कोपरे न माळेसुद्धा साफ केले होते की !!
मग आता कुठे?
हां … खोलीतलं कपाट …
तिने कपाट ऊघडलं मात्र …

एकदम भपकारा आला. ती एकदम मागेच सरकली. तो वास जरा बाहेरच्या हवेत जिरू दिला अन् नाकावर हात धरून ती बारीक नजरेने कपाटाचं निरीक्षण करू लागली.

बघता बघता तिची नजर कपाटातल्या थेट खालच्या कप्प्यात ठेवलेल्या कपड्यांकडे गेली न् तिचे डोळेच विस्फारले. त्यावर एक लालसर काळा ओला डाग दिसत होता.
‘ई गं बाई … रक्त की काय हे ? बंद कपाटात हा ऊंदीर घुसला तरी कसा ?’ असं मनाशीच बडबडत तिने आजूबाजूला पाहिलं. छे! बाई काम ऊरकून गेली होती. घरातलं कुणीही संध्याकाळशिवाय परतणार नव्हतं. कुणाचीही मदत मिळणार नव्हती. तिला एकटीलाच हे काम करावं लागणार होतं.

जीव मुठीत धरून हळूच तिने तो कपडा पहिला. त्याला हात लावून पहिला. थंडगार ओला स्पर्श झाला. शहारत तिने हात मागे घेतला.

मग एका चिमटीत नाक पकडून मनातली किळस दाबत ती सावधपणे एकेक कपडा ओढून काढू लागली. आख्खा कप्पा रिकामा झाला पण काहीच नाही.
सगळ्या घड्या उलगडल्या. काहीच मिळालं नाही. बघता बघता वरचेही चारही कप्पे आवरले.
पण … सगळंच मुसळ केरात.

‘हे काय गौडबंगाल ???’ तिला काहीच कळेना. शेवटी परत कपडे कप्प्यात ठेवण्यासाठी ती कपाटाच्या दारासमोर फतकल मारून बसली आणि एकेक घडी व्यवस्थित ठेवू लागली.

आणि अचानक … टप्प …
कुठूनसा एक लाल-काळसर द्रवाचा ठिपका तिच्या हातावर पडला.
‘ई …..’ … बाहेर पडू पाहणारी किंकाळी कशीबशी दाबून तिने वर पाहिलं. कपाटाच्या दाराला एक पिशवी लटकलेली होती. ती तळाशी ओलसर दिसत होती आणि त्यातूनच तो ठिपका पडला होता.

झटक्यात मांडीवरचे कपडे दूर ढकलून ती ऊभी राहिली न् लांब जाऊन भयचकित नजरेने त्या पिशवीकडे पाहू लागली. ती हलत नाहीये किंवा त्यातून कुठलंही भूत बाहेर येत नाहीये याची खात्री पटल्यावर आधी तिने जाऊन हात खसाखसा धुतले. जरा बाहेर जाऊन निवांत बसली.

हे काम आपल्याला एकटीलाच निपटावे लागणार अशी मनाची तयारी करून, परत एकदा सगळं धैर्य एकवटून ती खोलीत आली. ती पिशवी हुकावरून अलगद सोडवून, ऊघडून न पाहता, ती जराही हलू न देता (जणू त्यात कधीही फुटू पहाणारा बाँबच आहे अशा) सावधगिरीने तिने बाल्कनीत ठेवली आणि बाल्कनीचं दार लावून घेतलं.

कपाटाची स्वच्छता न आवराआवर करून एकदाची ती बाल्कनीत आली. बराच काळ त्या पिशवीकडे एकटक पाहिल्यावर शेवटी मनाचा हिय्या करून तिने शक्यतो बोटाच्या फक्त टोकांनी ती पिशवी ऊचलली आणि सगळं धैर्य एकवटून ती ऊघडून आत डोकावली.
.
.
.
.
.
.
.
कधीकाळी भाजी आणायला ती पिशवी वापरली होती. गडबडीत एक टोमैटो तसाच राहिला होता न् त्यावर पांढरी बुरशी वगैरे येऊन पार सडून तो गळायला लागला होता.
तिला आतूनच वाकुल्या दाखवत होता.

आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, असंच प्रत्येकाला वाटत असतं. तर मग भाषा का अशी?

मेंदूशी मैत्री
शब्दांच्या नकारात्मक जोडण्या

काही घरांत मुलांना उद्देशून बरेचदा तुच्छ उद्गार ऐकू येतात. ‘तो हा असाच आहे मठ्ठ’, ‘तिला दोन वेळा समजून सांग, म्हणजे एकदा तरी कळेल’ , ‘किती मंद आहेस तू!’ असं बोलणं मुलांच्या कानावर सतत पडत असतं. हे खूपच साधेसुधे उद्गार इथे लिहिले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटींनी वाईट दूषणं, काही वेळा शिव्या आणि सोबत हाताचा वापरही चालतो. यामुळे वाढत्या वयातल्या मुलां-मुलींच्या मनात ‘आपले पालक जसे म्हणतात, तसाच मी असणार’, यावर विश्वास बसतो. कारण मुलांचं आईबाबांवर अतिशय प्रेम असतं. क्षणिक संतापातून उद्गारलेल्या शब्दातून त्यांच्या मनात केवढी खळबळ माजत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
लहान मुलांच्या मनात तर ‘आई / बाबा म्हणतात म्हणून आपण चांगले’/ ‘ते वाईट म्हणतात म्हणून आपण वाईट’ हे पक्कं होऊन बसतं. या संवादातून, प्रसंगातून त्यांचं मन घडत असतं.

मुलांच्या मनात स्वत:विषयीची प्रतिमा तयार होत असते. आत्मविश्वास निर्माण होण्याचा तो काळ असतो. आपण जसे आहोत, तसे खूप चांगलेच आहोत, याबद्दल त्यांच्या मनात काही दुमत नसतं. स्व-प्रतिमा दृढ होण्याचा हा काळ असतो. अशा वेळी दुसऱ्यांमधले दोष वास्तविक पद्धतीने सांगायला हवेत. अतिगोड किंवा अतिवाईट नव्हे; तर योग्य शब्दात सांगण्याची गरज असते. त्यांना न खचवताही हे काम आई-बाबा चांगल्या पद्धतीने करू शकतात. अभ्यासामुळे तर नात्यात दरी पडायलाच नको; किंवा आधीच दरी निर्माण झाली असेल तर ती रुंदावायला नकोच नको. शिक्षण हे महत्त्वाचं आहेच. शिक्षणाला नाकारून किंवा कमी महत्त्व देऊन चालण्यासारखं नाही. पण अडचणी समजून घ्यायला घेणंही तितकंच गरजेचं आहे. मुलांच्या मेंदूत न्युरॉन्समध्ये नकारात्मक शब्दांच्या जोडण्या तयार करण्याचं काम आसपासच्या माणसांकडून होत असतं. ते व्हायला नको.
आईबाबा जेव्हा शांतपणे, योग्य शब्दात मुलांशी प्रेमाने संवाद साधतात, तेव्हा ऑक्सिटोसिनच्या प्रभावामुळे मुलांच्या मनात आईबाबांबद्दल विश्वास निर्माण होतो. मुलं त्यांच्या सूचनांचा नक्कीच विचार करतात. स्वत:मध्ये असलेल्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण वाईट शब्दांचा सतत भडिमार केला तर त्यांना योग्य मार्ग सापडत तर नाहीच. उलट मानसिक गोंधळ मात्र वाढतो.

HOW TO INSPIRE MANNERS IN YOUR CHILDREN.

1. When entering the house greet your children or even hug them. This should help develop their sense of love and self worth.

2. Be good to your neighbours and never backbite. Never speak ill of other drivers when on the road. Your children would listen, absorb and emulate.

3. When calling your parents, encourage your children to speak to them. When visiting your parents take your children with you. The more they see you take care of your parents,the more they will learn to take care of you.

4. When driving them to school, don’t always play albums or cds in the car. Rather, tell them some motivational stories yourself. This will have a greater impact – trust me!

5. Read to them a short story and even a scripture a day – it doesn’t take much time, but very impactful in creating strong bonds and wonderful memories.

6. Comb your hair, clean your teeth and wear presentable clothes even if sitting at home and not going out for the day. They need to learn that being clean and tidy has nothing to do with going out!

7. Try not to blame or comment on every word or action they say or do. Learn to overlook and let go sometimes. This certainly builds their self-confidence.

8. Ask your children’s permission before entering their rooms. Don’t just knock and enter, but then wait for a verbal permission. They will learn to do the same when wanting to enter your room.

9. Apologize to your children if you made a mistake. Apologizing teaches them to be humble and polite.

10. Don’t be sarcastic or make fun of their views or feelings, even if you “didn’t mean it” and was “only joking”. It really hurts.

11. Show respect to your children’s privacy. It’s important for their sense of value and self-esteem.

12. Don’t expect that they will listen or understand the first time. Don’t take it personal. But be patient and consistent.

13. Pray with them. Show them how to pray. Lead by example.

14. In addition, ask them to discuss their daily plans after the morning prayers. Children without concrete daily plans usually join others in executing theirs. They fall easy to peer pressure.

15. Hold them and bless them specially every morning.

16. Always tell beautiful stories about your home town and village. Make them look forward to visiting there.

Remember other parents may need this, why keep it to yourself…! Kindly share further please.

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे :

1. मारल्यावर रडल्या बद्दल.
2. मारल्यावर न रडल्या बद्दल.
3. न मारता रडल्या बद्दल.
4.. मित्रांबरोबर खेळल्या बद्दल.
5. मित्रांबरोबर न खेळल्या बद्दल.
6. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्या बद्दल.
7. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल
8. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल.
9. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर.
10. उपदेश पर गाण गायल्या बद्दल.
11. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल.
12. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्या बद्दल.
13. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट केल्या बद्दल.
14. खायला नाही म्हंटल्यावर.
15. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर.
16. शेजाऱ्यांकडे खाल्ल्या बद्दल.
17. हट्टी असल्या बद्दल.
18. खूप उत्साही असल्या बद्दल.
19. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्या बद्दल.
20. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्या बद्दल.
21. खूप सावकाश खाल्या बद्दल.
22. भराभर खाल्या बद्दल.
23. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्या बद्दल.
24. पाहुणे खात असताना त्यांच्या कडे बघत राहिल्या बद्दल.
25. चालतांना घसरून पडल्या बद्दल.
26. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्या बद्दल.
27 मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्या बद्दल.
28. मोठ्यांशी बोलताना त्यांच्या कडे न पाहिल्या बद्दल.
29 मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्या बद्दल
30 रडणार्‍या मुलांकडे पाहून हसल्या बद्दल.