अभ्यास करण्याचे हे टेक्निक वापरून पहा.

   डाॅ.स्वाती गानू टोकेकर 

 मुलांचं पूर्ण दिवसाचं गच्च वेळापत्रक पाहिलं की साडेचार तास शाळा,येण्याजाण्यासाठी अर्धा ते एक तास, ट्यूशन किंवा क्लासचे दोन तास असे किमान सात ते नऊ तास मुलं अभ्यास नामक गोष्टीसाठी मुलं गुंतलेली असतात. उरलेल्या वेळेत होमवर्क, असाईनमेन्ट, प्रोजेक्ट पूर्ण करतात.सेल्फ स्टडी करता वेळही नसतो आणि एनर्जीही नसते.इच्छा तर मुळीच नसते पण अभ्यास तर करावाच लागतो.परीक्षा जवळ आली की पालकांकडूनही प्रेशर यायला सुरुवात होते.मुलांमध्ये स्थिरता कमी असल्याने बैठक फार तर अर्ध्या तासाची असते.मुलं कंटाळतात म्हणून अभ्यास करण्याचे हे टेक्निक वापरून पहा.

●या टेक्निकला PORODOMO म्हणतात.

●Francesco Cirilo या व्यावसायिकाने 1980 च्या उत्तरार्धात हे टेक्निक वापरलं.तो टायमर म्हणून टोमॅटोच्या आकाराचे घड्याळ वापरायचा.इटालियन भाषेत टोमॅटोला Pomodoro म्हणतात. म्हणून या टेक्निकचं नाव Pomodoro पडलं.

●काय आहे हे टेक्निक?
याच्या एकूण पाच स्टेप्स आहेत.
1) आपले गोल सेट करा.
आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी कोणत्या विषयाचा आणि कोणता,किती अभ्यास,किती तास करायचा याचे कागदावर प्लॅनिंग करायचे.एका विषयाची निवड करा.
2)Pomodoro Timer watch
घड्याळात पंचवीस मिनिटाचा टायमर लावायचा.त्या वेळेत फक्त ठरवलेल्या विषयाचाच अभ्यास करा.
3)25 मिनिटानंतर फक्त 5 मिनिटांची विश्रांती break घ्या.
4)असे किमान चारवेळा 25 मिनिटे अभ्यास आणि फक्त पाच मिनिटे विश्रांती break हे रिपीट करा.
5) मग मोठी विश्रांती पंधरा ते तीस मिनिटांची घेता येईल.
ही पद्धत परिणामकारक का ठरते?
कारण
1) टायमर लावल्याने अभ्यास अर्जंट करायचा आहे हे अर्जन्सी चे फीलिंग येते.सेन्स येतो.
2)पूर्ण दिवस अभ्यास करतोय ,करतोय ही भावना घेऊन अभ्यास करण्यापेक्षा पंचवीस मिनिटाचे उद्दिष्ट पूर्ण करणं सोपं वाटतं.लांबलचक दिवस, सारखं डिस्ट्रॅक्ट होणं हे प्रकार होत नाहीत.
3)मुलांना माहीत असतं की आपल्याकडे पंचवीस मिनिटं आहेत आणि त्या वेळेत आपल्याला आपण ठरवलेला अभ्यास पूर्ण करायचाय,प्रगती करायचीय.
4) सतत अभ्यास केल्याने जे बर्न आऊट फीलिंग येतं ते या टेक्निकने टाळता येतं.मुलांचा परफाॅरर्मन्स, प्रॉडक्टिव्हिटी वाढते.
5)पहिल्यांदा ही पद्धत थोडी अननॅचरल वाटते.कधी वाटतं टायमरकडे दुर्लक्ष करावं,अभ्यास कंटिन्यू करावा तर कधी कधी पंचवीस मिनिटं होतील असंही वाटतं पण हळूहळू मुलं फोकस्ड होतात.
6) हा जो पाच मिनिटाचा ब्रेक असेल त्यात फक्त ह्याच गोष्टी करायला परवानगी
1) छोटासा स्नॅक खाता येईल.
2) वाॅशरुमला जाता येईल.
3) पाणी पिता येईल.
4) डोळे बंद करुन जागेवरच मेडिटेशन करता येईल.

या ब्रेकमध्ये काय अजिबात करायचे नाही तर
NO mobile एरोप्लेन मोडवर मोबाईल टाका.
No Laptop
थोडक्यात स्क्रीन टाईम अजिबातच नाही.

या टेक्निकमुळे मुलांना येणारा थकवा,अभ्यास पुढे ढकलत राहणं,टाळाटाळ करणं,डोळ्यांवर ताण येणं,सारखं मोबाईलवर,लॅपटॉपवर स्क्रोल करणं,इंटरेस्ट संपणं,डेडलाईन मिस करणं,आळस टाळता येईल.
यामुळे मुलं ताजीतवानी राहू शकतील.त्यांचा स्ट्रेस कमी होईल. ही अभ्यास करण्याची अतिशय उत्तम व प्रभावी पद्धत ठरु शकते.मुलांना चांगले आणि मोठे गोल्स पूर्ण करायला ही पद्धत नक्कीच उपयोगी पडू शकेल. यामुळे फक्त पंचवीस मिनिटाच्या अभ्यास बैठकीची सवय लागेल अशी भीती नको कारण जसे मोठे होऊ तसे timing – Break ही चेन आपण मॉडिफाय करुच शकतो.
आणखी एक गोष्ट करुन पहा.तुमचा मुलगा/ मुलगी आणि त्याचा मित्र/मैत्रीण अशी जोडी पार्टनर म्हणून घेता येईल. त्यानेही ह्या पद्धतीने अभ्यास करायचा.दिवसाअखेर एकमेकाशी बोलले की चेक राहिल.
हे टेक्निक अभ्यास करण्यासाठी वापरुन तर पहा.मुलं नक्कीच यशस्वी होतील.