आषाढी एकादशीला विशेष🛑

1) उपवासाचे दही वडे झडपट तयार करा.

👉 साहित्य : 3 तो 4 कच्ची केळी, 2 चमचे मोरधनाचे पीठ, तूप किंवा शेंगदाण्याचे तेल, मीठ, तिखट, जिरी पावडर, मिरी पावडर, साखर, सर्व चवी प्रमाणे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं.

👉 कृती : केळी धुवून देठ काढून कुकर मध्ये 1 शिटी घेऊन वाफवा. कुकर मधून काढून थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून किसून घ्या. त्यात 2 चमचे मोरधनाचं पीठ घाला. मीठ, किसलेलं आलं, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून मळून घ्या. पीठ जास्त सैल करू नये. पेढ्या सारखे गोळे तयार करा.

कढईत शेंगदाण्याचे तेल किंवा तूप आपल्या इच्छे नुसार घालून तापवा. नंतर हे गोळे मध्यम आंचेवर तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.

⚫ दही तयार करण्यासाठी कृती.

एका भांड्यात दही घ्या त्यात काळी मिरी पावडर, जिरी पावडर, मीठ, साखर घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. दही घट्ट असल्यास त्यात थोडं दूध घाला. वडे थंड झाल्यावर दह्या मध्ये मिक्स करावे.

एका बाउल मध्ये दही वडे वर चिंचेची चटणी आणि इतर साहित्य जसे काळी मिरी पावडर, जिरी पावडर, तिखट, मीठ घाला आपल्या आवडी प्रमाणे घालून सर्व्ह करा.

⚫ चिंचेची चटणी करण्यासाठी.

👉 साहित्य : चिंच, गूळ, उपवासाचे मीठ, काळी मिरी पावडर, जिरी पावडर.

👉 कृती : चिंच उकळवून घ्यावी. त्या पाण्यात चिंच कोळून पाणी वेगळं करावं. एक भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवून त्यात गूळ घाला. गूळ वितळल्यावर त्यामध्ये चिंचेचं घोळ ( पाणी ) उकळवायला ठेवा. उकळवताना काळी मिरी पावडर, जिरी पावडर, मीठ, थोडे बेदाणे आणि खारखेचे तुकडे घालावं. आंबट गोड चिंचेची चटणी तयार.

2) उपवास बिस्किट प्रकार १
साहित्य- १ वाटी राजगिरा पिठ , १ वाटी शिंगाडा पिठ , १’ १/२ वाटी पिठी साखर , १ वाटी तूप ,ड्रायफ्रूट , वेलची
पूड , सोडा १/२ टी.स्पून.पीठ कोरडे वाटल्यास २ ते३ टे.स्पून दूध घाला.
कृती- प्रथम तूप फेसुन घ्या.नंतर पिठी साखर घालून चांगले मिक्स करा.व त्यात दोन्ही पिठ , वेलची पूड , सोडा घालून छान गोळा तयार करून त्याचे छोटे छोटे बिस्किटाचा आकार देऊन वरून बदाम लावून केक पात्राला तुपाचा पुसट हात लावून बिस्किट ठेवून ओव्हनमध्ये १५० डी.ला १० मि.ठेवा.
प्रकार २ साहित्य- १ वाटी राजगिरा पीठ , १ वाटी पिठी साखर , १/२ वाटी तूप , वेलची पूड कृती सर्व वरीलप्रमाणे. साखरेचे प्रमाण आवडी नुसार कमी करू शकता
उपवास बिस्किट तयार

3) वरईचा शिरा
१ वाटी वरई धुवून, १५ मिनिटे भिजवून, निथळून घ्या, २ चमचे तूप गरम करून वरई घालून खमंग भाजून त्यामध्ये ३ वाट्या उकळलेले दूर + पाणी घालून मध्यम आचेवर शिजू द्या, शिजत आले की १ वाटी साखर, आवडीनुसार ड्रायफ्रुट, वेलची पूड घालून झाकून शिजू द्या, एका केळाच्या पातळ चकत्या करून घाला, १ चमचा तूप सोडून १ वाफ येऊ द्या.
———————–
4) भगरीच्या ( वरई) खुसखुशीत वड्या
भगर धुवून, सावलीत सुकवून, पीठ करून घ्या. १ वाटी पीठ असेल तर दीड वाटी पाणी गरम करायला ठेवा, चवीनुसार मीठ, जीरे, मिरचीचे तुकडे, आल्याचा किस,भगरीचे पीठ घालून ढवळून घट्ट होईपर्यंत शिजवावे. २ बटाटे किसून, पाण्यातून काढून, पिळून यात मिसळून २-३ मिनिटे वाफ येऊ द्या, गोळा झाला की थाळीत थापून हव्या त्या आकाराचे काप करून शॅलो फ्राय / डीप फ्राय करून घ्या
5) उपवासाची इडली।
साहित्य :- 2 वाटी भगर ,म्हणजे वरई, 1वाटी साबुदाणा ,मीठ,दही1वाटी (आंबट नको)

कृती :- वरई मिक्सर मध्ये सुकीच फिरवून घ्यावी इडली रव्यासारखी तसेच साबुदाणाही खूप बारीक फिरवून घ्यावा व हे दोन्ही मिक्स करावे व त्यात दही व पाणीघालून मिक्स करावे (इडलीच्या पिठासारखे मिश्रण तयार करणे) आणि 1 तास ठेवावे, व इडली करताना त्यात मीठ व चिमूटभर सोडा घालून इडली पात्रात इडली तयार करणे ,सोबत भाजलेल्या शेंगदाणा व खोबऱ्याची चटणी करावी व या चटणीला तूप व जिऱ्याची फोडणी द्यावी