औद्योगिक मानसशास्त्र

……….

• जेव्हा Netflix चा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्व अधोरेखित होते. गेलेल दशक हे माध्यमांच होत, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं.

आपल्या मेंदू मध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरवात झाली. ह्या माहिती ला process करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. Netflix भारतात २०१६ पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरवात केली जे मानवी मेंदू साठी प्रमाणाबाहेर होत. जस high calories वाल अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो तसच अति प्रमाणात information calories खाऊन मेंदूवर चरबी चढते कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. Binge eating प्रमाणे binge watching ने शरीराची व मनाची वाट लावायला सुरवात केली. भारतीयांनी दिवस व रात्र स्क्रीन वर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री व झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा व आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले, ही व्यसन व त्यातून येणारे शारिरीक व मानसिक आजार पण वाढले, औद्योगिक राष्ट्र म्हणून प्रगती करणारा आपला देश हळूहळू आजारी देश बनत चालला.

हे सगळे त्रस्त मेंदु अनेक बदमाश लोकांसाठी लवकर पटणारी ग्राहक होती. कुठल्याही औदयोगिक देशातील कामगारांप्रमाणे भारतातील working class पाशी पैसा होता पण सोबतीला कामाचा ताण, कर्जाचे हफ्ते, नात्यातील चढ उतार असे त्रास पण होतेच.

इंटरनेट ने ह्या सगळ्या त्रासलेल्या मेंदूना एक सोपा मार्ग दिला जेणेकरून रोजच्या जगण्यातून दोन घटका करमणूक पण होईल, ताण हलका होईल व कुणाला कळणार पण नाही. खोटी ओळख निर्माण करून काहीही केलेलं कुणालाच कळणार नव्हतं मात्र इंटरनेट हेच सगळ्यात मोठं व्यसन ठरलं. Social media, पॉर्न, गेमिंग, ऑनलाइन डेटिंग, ह्या सगळ्यातून मेंदूत आनंदाचं रसायन डोपामाईन निर्माण होत, जे लोक मनाने कमकुवत असतात ते रसायन परत परत मिळवण्यासाठी या आभासी दुनियेत हरवून आनंद शोधत व्यसनी होतात.

हे सगळं सुरू असताना अनेक हुशार मेंदू इंटरनेट वापरणाऱ्यनच्या वागणुकिवर लक्ष ठेवून होती. जी लोक दुसर्यांना त्रास देऊन आनंद मिळवितात त्याना त्या कामाचे पैसे मिळाले अश्यांसाठी तर cyber bullying, trolling हे आवडते उद्योग ठरले. Social media वर अशी असंख्य तोल गेलेली टाळकी कामाला आहेत जी द्वेष व दुजाभाव पसरवण्याचे काम आनंदाने करतात कारण अस काम त्यांच्या मनाला आनंद देत.

ह्या लोकांचे गट आहेत
-पैसे घेऊन खरी ओळख दाखवून करणारे
-खरी ओळख न दाखवता व पैसे न घेता करणारे
-पैसे घेऊन खरी ओळख न दाखवता करणारे

अचानकपणे एवढी राष्ट्रभक्ती कुठून आली ? लोक वेड्यासारखे एकमेकाशी भांडायला का लागलीत ? आमच्या सारखा विचार नाही केला तर तुम्ही आमचे दुष्मन ही भाषा का ऐकू येत आहे? यातील लोकांना वेगळेच मानसिक त्रास आहेत पण त्याच्यावर उपाय न करता लोकांवर इंटरनेट वर येऊन भडास काढणे सुरू आहे. गेल्या काही वर्षात बलात्कार व शारीरिक हिंसा प्रचंड वाढली आहे. भाषा सुद्धा हिंसक आहे, काव्य, सोज्वळपणा, साधेपणा हद्दपार झाला आहे, आयुष्य एक crime thriller असल्यासारखी लोक एकमेकांवर उगीच संशय घेत भांडण ओढवून घेत आहेत, नाती तुटत आहेत.

गेल्या ६ महिन्यातील घटना बघितल्या तर अस जाणवतंय की लोक हिंसा बघून आनंदित होतंय किंवा त्याना त्याच काहीच वाटत नाही आहे. कोणीही सर्वसाधारण मानसिकता असलेली व्यक्ती दुसऱ्यावर हिंसा ( शारीरिक व मानसिक) सहन करू शकत नाही व बघू पण शकत नाही पण Netflix, Prime सारख्या लोकांनी हिंसेचा व लैगिंक विकृती च supermarket उघडून ठेवलं आहे, त्याच्या सोबतीला बाकीच्या विकृत गोष्टी आहेतच.

हे अनैसर्गिक व अमानवीय वर्तन हे अचानक आलं नाही. वेगवेगळे न्युज चॅनेल्स ज्या पद्धतीने ब्रेकिंग न्युज दाखवितात त्या अवैज्ञानिक आहेत. मानवी मेंदू विचार करायला वेळ घेतो. मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे, amygdala हे भीतीवर काम करते व cortex हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीर ला संदेश देतो की आता स्वतःच रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जात किंवा भीती वाटणाऱ्या शी दोन हात करायला सज्ज होत, ह्याला flight/fight अस नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असत. Breaking news मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही कारण 24*7 वेगवेगळी माध्यम व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. हे सगळं खूप कठीण आहे पण आपण सगळेच यातून जात आहोत. ह्या सगळ्या गोष्टी माणसातील पशुला जाग करण्याचं काम करतात व तो पशु शांत करणं जवळजवळ अशक्य आहे.

सगळ्यांची डोकी जाणूनबुजून “तापवली” गेली आहेत, तेव्हा सारासार विचार करणं कठीण आहे पण अशक्य नाही. मेंदू वर किती ताण द्यायचा व किती माहिती वाचायची व तिची शहानिशा करूनच पुढे जायचं हे आपल्या हातात आहे. समोरच्याने कितीही घाण बोलल पण लगेच उत्तर देणे, पोस्ट upload करणे, त्यापेक्षा घाण बोलणे हे अविचारी पणाच लक्षण आहे.

हे एक मानसिक युद्ध आहे ह्यात जिंकायचं असेल तर हिंसा, लैगिंक विकृती असलेल्या गोष्टी न बघणे, रोज 7-8 तास झोप घेणे, झेपेल असा व्यायाम व सकारात्मक विचार करणे हे उपाय आहेत.

दुसरयला कसलाही प्रकारचा त्रास देणारा कुणीच खुश व आरोग्यदायी राहुच शकत नाही. तुम्ही पण विकृत मानसिकतेचे आहात का ह्याचा नीट विचार करा व जबाबदारीने वागा.

डॉ वृषाली रामदास राऊत,
औद्योगिक मानसशास्त्रज्ञ!