ज्ञान प्रबोधिनी, छात्र प्रबोधन तर्फे सुट्टीतील मोफत उपक्रम
साहित्याची आवड वाढवणारा व अभिव्यक्तीला चालना देणारा, सुट्टीतला ‘ऐका-पाहा-वाचा-करा’ मोफत उपक्रम
(मराठी वाचू, समजू शकणाऱ्या ५ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी)
कालावधी – १ ते ३१ मे २०२२
उपक्रमाची वैशिष्ट्ये –
• ऐका, पाहा, वाचा, करा यापैकी रोज १ लिंक
• त्यामध्ये दर्जेदार कथा, कविता, ललित लेख, माहितीपर, व्यक्तिविकसनपर लेख, विविध विषयांवरील चित्रफिती व कल्पक कृतींचा समावेश (सर्व साहित्य मराठीत)
उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरून सबमिट करावा. त्यानंतर वॉट्सॲप गटाची लिंक येईल त्यावर क्लिक करून गटात सहभागी व्हावे!!
गुगल फॉर्म ची लिंक https://forms.gle/1c3PPLFmw4Bif9w86
या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी सुमारे ४५०० सदस्यांनी याचा आनंद घेतला…
प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
तुम्ही आजच नोंदणी करा. आणि
तुमची भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंतही ही माहिती आवर्जून पोहोचवा