निर्णयशक्ती कमकुवत असणारे लोक खूप अहंकारी असतात. निर्णय घेता येत नाही हे मान्य न करता ते फक्त चिडचिड करतात.

सहकारातील अनेक सभांमध्ये निर्णय घेता येत नसल्याने खडाजंगी होऊन सभा संपतात.

निर्णय घेता न येणे हा शारिरीक कमकुवतपणा सारखा मानसिक कमकुवतपणा आहे. तो सवयीने घालवता येऊ शकतो.

अनेकदा पटापट निर्णय घेऊ शकणारा माणूस बुद्धीच्या वापराच्या बाबतीत कमजोर असतो. त्याचे निर्णय भावनाप्रधान होऊन चुकतात.

अनेकदा एका समस्येसाठी गोळा केलेल्या माहितीचे दुसऱ्याच दृष्टिकोनातून विश्लेषण करून निर्णय चुकतात.

उदाहरणारर्थ देवस्थानांच्या विकासासाठी निर्णय घ्यायचा असेल तर तो त्या देवस्थानातील देवाच्या भक्तीच्या चर्चेमध्येच संपून जातो आणि निर्णय होऊ शकत नाही किंवा चुकीचा निर्णय होतो.

जेव्हा विचार बुद्धिनिष्ठ नसतात तेव्हा निर्णयांवर भावनांचे साम्राज्य पसरते.

जेव्हा जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण कसे करायचे? हे बुद्धीला समजत नसते, तेव्हा भिती आनंद दुःख घृणा इत्यादी भावना त्या माहितीचा बॉल करून एकमेकांकडे फेकत राहतात.

अनेकदा आपली इफिशियन्सी दाखविण्यासाठी लोक खूप फास्ट आणि चुकीचे निर्णय घेतात, तर काहीजण आपल्या जुन्या अनुभवांचा चष्मा वापरून नव्या घटनेकडे पाहतात आणि चुकीचे निर्णय घेतात.

योग्य ते बुद्धिनिष्ठ आणि छोटे छोटे निर्णय घेत मोठ्या निर्णयापर्यंत पोहोचणे, आवश्यक तिथे योग्य असे सल्ले घेत पुढे जाणे आणि शेवटी अचूकता गाठणे, हे निर्णय घेण्यातील शास्त्रोक्त टप्पे आहेत.

असे योग्य निर्णय घेऊ शकणारी व्यक्तीच आपले चुकलेले निर्णय सुधारून घेऊ शकते, आपल्या निर्णयामुळे झालेले डॅमेज टाळू शकते, दुरुस्त करू शकते आणि अंतिमतः आपल्या आयुष्यात समाधानी होऊ शकते.

सुखाची श्रीमंतीची जिंकण्याची किंवा सर्वोच्च पदावर पोहोचल्यामुळे शर्यतीत जिंकल्याची कोणतीही भावना माणसाला आयुष्यात आनंद आणि समाधान देऊ शकत नाही.

आपल्या मुलांना योग्य ते निर्णय घेण्यास शिकविणे, त्याच्या निर्णयप्रक्रियेतील कच्चे दुवे शोधून ते दूर करणे, हे उत्तम पालकांचे कर्तव्य आहे. उत्कृष्ठ निर्णय घेऊ शकणारे मूल हे पालक उत्तम आणि जाणकार असल्याचे लक्षण आहे.

~ विनय भालेराव.