म्हाळोजी बाबा घोरपडे

मुकर्रबखानाची फौज व संगमेश्वराच्या इतिहासातील एक अपरिचित योध्दा

शंभुराजेंसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या म्हाळोजींची शौर्यगाथा

विरगती : फेब्रुवारी १६८९

मुकर्रबखानाची फौज व संगमेश्वराच्या इतिहासातील एक अपरिचित योध्दा म्हाळोजी बाबा मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली असताना स्वराज्यासाठी लढणारे ५०० मावळे सज्ज झाले . मुकर्रबखान च्या मोठ्या अफाट फौजेला लढा देण्यासाठी . कडाडला एल्गार हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या . झाडा – पानांवरची पाखरं फडफड करत उडाली . . . अरे काळोख थरारला . . . रात्र थरारली . आक्रोश – किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला , शौर्याची लाट उसळली . . . अवघ तुफान तुफान झालं . . . अरे एकेक मावळा झुंजत होता . . . शर्थीनं लढत होता . बस्स्स . मोगलांची कापाकापी करत होता . . . जसे आपले शिवराय सांगायचे माझा एक मावळा १०० लोकांना भारी तशीच हि काही ५०० ची मराठा फौज स्वराज्य रक्षणासाठी लढत होती . अश्या लढाईत ६० वय असणारे म्हाळोजी म्हणाले आता बस्स आणि पडले तुटून रक्ताच्या चिळकांड्या उडवू लागले , प्रेतांचा थर साचू लागला , हर हर महादेव ची डरकाळी फोडत म्हाळोजी फिरत होते अशे शौर्य पाहत मुकर्रब उभा होता आणि ते पाहून म्हणाला इस बुढे को पहले लगाम डालो . . . फिर बाकी को देखो । असं म्हणताच त्याची फौज म्हाळोजी ना विळखा घालू लागली अभिमन्यू सारखा आपला साठीचा म्हाळोजी अडकला मुघल सेना म्हाळोजीवर तटन पडली दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणारे म्हाळोजी खाली पडले रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली , असलं अफाट अफाट धैर्य , शौर्य मुकर्रबखान ने बघितलं आणि पाहिलं वाघ तो वाघच , असला ढाण्या वाघ पाहून मुकर्रब ने कमानमाराला बोलावले आणि म्हाळोजीवर निशाणा साधला . पहिला तिर उजव्या दंडात शिरला शमशेर खाली पडली दुसरा तिर कंठात घुसला दोन्ही समशेरी खाली पडल्या

नि:शस्त्र झाला म्हाळोजी . मुंगीसारखं सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं अशी एक जागा शरीरावर नाही राहिली जिथे वार झाले नाही रक्तबंबाळ झालेला म्हाळोजी मातीत पडला… माती उडाली त्या धिप्पाड शरीराला पाहून . अखेरचा श्वास फुलला . . . डोळे लवले , ओठ हलले . त्या श्वासानं माती ऊंच उडाली . . . आणि त्या ऊंच उडालेला मातीला म्हाळोजी सांगता झाला . . . सांगा माझ्या राजाला . . . हा म्हाळोजी गेला . . मातीत मेला . . . पण नुसता मातीत नाही मेला . . . मातीसाठी मेला.. अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात , पर मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात अश्या योध्याने मातीसाठी प्राण सोडले , अरे मातीच नाही स्वराज्यासाठी आपल्यासाठी त्याने अशी अभूतपूर्व कामगिरी आणि स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले.

🏇 म्हाळोजी घोरपडे यांचे घराणे

काशीकर घराण्यांत म्हाळोजी घोरपडे हे मुख्य होत . त्यांनी बादशहाची चाकरी सोडून शिवाजी महाराजांचा पक्ष धरिला होता . शिवाजीमहाराजांची एकनिष्ठेनें चाकरी करीत असत . त्यांस संताजी ( स्वराज्याचे धडाडीचे सेनापती मराठा सरदार संताजी घोरपडे ) , बहिरजी व मालोजी ( संगमेश्वर च्या लढाईत मुकर्रबखानाची लढताना मृत्यू ) असे तीन पुत्र झाले . ते तिघेही पराक्रमी निघाले . तेव्हां शिवाजी महाराजांनी त्या तिघांस तीन स्वतंत्र पथकांची सरदरी सांगून त्यांची चाकरी हंबीरराव सेनापतीच्या निसबतीस लावून दिली . रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले संगमेश्वर हे ‘ कसबा संगमेश्वर ‘ म्हणून ओळखले जाते . संगमेश्वर गावाचे खरे नाव नावडी . त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत , त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे
तेथील वास्तव्य . कसबा संगमेश्वर येथून जवळच असलेल्या कारभाटले गावात म्हाळोजी बाबा यांची समाधी आहे .