द्वादशीला करण्यात येणारी वाघाटीची भाजी

आषाढ महिन्यात येणारी वाघाटी म्हणजेच अमृत फळ, गोविंद फळ ही एक रानभाजी. ह्या भाजीत अनेक औषधी गुण आहेत उदा. कफ नाशक, वात नाशक, पित्त नाशक, भूक न लागणे, उष्णता मुळे अंगावर गळवे उठणे, कॅन्सर, गजकर्ण, इसब सोरायसिस मुळे पडलेल्या भेगा, भगंदर, थायराईड, लघवी न होणे, अपचन , त्वचा विकार ह्यावर उपयुक्त असून धातू पुष्ट होणे, रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे.

द्वादशीला करण्यात येणारी वाघाटी भाजीची रेसिपी
साहित्य –
10 वाघाटीची कोवळी फळे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 लहान चमचा जिरे
6 लसूण पाकळ्यांची पेस्ट
अर्धा इंच अद्रक ची पेस्ट
एक लहान चमचा लाल मिरची पावडर
एक लहान चमचा गरम मसाला
4 चिमूटभर हिंग
अर्धा लहान चमचा हळद
चवीनुसार मीठ
आवश्यकता नुसार तेल
2 लहान चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
वाघोटीची फळे स्वच्छ धुऊन पुसून  घ्यावीत. त्य