पालकसभा
भाग २
माझं लहानपण शहरी भागात गेलं . तिथे कधी मला टायर वगैरे खेळायला मिळाला नाही. त्यामुळे अन्वयच्या पालकसभेत टायरमध्ये उड्या मारा वगैरे प्रकार करायला खूप धम्माल आली.
अनेक आयांनी अगदी लाईन लावून दोरीच्या उड्या मारल्या. खूप जणींनी नंतर सांगितलं की शाळा सुटल्यानंतर , लग्न झाल्यावर त्या हे खेळ खेळल्याच नव्हत्या . काहीजणी घुंगरू बांधून सगळ्यांसमोर नाचायला घाबरत होत्या , त्यांना तयार करून करून नाचायला लावलं . स्वत:च्या पायातल्या घुंगरांचा आवाज ऐकत आपोआप त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू उमटत होतं .
बायांनो स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी थोडा तरी वेळ काढा .. पाहा तुम्हालाच किती फ्रेश वाटेल हे पण या पालकसभेने अनेकजणींना सांगितलं असेल !