शकारी

शकारी विक्रमादित्य म्हणजेच दुसरा चंद्रगुप्त मौर्य याची जीवनगाथा

लेखक: जनार्दन ओक

मूल्य: ३९०₹ टपाल ३०₹ एकूण ४२०₹ घरपोच

 

चंद्रगुप्त द्वितीय हा गुप्त घराण्यातील दुसरा श्रेष्ठतम राज्यकर्ता होता. समुद्रगुप्ताने सुवर्णयुगाचा पाया घातला तर चंद्रगुप्ताच्या कारकीर्दित वैभवशाली सुवर्णयोगच अवतरले होते. त्याच्या कालखंडापर्यंत विस्तारवादाची प्रक्रिया पूर्ण होऊन विशाल साम्राज्यांची निर्मिती झाली. आर्थिक समृद्धीने उच्चांक गाठला होता. राजकीय स्थैर्य आणि सुबत्तेमुळे साहित्य,शास्त्र कलाक्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली होती. गुप्ताच्या सांस्कृतिक प्रगतीने हिमालयाची उत्तुंगता गाठली होती. चंद्रगुप्ताचा काळ भारतीय संस्कृतीचा उत्कर्ष बिंदू ठरला. म्हणून डॉक्टर मुजुमदारांनी सांस्कृतिक प्रौढत्वाच्या नवयुगाचा निर्माता म्हणून त्याचा गौरव केला. अशा या महान गुप्त सम्राटाचा राजकीय इतिहास मात्र सुसंगतपणे आढळत नाही.

बाणभट्टाने देवी चंद्रगुप्तम् नाटकाचा आधार घेऊन चंद्रगुप्ताने शक राजाचा पराभव कसा केला तो वृत्तांत कथन केला आहे. राजशेखरची काव्यमीमांसा, रामचंद्राचे नाट्यदर्पण, भोजाचे शृंगाररूपकम् व अन्य संस्कृत साहित्यातून चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीची माहिती मिळते. द्वितीय चंद्रगुप्तास विक्रमादित्य आणि शकारी अशा पदव्या आहेत. गुप्तकालीन आलेख व चंद्रगुप्ताची असंख्य नाणी उपलब्ध आहेत. ऐरण स्तंभालेख, उदयगिरी शिलालेख, सांची आलेख, मथुरा स्तंभालेख, मेहरोली लोहस्तंभ ही विश्वसनीय साधने आहेत.

विक्रमादित्यच का ? ही कथा आहे एका शूर योद्धयाची – एका सम्राटाची , ज्याने भारतावर आक्रमण करून आलेल्या शकांचा मोड करून शकारी ही उपाधी सार्थ केली . या सुवर्णभूमी नावाने ख्यातनाम असलेल्या देशावर अनेक आक्रमणे झाली या राष्ट्राची धर्म , संस्कृती यांचा नाश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . परंतु वेळोवेळी राष्ट्रभक्त शूर पुरुषांनी या आक्रमणांना नि : खंदून टाकले . आज राष्ट्र पुन्हा त्याच संकटात आहे . चारही बाजूंनी आक्रमण होत आहे . राष्ट्रनेते राष्ट्रहित दूर सारून स्वत : चा पक्ष , स्वत : चा स्वार्थ यात मश्गुल आहेत . प्रजा भेकड बनली आहे . ही स्थिती बदलायची असेल तर …. ” शकारी ” विक्रमादित्याचे स्मरण आवश्यक आहे , नव्हे अत्यावश्यक आहे .