Back to Top

पालकसभा

पालकसभा

भाग १
पालकसभा म्हंटलं की , इतर पालकांना भीती वाटते पण अन्वयच्या शाळेची पालकसभा असली की आम्हाला उत्साह येतो. कारण आमच्या पालकसभेत आम्ही मुलांसारखे खेळ खेळतो , सोबत गातो आणि नाचतो सुद्धा ! प्रत्येक पालकाला परत एकदा मूल होण्याची संधी देणारी आणि त्यातून आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी तयार करणारी ही आगळी वेगळी पालकसभा आणि तशीच आगळी वेगळी अन्वयची शाळा – डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा , गोरेगाव . – मराठी माध्यम .
या पालकसभेत आम्हा सर्वांसाठी वेगवेगळ्या वर्गात खेळ मांडून ठेवले होते. जे मुलं रोज करतात ते आम्हाला करायचं होतं . आम्ही इंग्रजीचे शब्द बनवले , सोंगट्या वापरून गणितं सोडवली , घुंगरू घालून नाचलो , मातीकाम केलं , टायरमधून उड्या मारल्या , भोवरा – दोरीच्या उडया , ठोकळे रचणे , चित्र काढणे .. अशी सगळी धम्माल केली. शाळेत असताना करायचो तसा टवाळपणा पण केला. काही गोष्टी करायचा कंटाळा पण केला . आणि मग मनाशीच आपण मुलांकडून सगळं शिस्तीने झालं पाहिजे अश्या अपेक्षा करतो त्याचा विचार ही केला.
या पालकसभेत सर्व पालकांना पाव किलो गवारीची भाजी घेऊन बोलावलं होतं . नवरा बायकोने मिळून गवार निवडायची असा एक टास्क होता – त्यातून घरी कोण किती काम करतं . मुलांकडे लक्ष देणं ही फक्त आईचीच जबाबदारी आहे का ? यासारख्या खूप महत्वाच्या गप्पा पण झाल्या.
अश्या पालकसभा पालक म्हणून खूप आनंद देऊन जातात . आपलं मूल एका छान शाळेत जातंय . तिथे ते फक्त रट्टा मारण्यासाठी तयार न होता माणूस म्हणून वाढणार आहे हा विश्वास वाटतो . सर्व मुलांना अशी आनंदी शाळा मिळो आणि सगळ्या पालकांना अश्या नाचता गाता येणाऱ्या पालकसभा मिळोत !

Read more

मी तुझ्या सोबत आहे

मी तुझ्या सोबत आहे
!आपल्यापैकी अनेकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला सायकल चालवायला शिकवली असेल किंवा किमान हाताला धरून चालायला तर नक्की शिकवले असेल!
काय करतो आपण मुलांना या गोष्टी शिकवताना?
सुरुवातीला मूल थोडंसं घाबरत असतं. आपण त्याला प्रेमाने समजावतो, प्रोत्साहन देतो. सुरुवातीला त्याचा किंवा तिचा हात घट्ट पकडतो. मग हळूहळू मूल चालण्याचा किंवा सायकल चालवण्याचा स्वतः हुन प्रयत्न करू लागते.

Read more

Hold the mother, not the baby.⁣

Hold the mother, not the baby.⁣
Because the baby’s being taken care of—⁣
fed, snuggled, and given all the love in the world—⁣
by not only the mother,⁣
but her partner, grandparents, siblings, cousins, and friends.⁣
But the mother,⁣
may have gaps in her mind from lack of sleep,⁣
may be mechanical in her motions as she’s healing,⁣
may feel more like a mess than a mother,⁣
may be sitting in bed, crying, feeling overwhelmed in her body and life,⁣
may be full of mom guilt because in her mind, “she’s not good enough,”⁣
and she’s bleeding, wincing in pain, swollen and emotional.⁣
And the mother’s that baby’s whole world and needs to be seen, so she doesn’t disappear into that postpartum fog.⁣
So, hold the mother, not the baby.⁣
A mother agrees that her baby matters more.⁣
But she’s hurting, while she’s the person behind the baby,⁣
in the background, making it all happen:⁣
feeding her baby at all hours,⁣
snuggling her baby close to comfort newborn cries,⁣
and being that baby’s everything.⁣
So, it’s the mother who needs your love.⁣
And a mother will remember who held her up.⁣
So instead of “I’m coming to see the baby,”⁣
try saying, “I’m coming to see you 𝘢𝘯𝘥 meet the baby, too.”⁣
Because the mother needs to be held more.⁣

Read more

मी तुझ्या सोबत आहे!

मी तुझ्या सोबत आहे!
आपल्यापैकी अनेकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला सायकल चालवायला शिकवली असेल किंवा किमान हाताला धरून चालायला तर नक्की शिकवले असेल!
काय करतो आपण मुलांना या गोष्टी शिकवताना?

Read more

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

Read more

उगवतीचे रंग

उगवतीचे रंग

‘ तेच ते…’

बऱ्याच रसिकांना कविवर्य विंदा करंदीकर यांची ‘ तेच ते…’ ही कविता माहिती असेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा विंदा चाळीसगावला आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ही कविता ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी मी लहान असल्याने त्या कवितेतला गहन अर्थ कळला नव्हता. पण आपल्या जीवनात त्याच त्या असलेल्या गोष्टी सारख्या कराव्या लागत असल्याने येणारा वैताग मात्र बालसुलभ मनाला कळला होता. आज विंदा असते तर अजून भरपूर विषय त्यांना या कवितेत भर घालायला मिळाले असते.

Read more

अढी…

अढी…

 

आईचं दिवसकार्य झालं आणि नातेवाईकांनी घरचा रस्ता धरला. उषानेही आपले कपडे बॅगेत भरायला सुरूवात केली.
रत्ना, तिची वहिनी म्हणाली, “उषा, तू पण लगेच निघणार? राहिली असतीस जरा…” पण दोघींनाही त्यातला पोकळपणा माहित होता.
आई असतानाही उषा क्वचितच माहेरी रहायला आली होती. आई दवाखान्यात अ‍ॅडमिट असताना, तिने कर्तव्य म्हणून सगळं केलं, पण आपल्या घरून येऊन – जाऊन. तिचा नवरा, महेशही सकाळी म्हणाला, “तुला रहायचं असेल तर माझी काही हरकत नाही. मी आणि आई दोघे जातो. तू तुझ्या मनाप्रमाणे ठरव.” पण उषा बॅग भरून त्यांच्याबरोबर निघालीच

Read more

पारंपरिक वाणांची बीज बँक

पारंपरिक वाणांची बीज बँक 🌱
वेगवेगळय़ा हंगामांतील विविध पारंपरिक पिकांच्या निरोगी आणि सर्वोत्तम बिया गोळा करून त्या बांबूच्या टोपल्यांमध्ये अथवा मातीच्या भांडय़ांत र्निजतुकीकरण करून साठवून ठेवल्या जातात, या संचयाला बीज बँक असे म्हणतात. ही पद्धत इतर अनेक संस्थांबरोबरच ‘बायफ’नेही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर विकसित केली आहे. यामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे.

Read more

मैत्री

त्याची अन् तीची सोशल मिडीयावर ओळख झाली. चॅटिंग करता करता गहिरी मैत्री झाली. दोघांनी ही वेळोवेळी मैत्री नितळ राहण्यावर भर दिला. नात्यातले पावित्र्य हाच त्यांच्या मैत्री चा आधार बनला.

एक दिवस दोघे भेटले अन चित्रपट पहायला गेले. चित्रपटातील आईचा संघर्ष अन वेदना बघून तो विव्हळ झाला. त्याचे संवेदनशील मन भरून आले. तिच्या नजरेने हे हेरले. अन् तीने हलकेच त्याला थोपटले.
तो तीच्या खांद्यावर डोके ठेउन अश्रुवला अन् तीनेही त्याचे सांत्वन केले. तो गेला स्वतःच्या गावी अन् sms केला कि काल तू मला आईचे वात्सल्य दिले. Thanks mom . ती गहिवरली.

Read more

नागरिक

राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात तर सामान्य व्यक्ती 27 वा नागरिक असतो बाकी 26 नागरिक कोण ? ते पहा

नागरिक (01) – राष्ट्रपती, ज्या आता द्रौपदी मुर्मू असतील.द्वितीय नागरिक (02) – उपराष्ट्रपती
तृतीय नागरिक (03)- पंतप्रधान, नरेंद्र मोदी हे या स्थानावर आहेत.
चौथे नागरिक (04)- (संबंधित राज्यांचे) राज्यपाल
पाचवे नागरिक (05) – देशाचे माजी राष्ट्रपती. ( सध्या या स्थानावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आहे. रामनाथ कोविंद निवृत्त झाल्यानंतर ते 5व्या क्रमांकाचे नागरिक बनतील.)
पाचवे नागरिक (A) (05A) – देशाचे उप पंतप्रधान

Read more