Back to Top

#मुलांचा अभ्यास

#मुलांचा अभ्यास

ही लेखमाला लिहीत असताना या संदर्भात च एक सुंदर अनुवादित कविता वाचनात आली.आज आपण सर्व पालक ती समजून उमजून घेऊ आणि आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.

शिकवा मुलांना

अगोदर शिकवा मुलांना सांजा, मैदा आणि पिठातला फरक ओळखायला.

शिकवा त्यांना मूग, मसूर, उडीद, हरभरा आणि तूर ओळखायला.

अगोदर शिकवा मुलांना लोणी, तूप, पनीर आणि चीज यांमधला फरक ओळखायला
आणि त्यांना तयार करायलाही.

Read more

मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

मुलांची एकाग्रता कशी वाढवता येईल…..?

नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरून बसतोस. लक्ष दुसरीकडेच. मन एकाग्र केलंस तरच कळेल न तुला. हे एकाग्र करणं, concentrate करणं काय असतं कुणास ठाऊक? आई बाबांना असं का वाटतं मुख्य म्हणजे हे एकाग्र कसं व्हायचं असा प्रश्न मुलांना पडतो आणि मुलांचं Concentration कसं करायचं, कसं वाढवायचं हे टेन्शन पालकांना असतं.

आज जरा Concentration वर प्रकाश टाकू या…

Read more

पालकत्व

एकवेळ आईबाबा होणं सोप पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पध्दती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्यांचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्टयपूर्ण व्यक्तीमत्व आहे. बाळ राजाच्या आगमनापासूनच त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. मोठयांचे सल्ले, समवयस्क पालकांचे अनुभव, पुस्तके आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून होतकरु पालक अधिकाअधिक प्रगल्भ होत जातात. एव्हढी सगळी पूर्व तयारी करुनही प्रत्यक्ष आपल्या मुलाचा स्वभाव, वागणे, प्रतिक्रीया पाहूनच पालक

Read more

मुलांचे ऑनलाईन वाचन

मुलांचे ऑनलाईन वाचन
Online Readingमंगोलियात वीस मुलांचा वर्ग असतो. त्यात एकवीसावा मुलगा नवीन येतो, त्याला बसायला बाक नसतो म्हणून खाली चटईवर बसून गणित शिकतो. बाई विचारतात, “किती अधिक किती चार होतात ?” आदल्या दिवशीच शिकविल्यामुळे मुले एक सुरात उत्तर देतात “३+१”. एकवीसावा मुलगा उत्तरतो,”२+२ चार होतात”.

एकदा चित्रकला स्पर्धेत, वर्गातली वीसही मुलं पक्षांची, फुलांची, प्राण्यांची चित्र काढतात. एकवीसावा मुलगा मात्र त्याचे स्वत:चे चित्र ‘मॉन्सटरशी’ हात मिळवतांना काढतो. दोघांनी शस्त्र खाली टाकलेली असतात आणि खाली लिहीलेले असत ‘युध्द वाईट असते’. प्रसंग महत्त्वाचे नाही तर महत्त्वाचे आहे एकवीसाव्या मुलाचे वेगळे विचार करणे, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिने बघणे. ही गोष्ट मंगोलियन भाषेत असून सुध्दा चित्रांच्या सहाय्याने मला सहज वाचता आली.

Read more

अर्ली लर्निंग

लंडनची एक शाळा त्यांच्या ३ ते ६ वर्षांच्या मुलांना फ्रेंच संस्कृतीचा परिचय करुन देण्याचे ठरवते. त्यासाठी उत्साही शिक्षिका इलान क्रोथर्स जोमाने कामाला लागते. फ्रेंच संस्कृतीच्या परिचयासाठी शाळेत एक आठवडा निश्चित केला जातो. साहित्याचा अभ्यास म्हणून जगप्रसिध्द सिंड्रेलाची गोष्ट नाट्यरुपात सादर केली जाते. फ्रेंच गणितासाठी साप-शिडी, दान आणि जोडून चित्र तयार करण्याचा उपयोग केला जातो. फ्रेंच चलन समजण्यासाठी दुकान जत्रा भरविण्यात येते. भूगोलात फ्रान्सचा नकाशा, तेथील भौगोलिक परिस्थिती, लोकांची राहणी व वेषभूषेचा अभ्यास केला जातो. इतिहासात नेपोलियनचा अभ्यास केला जातो तर हस्तकला म्हणून नेपोलियनच्या टोप्या बनविण्यात येतात. कला म्हणून मॉनेटच्या चित्रांचा अभ्यास आणि शेवटी पाककलेत फ्रेंच चॉकलेट तयार करण्यात येते. चाकोरीत शिक्षण घेतलेल्या तुम्हाआम्हाला हे कदाचित

Read more

जुन्या आठवणीं

पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी…..
दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा.
आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची.
कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी….
या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं.
तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.

आमच्या पिढीने आई, बापाचा कच्चून मार खाल्ला,

Read more

अध्यापनाची खरी पद्धत…

अध्यापनाची खरी पद्धत…

एकदा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.

सर्वजन दिवसभर

व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?

स्पेलिंग पाठ करावेत की नाही?

कविता कशी शिकवायची?

अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे?

Read more

Vigyan Ashram

Greetings from Vigyan Ashram ! We are organizing an ‘Open House Exhibition’ of all innovative projects, technical achievements, and educational programs on 30th July 2022 at Pabal on the occasion of 19th anniversary of Dr.S.S.Kalbag (founder of Vigyan Ashram).
Following will be major attractions :
i) Technology projects on digital fabrication, fab labs, automation, bio technology and renewable energy besides agriculture machinery and tools.
ii) IBT School projects and their stalls

Read more

पांडव लेणी, नाशिक…

पांडव लेणी, नाशिक…..

पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’ टेकडीवर लेणी खोदल्या आहेत. लेणींतील शिलालेखांमध्येही ‘त्रिरश्मी’ या नावाची प्राकृत रूपे ‘तेकिरसी’ व ‘तिरन्हु’ अशी आली आहेत. स्थानिक लोक या लेणींना ‘पांडव (पांडू) लेणी’ या नावाने ओळखतात.

Read more