Back to Top

Category: भटकंती

पांडव लेणी, नाशिक…

पांडव लेणी, नाशिक…..

पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’ टेकडीवर लेणी खोदल्या आहेत. लेणींतील शिलालेखांमध्येही ‘त्रिरश्मी’ या नावाची प्राकृत रूपे ‘तेकिरसी’ व ‘तिरन्हु’ अशी आली आहेत. स्थानिक लोक या लेणींना ‘पांडव (पांडू) लेणी’ या नावाने ओळखतात.

Read more

#pimpri science park

#pimprisciencepark
#scienceteacher
#fieldttrip
#sciencefun

पिंपरी सायन्स पार्क – नववी दहावीच्या कोणत्याही बोर्डच्या मुलांना पालक आणि विज्ञान शिक्षकांनी आवर्जून घेऊन जावे असे ठिकाण !!!
⚛️♻️♒

विज्ञान हा वर्गापेक्षा प्रयोगशाळेत आणि बाहेर फिरून पंचेंद्रियांना अनुभव देत शिकायचा विषय आहे. कारण विज्ञानाचा अभ्यास म्हणजे निसर्गाच्या नियमांचा अभ्यास. त्यासाठी निरीक्षण करायला हवे, चिकित्सक विचार करता यायला हवा. 🐒

Read more

#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे

#family time
#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे
अहमदनगर मधील पारनेर तालुका अनेक आश्चर्याने भरलेला आहे त्यातच निघोज चे रांजणखळगे म्हणजे आशियातील सर्वात मोठे रांजणखळगे..
या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वाहते
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
+17
Dattatraya Gawade, Shashank Khedekar and 84 others
11 Comments
1 Share
Like

Comment
Share

11 Comments

View 8 more comments

#लवणस्तंभ

रांजणखळगे पाहून झाल्यावर अजुन एक पारनेर मधील आश्चर्यकारक ठिकाण म्हणजे वडगाव दर्या पाहायचे ठरले.. . वडगाव दर्या म्हणजेच प्रसिद्ध माकडाचे वडगाव जसे हे ठिकाण माकडासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते लवनस्तंभा साठीही प्रसिद्ध आहे .
लवणस्तंभ ….एक नैसर्गिक भुरूप !गुहांमधील क्षारयुक्त द्रव्यामुळे तयार झालेले स्तंभ म्हणजे लवणस्तंभ . पठार ,मैदान ,पर्वत,डोंगर,दरी, घळई इत्यादी भुरूपा सारखे हे सुद्धा एक भुरूप आहे .परंतु हे भुरूप आपल्याला पहाण्यासाठी दुर्मिळ असते .ब्रिटन,युगोस्लाव्हिया ,यु एस ए ,आदी देशात हे पहायला मिलते ,भारतात ते फक्त दोन ठिकाणी पहायला मिळतं एक म्हणजे उत्तरभारत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या ठिकाणी …. येथे दोन गुहा आहेत आणि त्यात अधोमुखी लवणस्तंभ तयार झालेले आहेत ….हा एक नैसर्गिक अविष्कार आहे. ……
वडगाव मध्ये कातळ खडकात दोन गुहा आहेत. एक वेल्हाबाईची आणि दुसरी दर्याबाईची. गुहेतून आत जाताना कातळ आहेत. वरच्या छताच्या बाजुनेच सतत पाणी ठिबकत असते. ते साठवण्यासाठी खाली टाक्या, हौद बांधलेले आहेत. ठिबकणारे पाणी त्यात साठते. जंगलातील प्राणी, पक्षी यांना प्यायला उपयोगी पडते. या पाण्यात कलशियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत. एका ठिकाणी गोमुखातून पाणी पडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहून आम्ही स्तिमित झालो.खूपच थंडगार पाणी तेथे आहे.
खूप सारे माकडे येथे पहिल्यापासून होती सध्या कोरोना काळामध्ये माकडाची संख्या कमी झाली आहे येथील माकडे खूप लोकांना त्रास देत नाही उलट सर्वांच्या जवळ जाऊन हाताने खाणे खातात . . मुलांसाठी ही खूप छान one day पिकनिक आहे.
+7
Shashank Khedekar, Sunita Lahane Dhok and 49 others
4 Comments
Like

Comment
Share

किल्ले माहीती- मार्कंड्या

🦋किल्ले माहीती🦋

📙 मार्कंड्या 📙
*******

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.

Read more