#pimprisciencepark
#scienceteacher
#fieldttrip
#sciencefun

पिंपरी सायन्स पार्क – नववी दहावीच्या कोणत्याही बोर्डच्या मुलांना पालक आणि विज्ञान शिक्षकांनी आवर्जून घेऊन जावे असे ठिकाण !!!
⚛️♻️♒

विज्ञान हा वर्गापेक्षा प्रयोगशाळेत आणि बाहेर फिरून पंचेंद्रियांना अनुभव देत शिकायचा विषय आहे. कारण विज्ञानाचा अभ्यास म्हणजे निसर्गाच्या नियमांचा अभ्यास. त्यासाठी निरीक्षण करायला हवे, चिकित्सक विचार करता यायला हवा. 🐒🐍🐢🐬🦎

एरवी सुद्धा बाहेरच्या अनेक गोष्टी वर्गात आणता येत नाहीत आणि सध्या तर ऑनलाईन अभ्यासात मुलं साध्या साध्या शैक्षणिक अनुभवांना मुकताहेत.
म्हणून क्लासच्या मुलांबरोबर नुकतीच पिंपरीच्या सायन्स पार्क ला भेट देऊन आलो.
🐚🌲🌴🌵

लॉकडाऊन नंतर सायन्स पार्क नुकतेच सुरू झाले आहे. विस्तीर्ण आणि अत्यंत स्वच्छ परिसर, पुरेसे पाणी, पार्किंगची सावलीत सोय या सर्व सुविधा उत्तम आहेत.
🏙️🏚️🏦🌳🌲🌴

सायन्स पार्क मधे एकूण चार विभाग आहेत.
१. स्वयंचलित वाहने – चाकाचा शोध, वाफेचे इंजिन, वेगवेगळ्या इंजिनांचा इतिहास, कारचे आतले भाग, हॉर्न, AC, wiper, lights, इंजिन, इंधन टाकी, गिअर्स, रेडीएटर, वाहनांचा पर्यावरणावर परिणाम ते RTO च्या नियमांपर्यंत सर्व काही!!
🚕🚚⛽🚧🚦

२. ऊर्जा – ऊर्जेचे प्रकार, स्रोत, रूपांतर, ऊर्जा निर्मिती, ऊर्जा समस्या, आपल्या शरीराची ऊर्जेची गरज…
🌞⭐🌈🌧️🌏🎡⌛🔥🌊

३. Fun science – वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित खेळ, प्रयोग, ऍक्टिव्हिटी…
🏈🎡⏳⚖️⚒️🧲🔮🪞🧮⚛️🎲

४. छोट्याशा ओडिटोरियम मधे evolution वर आधारित 3d फिल्म..
🦈🐚🐢🐊🐍🦎🦀🐼🐒🐵
🎼🎤🎧🎷📢

५. मुख्य इमारती बाहेर डायनॉसॉर पार्क, वैज्ञानिक नियमांवर आधारीत साधी पण जरा अवजड यंत्रे असलेले खेळ…

सर्वात महत्त्वाचे, हे सगळं मुलं मुक्तपणे हाताळू शकतात, वापरून बघू शकतात, विज्ञानाचे आपले ज्ञान ऑनलाईन क्विझ खेळून तपासू शकतात, घरात विजेसाठी किती खर्च येतो ते शोधू शकतात, आपला आहार आणि ऊर्जा, व्यायाम आणि ऊर्जा याचा संबंध पडताळून बघू शकतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत.
डिजिटल तंत्रज्ञान, सिम्युलेशन यांचा अतिशय उत्तम उपयोग शालेय शिक्षणासाठी इतक्या कल्पकतेने केलेला पहिल्यांदा पाहिला.
सर्व यंत्रे, उपकरणे, खेळ अत्यंत सुस्थितीत, शास्त्रीय नियम तत्वांसह थोडक्यात लिहिलेले, ineractive working मॉडेल्स आणि मुलं हे सगळं हाताळू शकतात. 9वी, 10 वीच्या विज्ञानाच्या विशेषतः physics च्या अभ्यासक्रमातल्या जवळजवळ सर्व संकल्पना इथे स्पष्ट होतातच होतात.

अतिशय मेहेनतीने आणि डोळसपणे सेंटर उभारलेले हे सेंटर बघताना अक्षरशः दोन डोळे कमी पडतात. मुलं अगदी हरखून गेली होती. त्यांना निघायचंच नव्हतं.

हा अप्रतिम अनुभव सर्व विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून तिकीट फक्त 30 रुपये एन्ट्री फी आणि 20 रुपये 3d शो चे ( मुलांसाठी). मोठ्यांना तिकीट 50 + 30 म्हणजे 80 रुपये.

 

ज्योती केमकर
अभ्यासिका क्लासेस, लर्निंग अँड रिसोर्स सेंटर, पुणे
7028455295