Day out with daughter
मुलीची दहावीची परीक्षा झाली असल्याने त्यानंतर काय असे अनेक प्रश्न माझ्या मनात चालू आहेत नव्हे अनेक पॅरेंटच्या मनात चालू असतात. कोणती शाखा,? कोणते महाविद्यालय? कोणता खाजगी क्लास लावायचा ? या गर्तेत पॅरेण्ट अडकून जातात. मुलांचे मात्र ठरलेले असते आणि पॅरेण्टस विनाकारण टेन्शन मध्ये राहतात. त्यामुळे जरा स्वतःला रिलेक्स करण्यासाठी आणि मुलीला विविध क्षेत्रातील तद्न्य व्यक्तीना भेटण्यासाठी आज बाहेर पडलो.
पोलीस जनतेचा मित्र आहे आणि त्याच्या बाबतची मनातील भीती घालवण्यासठी प्रथम पोलीस स्टेशन मुलीला दाखवण्याचे मी निश्चित केले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि जिवलग मित्र विष्णू ताम्हाणे यांच्या समर्थ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांची आम्ही भेट घेतली. विष्णूने कायद्यासंबंधी आणि करिअर संबंधी मार्गदर्शन केले. स्वतःचा जीवनप्रवास, त्यातील समस्या व अचिव्हमेन्ट बद्दल माहिती दिली. शेजारी असलेल्या पोलीस वसाहत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विष्णूने स्वतः फेरफटका मारला आणि त्यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला बोलावून तात्काळ action घेण्यास भाग पाडले. या सर्व प्रसंगाचा ठसा मुलीच्या स्मृतीपटलावर आणि मेंदूवर उमटला . एक चांगली भेट झाल्याने श्रेया खुश झाली.
पीआयसीटी प्राध्यापक सध्या आयटी प्रोग्रामर असलेली मैत्रीन सीमा मालू हिने सुद्धा तिच्या संगणक क्षेत्रातील अनुभव कथन केला. तर डॉ वर्षा शिवले यांनी व्यक्तिमत्व विकास आणि वैद्यकीय क्षेत्रातील माहिती दिली.
थोडक्यात रॉबर्ट frost यांच्या the road not taken या कवितेतील द्विधा मनस्तीतील वाटसरू प्रमाणे मुलांची द्विधा मनस्थिती होऊ नये यासाठी या विविध बुद्धीवान/ प्रगल्भ व्यक्तीमत्त्वांच्या भेटी घालून दिल्या. यामुळे तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक होईल आणि तिला जीवन जगणे सोईस्कर जाईल/ तिचा मार्ग निवडणे सुखकर जाईल हा होता भेट प्रपंच.

मुलांना ज्या क्षेत्रात जायचे त्या व्यक्तींशी ओळख, संवाद घालून दिल्यास त्यांना त्यांचा मार्ग निवडणे सोपे जाईल याचा प्रत्येक पॅरेन्टने विचार करावा