अढी…
आईचं दिवसकार्य झालं आणि नातेवाईकांनी घरचा रस्ता धरला. उषानेही आपले कपडे बॅगेत भरायला सुरूवात केली.
रत्ना, तिची वहिनी म्हणाली, “उषा, तू पण लगेच निघणार? राहिली असतीस जरा…” पण दोघींनाही त्यातला पोकळपणा माहित होता.
आई असतानाही उषा क्वचितच माहेरी रहायला आली होती. आई दवाखान्यात अॅडमिट असताना, तिने कर्तव्य म्हणून सगळं केलं, पण आपल्या घरून येऊन – जाऊन. तिचा नवरा, महेशही सकाळी म्हणाला, “तुला रहायचं असेल तर माझी काही हरकत नाही. मी आणि आई दोघे जातो. तू तुझ्या मनाप्रमाणे ठरव.” पण उषा बॅग भरून त्यांच्याबरोबर निघालीच Continue Reading