लंडनची एक शाळा त्यांच्या ३ ते ६ वर्षांच्या मुलांना फ्रेंच संस्कृतीचा परिचय करुन देण्याचे ठरवते. त्यासाठी उत्साही शिक्षिका इलान क्रोथर्स जोमाने कामाला लागते. फ्रेंच संस्कृतीच्या परिचयासाठी शाळेत एक आठवडा निश्चित केला जातो. साहित्याचा अभ्यास म्हणून जगप्रसिध्द सिंड्रेलाची गोष्ट नाट्यरुपात सादर केली जाते. फ्रेंच गणितासाठी साप-शिडी, दान आणि जोडून चित्र तयार करण्याचा उपयोग केला जातो. फ्रेंच चलन समजण्यासाठी दुकान जत्रा भरविण्यात येते. भूगोलात फ्रान्सचा नकाशा, तेथील भौगोलिक परिस्थिती, लोकांची राहणी व वेषभूषेचा अभ्यास केला जातो. इतिहासात नेपोलियनचा अभ्यास केला जातो तर हस्तकला म्हणून नेपोलियनच्या टोप्या बनविण्यात येतात. कला म्हणून मॉनेटच्या चित्रांचा अभ्यास आणि शेवटी पाककलेत फ्रेंच चॉकलेट तयार करण्यात येते. चाकोरीत शिक्षण घेतलेल्या तुम्हाआम्हाला हे कदाचित

Read more