सुनो ना सून लो ना!
पालक आणि मूल यांच्यातील भांडणाचं ९९.९९ टक्के वेळा एकच कारण असतं ते म्हणजे “अरे तू माझं ऐक जरा” आणि त्याला मिळणारा प्रतिसाद “दरवेळी मी तुमचंच का ऐकायचं?”

आणि मग आपापला किल्ला जोमाने लढवण्याच्या नादात कधी भांडण पेटतात, हे कळतच नाही.
मी माझ्या पंधरा वर्षाच्या पालकत्वाच्या प्रवासात ज्या चुका केल्या आणि त्या चुका आहेत या माझ्या लक्षात येऊन मी त्या सुधारण्याच्या प्रयत्नात आहे त्यातील महत्वाची चूक म्हणजे “सुनावणे”.

किती वेळ खेळायचं, किती वेळ अभ्यास करायचा, स्क्रीन टाईम किती असला पाहिजे, भाजी कोणती खाल्ली पाहिजे, दूध किती पिले पाहिजे, मित्र कोणते निवडले पाहिजेत, पाहुण्यांशी कसं बोललं पाहिजे, अक्षर कसं असलं पाहिजे, बोलताना शब्द कोणते वापरले पाहिजेत, उफ… Continue Reading