Back to Top

Tag Archives: parent

शाळा सुरू

नुकतीच शाळा सुरू झालेली होती. मुलांना वर्गात बसवणे, नवीन मुलांची नावे लिस्ट मध्ये शोधून,त्या त्या टीचर ला सांगणे,छोट्या वर्गातल्या मुलांना त्यांचा वर्ग,शिक्षिका दाखवणे एकूणच घाई होती.त्यातही मुलं जवळपास दोन वर्षांनी नियमितपणे शाळेत येत होती.सगळंच विसरलेल्या मुलांना पुन्हा शाळेची,वर्गाची ओळख होऊन बसायला आठ दिवस तरी लागणार होते. बरं यामध्ये सगळे ते गुपचूप जाऊन वर्गात बसतीलच हे काही सांगता येत नव्हतं Continue Reading

बबड्या

बबड्या-

 

एखाद्या कुटुंबातल्या मुलाचा बबड्या कसा होतो? हा खरोखरच आवर्जून वेळ काढून अभ्यासण्यासारखा विषय आहे.
वयाची विशी उलटून गेलेल्या आपल्या बबडूच्या अंथरूणाची घडी घालणं, बेडवरची विस्कटलेली बेडशीट व्यवस्थित घालणं, बबडूचे कपडे धुवायला टाकणं, त्याच्या खोलीतलं टाॅयलेट स्वच्छ करणं, चहा-काॅफी-दूध-नाश्ता सगळं सगळं अगदी हातात आणून देणं, बबडूला डबा देणं, रोज संध्याकाळी त्याच्या सॅकमधून तो डबा काढून धुवून ठेवणं, बुटात तसेच राहीलेले किंवा इतरत्र पडलेले पायमोजे शोधून धुवायला टाकणं इत्यादी कामं रोजच्या रोज अगदी नियमितपणे करणाऱ्या आया मी पाहिल्या आहेत. Continue Reading